7 Days Only Water Fasting Results: तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुम्ही फक्त पाणी पिऊन उपवास केला तर तुमच्या शरीराला झेपेल का? अनेक समुदायांमध्ये अशा प्रकारचे उपवास अगदी महिनोन्महिने केले जातात. आजवर काही इन्फ्लुएन्सर मंडळींनी सुद्धा अशा प्रकारचा प्रयोग केला आहे. पण तुम्हाला स्वतःला असं काही करून पाहायचं असेल तर आधी त्याचा प्रभाव व दुष्परिणाम दोन्ही जाणून घ्यायला हवे. जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ बबिना एनएम यांनी इंडियन एक्सस्प्रेसला याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. केवळ पाणी पिऊन अन्य सर्व पदार्थांचा अगदी फळांचा सुद्धा त्याग केल्याने शरीरामध्ये कोणते बदल होऊ शकतात, यामुळे शरीर अधिक सुदृढ होते का? झालेले बदल किती काळ टिकून राहू शकतात, याचा वजन, मधुमेह, अवयवांची शक्ती, रक्तदाब या घटकांवर काय परिणाम होऊ शकतो हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत.

डॉ बबिना यांनी सात दिवसांच्या जल उपवासाचे काही संभाव्य शारीरिक व मानसिक व्यापक परिणाम सांगितले आहेत. त्याची यादी खालीलप्रमाणे:

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
weather department, Cold weather
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…

ऑटोफॅजी: शरीर एक ऑटोफॅगिक प्रक्रिया सुरू करण्यासाठी उपवासाचा वापर करते ज्यामुळे खराब झालेल्या पेशी काढून टाकल्या जातात आणि त्यांच्या जागी निरोगी पेशी येतात. भविष्यात पेशींच्या आरोग्याला याचा फायदा होऊ शकतो.

केटोसिस: उपवासाच्या काळात शरीर केटोसिसच्या अवस्थेत जाऊ शकते, ज्या दरम्यान ते कर्बोदकांऐवजी ऊर्जेसाठी चरबी वापरण्यास सुरवात करते. ही एक सामान्य चयापचय प्रक्रिया आहे जी तुम्ही उपवास करत असताना घडते.

वजन कमी करणे: सात दिवसांच्या उपवासामुळे वजन कमी होण्याची शक्यता असते कारण यामुळे कॅलरी कमी होते आणि शरीराला चरबी आणि ग्लायकोजेन वापरून ऊर्जा निर्माण करावी लागते.

रक्तातील साखरेचे नियंत्रण: उपवास केल्याने इन्सुलिन संवेदनशीलता आणि रक्तातील साखरेचे नियमन दोन्ही वाढू शकते.मात्र उपवास करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, ज्यांना मधुमेह किंवा इतर चयापचय विकृती आहेत त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला घ्यायलाच हवा.

डिटॉक्सिफिकेशन: काहींच्या मते उपवास केल्याने शरीरात जमा झालेले विषारी घटक काढून टाकून शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनला मदत होते. असे असले तरी, या दाव्याला पुष्टी देणारा वैज्ञानिक पुरावा नाही, कारण अन्य स्थितीतही शरीरात आधीच डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सुरू असते, असे डॉ. बबीना यांनी सांगितले.

ऊर्जेची पातळी: शरीराला पर्यायी इंधन स्रोत वापरण्याची सवय लागल्याने ऊर्जेची पातळी सुरुवातीला कमी होऊ शकते. काही लोकांना थकवा जाणवू शकतो, डोके दुखू शकते किंवा चिडचिड होऊ शकते.

इलेक्ट्रोलाइट असंतुलन: दीर्घकाळ उपवास केल्याने इलेक्ट्रोलाइट कमतरता उद्भवू शकतात, ज्यामुळे अशक्तपणा, स्नायूंमध्ये क्रॅम्पिंग किंवा अनियमित हृदयाचे ठोके यांसारखी लक्षणे दिसू शकतात. इलेक्ट्रोलाइट पातळींवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे आणि आवश्यक असल्यास, पूरक आहार घेण्याचा विचार करा.

मानसिक आरोग्य: काहींना उपवास करताना मन विचलित होणे, एकाग्रता कमी होणे, अशा तक्रारी उद्भवतात तर काहींना मानसिक स्पष्टता येण्यासाठी मदत होते. हे काही प्रमाणात व्यक्तिसापेक्ष व तुमच्या निश्चयावर आधारित आहे.

पचनसंस्थेला विश्रांती: जेव्हा एखादी व्यक्ती उपवास करते, तेव्हा त्यांच्या पचनसंस्थेला काहीसा आराम मिळतो ज्यामुळे अन्य शारीरिक कार्यांसाठी ऊर्जा उपलब्ध होते.

जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा रक्तातील साखरेसारख्या आरोग्याच्या समस्या असतील तर, निश्चितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय उपवास करताना वेळोवेळो शरीराचे संकेत ओळखणे सुद्धा महत्त्वाचे आहे.

आहारतज्ज्ञ आणि NUTR, दिल्ली च्या संस्थापक लक्षिता जैन, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की जैन धर्माप्रमाणे भारतातील अनेक धर्म दीर्घकाळापासून केवळ जल उपवास करत आहेत. “अलीकडे, पाश्चात्य अभ्यासांनी ७ दिवसांच्या पाण्याच्या उपवासाचे फायदे जास्त हायलाईट केल्याने याविषयी कुतूहल वाढलं आहे, विशेषत: कर्करोगाच्या बाबतीत या प्रकारचा उपवास कसा कामी येऊ शकतो हे पाश्चात्य अभ्यासक दाखवत आहेत. निश्चितच अशा प्रकारच्या उपवासामध्ये शरीराला पुरेशी पोषक तत्त्वे न मिळणे, इलेक्ट्रोलाइट्समध्ये असंतुलन आणि जास्त वेळ उपवास केल्यास स्नायूंची शक्ती कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ,मात्र हा प्रयोग मर्यदित वेळेसाठी केल्यास व आवश्यक ती सर्व काळजी घेतल्यास याचे अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात.

हे ही वाचा<< रोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय 

जैन यांनी सांगितले की, जल उपवासाच्या पहिल्या दिवशी तुमचे शरीर डिटॉक्स व्हायला सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी तुम्हाला खूप हलके वाटेल. पण तिसऱ्या दिवसापासून तुमचे शरीर संथ होऊ शकते. तुम्हाला हा त्रास जाणवला नाही किंवा कमी जाणवला तर आपण हा उपवास कायम ठेवू शकता, पण त्रास वाढल्यास थांबणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकासाठी हे वेगवेगळे असू शकते.

जल उपवास ‘या’ लोकांनी अजिबात करू नये!

वर आपण फायदे तोटे पाहिले असले तरी काहींनी या प्रकारचा उपवास करणे पूर्णतः टाळायलाच हव. विशेषत: दीर्घ कालावधीसाठी जल उपवास घातक शुद्ध ठरू शकतो. डॉ बबिना सांगतात की, “अगोदरच आजारी असलेल्यांनी, गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी आणि ज्यांना खाण्याच्या विकारांचा इतिहास आहे अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय उपवास करू नये. ” याव्यतिरिक्त, पोटाच्या समस्या टाळण्यासाठी, उपवास सोडताना काळजीपूर्वक आणि हळूहळू शरीराला पूर्व स्थितीत आणण्याला हवे. तुमचे आरोग्य हेच पहिले प्राधान्य ठेवा, ट्रेंड नाही!