What Happens When You Skip Cold Drink For a Month: अनेकांना जेवणाबरोबर विशेषतः मांसाहार करताना किंवा पचायला जड असे जेवण जेवताना कोल्ड्रिंक (सॉफ्टड्रिंक) घेण्याची सवय असते. यातील सोड्यामुळे अन्न पचायला मदत होते असे युक्तिवादही काहीजण करताना दिसतात. तर काहींना ऍसिडिटी किंवा पोटात जळजळ होत असल्यास सोडायुक्त कोल्ड्रिंक आराम देतात असे वाटते. आता या सामान्य माणसांच्या समजुतीवर तज्ज्ञांनी मात्र अनेकदा आक्षेप घेतला आहे. आजवर अनेक तज्ज्ञांनी वारंवार कोल्ड ड्रिंक्स पिण्याने होणाऱ्या नुकसानाविषयी भाष्य केलं आहे. आपणही त्याबाबत जाणून असाल त्यामुळे कोल्ड्रिंकने होणाऱ्या नुकसानाऐवजी आपण समजा जर महिनाभर कोल्ड्रिंक प्यायचे बंद केले तर काय फायदे होऊ शकतात याविषयी जाणून घेऊया..

महिनाभर कोल्ड्रिंक न प्यायल्याने होणारे फायदे

यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबादचे फिजिशियन डॉ. सोमनाथ गुप्ता यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “महिनाभर कोल्ड्रिंक्स सोडल्यास वजन, हायड्रेशन आणि पचनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमची लालसा कमी झाल्यामुळे तुमची हायड्रेशन पातळी सुधारेल. शिवाय ३० दिवसात साखर आणि कॅफिनचे सेवन झपाट्याने कमी होईल व भविष्यात त्यासाठीची लालसा सुद्धा नियंत्रणात राहू शकते. ”

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…

याशिवाय तुमच्या शरीराचे तापमान नियमित होऊ शकते कारण थंड पेय टाळल्याने शरीराला वारंवार उष्ण, मध्यम किंवा थंड तापमानामध्ये बदल करावे लागणार नाहीत.

यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबादचे अन्य तज्ज्ञ डॉक्टर, डॉ दिलीप गुडे यांनी सुद्धा याविषयी माहिती देत म्हटले की, “कोल्ड्रिंक टाळल्याने तुमचे पोट वारंवार बिघडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तुमचे निरोगी आतडे चांगल्या मायक्रोबायोटाची वाढ करून खराब बॅक्टेरिया कमी करेल.”

दातांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गोड पेय टाळणे हे किती फायद्याचे आहे हे तर तुम्ही जाणताच, दातांना विशेषतः दाढींना लागणारी कीड व तयार होणारी पोकळी कमी होऊ शकते.

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर कोल्ड्रिंक सोडणे ही तुमच्यासाठी एक चांगली सुरुवात असू शकते. कारण तुम्ही तुमच्या दैनंदिन कॅलरीजचे सेवन कमी करू शकता.

कोल्ड्रिंकच्या रूपात आहारात जोडल्या जाणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी होऊन इंसुलिनची संवेदनशीलता वाढते. यामुळेच सौम्य स्वरूपात मधुमेह असणाऱ्या व्यक्ती सुद्धा प्री-डायबेटिक किंवा नॉन-डायबेटिक स्टेजमध्ये परतु शकतात.

कोल्ड्रिंक बंद करण्याचे फायदे अजूनही संपलेले नाहीत बरं.. यामुळे तुमच्या त्वचेचा कोरडेपणा आणि मुरुमांच्या समस्या सुद्धा कमी होऊ शकतात.

एकूणच शरीराला एकप्रकारे डिटॉक्ससाठी गती मिळू शकते ज्यामुळे तुमची उर्जा पातळी आणि चपळता वाढते. तुमचा मूड सुधारून झोपेसंबंधित तक्रारी सुद्धा दूर होऊ शकतात.

कोल्ड्रिंक्सचे पर्याय काय आहेत? (Alternatives For Cold Drink)

हर्बल टी: तुम्ही गरम किंवा रूम टेम्परेचरला सर्व्ह करता येईल.

डिटॉक्स वॉटर: पाण्यात फळे, हर्ब्स, वनस्पती किंवा काकडी, पुदिना टाकून हे फ्लेव्हर्ड पाणी तुम्ही निवडू शकता.

स्पार्कलिंग वॉटर: सोड्यासारखा फिझ असलेले पाणी म्हणजेच स्पार्कलिंग वॉटर आपण निवडू शकता.

याशिवाय गोड नसलेली फळं किंवा भाज्यांचे रस, स्मूदी, ताक, दूध, नारळाचे पाणी सुद्धा वापरू शकता.

हे ही वाचा<< छातीत फक्त जळजळ होतेय की हार्टअटॅक आलाय? लक्षण कसे ओळखाल, फक्त डाव्या बाजूला दुखणं नव्हे तर..

कोल्ड्रिंक्स आणि इतर गोड पेये कोणी टाळावीत? (Who Should Avoid Cold Drink)

डॉ गुप्ता यांच्या माहितीनुसार, लहान मुलांचे दात हे अगदी नाजूक असतात कोल्ड्रिंक किंवा गोड पेयांमुळे दातांना कीड लागू शकते, दात खराब होऊ शकतात. गरोदर महिलांमध्ये कॅफीन आणि साखरेचे अतिरिक्त प्रमाण हानिकारक ठरू शकते. लठ्ठपणाची समस्या असलेले लोक, मधुमेहपूर्व/मधुमेहाच्या आधीच्या स्थितीत असणारे, हृदयाचे, किडनीचे, यकृताचे आजार असणाऱ्यांनी कोल्ड्रिंकचे सेवन टाळावे.