वेगाने चालणे (Brisk walking) हा व्यायामाचा एक सहज करता येण्यासारखा प्रकार आहे. वेगाने चालण्याचे अनेक फायदे आहेत. तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये दोन किलोमीटर वेगाने चालणे समाविष्ट केल्यास तुमचे आरोग्य लक्षणीयरीत्या सुधारू शकते. परंतु, योग्य तंत्र आणि संभाव्य धोक्यांची जाणीव महत्त्वाची आहे.

दिल्लीच्या सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील एचओडी-फिजिओथेरपी विभागाचे डॉ. सुरेंद्र पाल सिंग यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “नियमित वेगात चालणे हे सर्वांगीण आरोग्याला चालना देण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. आपण दररोज अशी कृती केल्यास त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊ….

eating egg whites is not good for you
Eating Egg Whites Healthy Or Not : फक्त अंड्यातील पांढरा भाग खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी मांडली मते…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
what happens to blood sugar levels when you walk after a meal
जेवल्यानंतर चालल्यास खरोखर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा….
your sleep position can tell about your health
Sleep Position : तुम्ही कसे झोपता? तुमची झोपण्याची स्थिती तुमच्या आरोग्याविषयी काय सांगते? घ्या जाणून….
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
tomato ketchup adulteration
टोमॅटो सॉसमधील भेसळ कशी ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Health Special What exactly is insulin
Health Special : इन्सुलिनच्या जगात
  • हृदय व श्वासोच्छ्वासाला चालना (Cardiovascular and Respiratory Boost) : वेगाने चालण्यामुळे तुमचे हृदय आणि फुप्फुसे मजबूत होतात. त्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि तुमच्या कार्य करण्याची क्षमता वाढवण्याला त्यामुळे चालना मिळते.
  • रक्तदाब नियमन (Blood Pressure Regulation) : या व्यायाम प्रकारामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
  • सांध्यांची लवचिकता सुधारते (Enhanced Joint Flexibility) : वेगात चालण्याने तुमच्या सांध्यांची लवचिकता सुधारून, कडकपणा कमी होतो.
  • मधुमेह व्यवस्थापन (Diabetes Management) : वेगात चालण्याच्या कृतीने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. मधुमेहींसाठी ही बाब स्वाभाविकत: फायदेशीर ठरते.
  • वजन व्यवस्थापन चमत्कार (Diabetes Management Marvel) : कॅलरी बर्न करणे, वजन कमी करणे किंवा निरोगी वजन व्यवस्थापन यांसाठी वेगात चालण्यामुळे योगदान मिळेल.

सर्वसाधारण शिफारस म्हणून डॉ. सिंग आठवड्यातून पाच वेळा ३० मिनिटे वेगाने चालण्याच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगतात. हा कालावधी सामान्यत: चांगले आरोग्य राखणे आणि या व्यायामाचे फायदे मिळविणे यांसाठी पुरेसा असतो.

हेही वाचा –तुम्ही दिवसभरातील शेवटचे जेवण कोणत्या वेळी केले पाहिजे? तज्ज्ञांनी केला खुलासा

तंत्राकडे लक्ष द्या : संभाव्य नकारात्मक परिणाम कोणते आणि ते कसे टाळायचे (Mind the techniqu : Potential downsides and how to avoid them)

वेगवान चालण्याने अनेक फायदे होत आहेत; परंतु जर तुम्ही योग्य प्रकारे चालत नसाल, तर त्याचे विचारात घेण्यासारखे संभाव्य तोटेही आहेत. वेगात चालताना काय लक्षात ठेवावे त्या संदर्भातील सावधगिरीबाबत डॉ. सिंग यांनी काय सांगितले ते जाणून घ्या..

अतिश्रम करण्याचा धोका (Overexertion Risks) : तुमच्या क्षमतेपेक्षा तुम्ही अधिक वेगाने चालल्यास तुमच्या हृदयाची गती अधिक वाढू शकते. त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. ज्यांना वजन कमी करण्याची गरज नाही अशा व्यक्तींमध्ये अनपेक्षितरीत्या वजन कमी होऊ शकते.

  • पोषक घटकांची कमतरता (Nutrient Deficiencies) : तुमच्या व्यायामाच्या दिनचर्येला पूरक असा संतुलित आहार न घेतल्यास, पोषक घटकांच्या अपुऱ्या सेवनामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो.
  • अयोग्य तंत्र आणि दुखापत (Improper Technique and Injuries) : असमान पृष्ठभागावर (uneven surfaces) किंवा चुकीच्या चपला वा बूट घालून चालण्यामुळे स्नायू आणि सांधेदुखी, स्नायूंमध्ये कडकपणा येऊन जखमा होऊ शकतात.
  • सुरक्षिततेला प्राधान्य : चालणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बाबी (Safety first : Important considerations for walkers)

डॉ. सिंग हेल्थकेअर प्रोफेशनलशी सल्लामसलत करण्याच्या महत्त्वावर जोर देतात.

हेही वाचा – एक्सपायरी डेट संपल्यानंतर बिस्किटे खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

जलद चालण्याची दिनचर्या सुरू करण्याआधी, विशेषत: जर तुम्हाला गंभीर संधिवात, हृदयाच्या समस्या किंवा शस्त्रक्रियेनंतर बरे होण्याच्या मार्गावर असाल किंवा यांसारख्या आरोग्य स्थिती आधीपासूनच असतील, तर काही सुरक्षेबाबतच्या टिप्स येथे दिल्या आहेत त्यांचे पालन करा.

  • योग्य भूभाग निवडा (Choose the Right Terrain) : तुमच्या सांध्यांवरील ताण कमी करण्याकरिता चालण्यासाठी सपाट पृष्ठभाग निवडा.
  • योग्य पादत्राणांचा वापर (Footwear Matters) : चालण्यासाठी योग्य शूज वापरा; जे तुमच्या पायांना पुरेसा आधार आणि उशीप्रमाणे आराम देऊ शकतील.
  • तुमच्या शरीराचे ऐका (Listen to Your Body) : हळूहळू सुरुवात करा आणि तुमच्या चालण्याचा कालावधी व तीव्रता हळूहळू वाढवा. आपल्या शरीराकडे लक्ष द्या आणि आवश्यकतेनुसार काही दिवस विश्रांती घ्या.
  • आहार (Diet) : तुमच्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक पोषक घटकयुक्त संतुलित आहार घ्या.

हेही वाचा –“परिस्थिती सगळं शिकवते!” लहान वयात भाकरी करत्येय शेतकऱ्याची लेक, Viral Video एकदा बघाच

या टिप्स अंगीकारा आणि सुरक्षित व प्रभावी चालण्याच्या दिनचर्येचे पालन करा. तुमचे संपूर्ण आरोग्य चांगले राहावे यासाठी योग्य रीतीने चालत राहा. लक्षात ठेवा, सातत्य ही मुख्य गोष्ट आहे. तुम्ही चालण्यासाठी आवश्यक शूज पायांत घालूनच घराबाहेर पडा आणि वेगात चालण्याच्या परिवर्तनीय शक्तीचा (transformative power) अनुभव घ्या.

Story img Loader