What happens to the body when you give up tea for a month: भारतीय आणि चहा हे समीकरण जगात प्रसिद्ध आहे. भारतात चहा बनवण्याच्या शेकडो पद्धती आणि चहा पिणाऱ्यांच्या कोट्यवधी तऱ्हा आहेत. काहींना झोपेतून उठताच चहा समोर हवा असतो, काहींना ऑफिसच्या प्रत्येक मीटिंगनंतर डोकं शांत करायला चहा हवा असतो, काहींना दुपारी लागणाऱ्या डुलक्या टाळायला चहा लागतो, काहींना रोमान्ससाठी चहा लागतो तर काहींना राग व्यक्त करायलाही चहाच हवा असतो. मसाला चाय कटिंग पासून ते हाय टी सारख्या फॅन्सी प्रकारात मिळणाऱ्या या चहाचे व्यसन असंख्य भारतीयांना आहे. विशेष म्हणजे हे चहाप्रेमी चहा सोडण्यासाठी सुद्धा कित्येकदा प्रयत्न करतात. म्हणूनच आज प्रयोग म्हणून आपण एक महिना चहा सोडल्यास नेमकं शरीरात काय बदलू शकेल हे पाहू…

एक महिना चहा बंद केल्यास शरीराला काय फायदे मिळू शकतात?

डॉ. एलएच हिरानंदानी हॉस्पिटल येथील मुख्य आहारतज्ज्ञ ऋचा आनंद यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एक महिना चहा सोडल्याने शरीराला कसा फायदा होऊ शकतो याविषयी माहिती दिली आहे. त्या म्हणतात, सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे शरीरातील कॅफीनचे प्रमाण नियंत्रणात येऊन तुम्हाला चांगली झोप लागण्यास सुरुवात होऊ शकते. कॅफिन आपल्याला जागं ठेवण्याचं काम करतं पण त्यामुळे अनेकदा हार्मोन्स अधिक सक्रिय होऊन चिंता सुद्धा वाढ शकते. जेव्हा आपण भरपूर प्रमाणात चहा घेता तेव्हा लघवीला जावे लागण्याचे प्रमाणही वाढते यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ लागतं. याचाच प्रभाव मग त्वचेवर सुद्धा पिंपलच्या रूपात दिसू लागतो. चहा टाळल्याने हे त्रास सुद्धा कमी होऊ शकतात.

Tomato
पावसाळ्यात टोमॅटो वापरण्यापूर्वी एकदा नव्हे दोनदा करा खात्री, कारण तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Best time for Job Hunting
Best time for Job Hunting : कोणत्या महिन्यांमध्ये नोकरी शोधावी? जाणून घ्या, नोकरी शोधण्याची सर्वोत्तम वेळ
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Ganesh chaturthi 2024 khajur ladoo recipe in marathi
Ganesh chaturthi 2024: नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू
human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?
Seat Belt in Car
कारमध्ये सीट बेल्ट लावणे का आवश्यक आहे? तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ‘हा’ Video एकदा पाहाच, तुम्हालाही समजेल!

दुसरीकडे, रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथील पोषणतज्ज्ञ आणि मुख्य आहारतज्ञ डॉ. कमल पालिया म्हणाले की, चहा सोडल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात, ज्यामुळे पेशींना चालना मिळते. हे पाचन रोग आणि कर्करोगाच्या विशिष्ट प्रकारांना थांबवण्यास मदत करू शकते.

आपल्या आहारातून चहा काढून टाकण्याचे तोटे

काही लोकांसाठी चहाचे सेवन हा सवयीचा भाग झालेला असतो. यामुळे एका प्रकारची तरतरी व ऊर्जा येते असेही अनेकजण म्हणतात. त्यामुळे चहा बंद केल्याने ही ऊर्जा कमी झाल्याचा मानसिक आभास होऊ शकतो.

पोषणतज्ज्ञ मुग्धा प्रधान सांगतात की, तुम्ही नियमित चहा पिणारे असाल आणि तुम्ही चहा सोडलात, तर अचानक कॅफिन कमी झाल्याने थकवा जाणवणे, मेंदूतील संभ्रम, लक्ष न लागणे, निद्रानाश आणि डोकेदुखी असे त्रास जाणवू शकतात. पण याची तीव्रता कमी अधिक होऊ शकते शिवाय शरीरातील कॅफिनची पातळी पूर्ण कमी होईपर्यंतच हा त्रास होऊ शकतो. हे ही टाळायचे असल्यास आपण खालीलप्रमाणे चहाचे पर्याय विचारात घेऊ शकता.

चहाचे पर्याय

जर तुम्ही तुमच्या आहारातून चहा काढून टाकण्याचा विचार करत असाल, तर डॉ. पालिया यांनी काही पर्याय सुचवले आहेत की तुम्ही चहाला पर्याय देऊ शकता, जसे की हर्बल टी, फळांचे रस किंवा साधे गरम पाणी.

कॅमोमाइल किंवा पेपरमिंट सारख्या हर्बल टी हा चहाचा कॅफीन-मुक्त पर्याय आहे. फळांचे रस, विशेषतः सफरचंद किंवा क्रॅनबेरीसारकाही नैसर्गिकरित्या कॅफीन-फ्री फळं तुमच्या शरीरातील उष्णता कमी करू शकतात. शिवाय, लिंबू किंवा मध टाकून साधे गरम पाणी सुद्धा चहा प्यायल्याचा आभास घडवतात.

चहा कोणी पूर्णपणे टाळावा?

जर तुम्हाला सतत ऍसिडिटीचा त्रास होत असेल, पोटाचे विकार असतील तर चहामधील कॅफीन आणि टॅनिन प्रकृती आणखी बिघडवू शकतात. अशा लोकांनी चहा टाळायलाच हवा.

गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी त्यांच्या कॅफिनचे सेवन कमी केले पाहिजे कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने गर्भाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो किंवा ते आईच्या दुधाद्वारे लहान मुलांपर्यंत पोहोचू शकते.

ज्यांच्या शरीरात लोह कमी असेल अशांनी सुद्धा सावध राहायला हवं कारण, चहातील टॅनिन लोह शोषण्यास अडथळा आणू शकतात.

हे ही वाचा<< डायबिटीस असलेल्या पुरुषांना ‘इरेक्टाइल डिसफंक्शन’चा त्रास का होतो, उपाय काय? तज्ज्ञांचं उत्तर जाणून घ्या 

चहाच्या फायदे व तोट्यांवर सर्वाधिक प्रभाव हा तुम्ही किती प्रमाणात व किती वेळा चहा घेता या दोन प्रश्नांचा असतो. तुम्ही जर याची उत्तरे नीट शोधलीत तर तुम्हाला चहा पिऊन सुद्दढ राहता येऊ शकते. यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला देखील आवर्जून घ्या.