उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात आणि जवळपास सगळीकडेच अगदी स्वस्तात मिळणारं फळ म्हणजे टरबूज. आंब्यापेक्षाही टरबूज आवडीने खाणारे अनेक लोक आहेत. उन्हाळ्यात आढळणारे टरबूज हे अनेक पौष्टिक घटकांनी समृद्ध एक चवदार व आरोग्यदायी असे फळ आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी टरबूज हे खूप चांगले फळ मानले जाते. त्यात पोटॅशियम, राइबोफ्लेविन, लोह, कॅल्शियम, झिंक, फायबर, नियासिन, लोह, अ, ब, क ही जीवनसत्त्वे आणि लाइकोपिन असे अनेक प्रकारचे पोषक घटक असतात; जे शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचे काम करतात.

कलिंगडामध्ये भरपूर पाणी असते आणि त्यामुळे ते शरीराला कधीही पाण्याची कमतरता भासू देत नाही. कलिंगडामध्ये क जीवनसत्त्व आढळते; जे मजबूत प्रतिकारशक्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याशिवाय त्यात अ जीवनसत्त्वदेखील आढळते; जे रोगप्रतिकार शक्ती नियंत्रित करते आणि संक्रमणापासून संरक्षण करते. टरबुजाचे सेवन तुम्ही ज्यूसच्या स्वरूपातही करू शकता. पण, तुम्ही उन्हाळ्यात दररोज टरबुजाचा रस प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल, या विषयावर बंजारा हिल्स येथील केअर हॉस्पिटल्सच्या क्लिनिकल डाएटिशियन जी. सुषमा यांनी माहिती दिल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत जाणून घेऊ…

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
Nutritious ladoo of cashews and almonds
सकाळच्या नाश्त्यात मुलांना द्या काजू-बदामाचे पौष्टिक लाडू; पटकन वाचा सोपी रेसिपी

टरबुजाचा रस प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम?

१. अनेक वेळा उन्हाळ्यात शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते. जीवनसत्त्वांचा उत्कृष्ट स्रोत असल्याने टरबुजाचा रस ऊर्जा वाढवतो. त्यात असलेले जीवनसत्त्व ब६ आणि मॅग्नेशियममध्ये डोपामाइन असते, जे ऊर्जा पेशींना इंधन पुरवते. त्याव्यतिरिक्त बीटा कॅरोटीन आणि क जीवनसत्त्व ऊर्जा बूस्टर म्हणून कार्य करतात. एक ग्लास टरबुजाचा रस प्यायल्याने अशक्तपणा आणि थकवा दूर होतो.

(हे ही वाचा : ‘व्हिटॅमिन सी’ अति सेवनाचे दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या… )

२. उन्हाळ्यात अनेकदा कोवळ्या उन्हात फिरल्याने उष्माघात आणि सनस्ट्रोकचा धोका वाढतो. अतिउष्णतेमध्ये शरीराचे तापमान अनेक वेळा वाढते; जे वेळेवर थंड न केल्यास समस्या उद्भवू शकतात. अशावेळी टरबुजाचा रस बाटलीत सोबत ठेवणे चांगले. जेव्हाही तहान लागेल तेव्हा तो प्या. टरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने टरबुजाचा रस शरीरात निर्जलीकरण होऊ देत नाही आणि आपल्याला आतून थंड ठेवतो. त्यामुळे तहान तर शमतेच; पण थकवाही दूर होतो.

३. टरबुजाचा रस प्यायल्याने किडनी स्टोनचा त्रास होत नाही. हा रस नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवितो; जो किडनीसाठी वरदान आहे. हा रस तुमचे यकृत शुद्ध करतो आणि मूत्रपिंडांना विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो. तसेच किडनीमध्ये दगड तयार होण्याला प्रतिबंध करतो.

४. टरबुजाचा रस तुम्हाला डोळ्यांच्या अनेक समस्यांपासून वाचवू शकतो. त्यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन आणि अ जीवनसत्त्व दृष्टी सुधारण्यास मदत करते. लायकोपिन रेटिनाचे संरक्षण करते. मॅक्युलर डिजनरेशन, रातांधळेपणा, वयाशी संबंधित डोळ्यांचे त्रास यांसारख्या समस्या टाळण्यासाठी टरबुजाचा रस खूप प्रभावी आहे. त्याशिवाय या रसाच्या सेवनाने उन्हाळ्यात डोळ्यांच्या संसर्गापासून बचाव होतो.

५. जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, तर टरबुजाचा रस प्यायल्याने तो सामान्य राहण्यास मदत होते. त्यामध्ये असलेल्या अमिनो ॲसिड, मॅग्नेशियम व पोटॅशियम या घटकांमुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. रक्तदाबाच्या रुग्णांना टरबुजाचा रस पिण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात.

६. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी आणि रोगमुक्त ठेवायचे असेल, तर टरबुजाचा रस प्या. टरबुजामध्ये असलेले पोटॅशियम हृदयविकारापासून बचाव करते. अमिनो अॅसिडमुळे रक्ताभिसरण सुधारते, तर बीटा-कॅरोटीन व लायकोपिन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य चांगले राखतात. हृदयाशी संबंधित समस्यांपासून तुमचे रक्षण होते.

टरबुजाचा रस कोणत्याही वेळी ताजेतवाने करणारा पदार्थ असला तरी तज्ज्ञांनी सुचवले की, सकाळी किंवा दुपारी आदर्शपणे सकाळी १० ते १२ या वेळेत त्याचा आनंद घ्यावा. ही वेळ हायड्रेशन आणि पोषक द्रव्यांचे शोषण इष्टतम करते.

टरबुजाचा रस कोणी टाळावा

टरबुजाचा रस साधारणपणे सुरक्षित असला तरी प्रत्येकासाठी तो योग्य नसतो. टरबुजामध्ये FODMAPs (शर्करा ज्यामुळे फुगणे, गॅस व क्रॅम्पिंग यांसारखा पचनाचा त्रास होऊ शकतो) इरिटेबल बोवेल सिंड्रोम किंवा संवेदनशील पचन असलेल्या लोकांनी सावध राहिले पाहिजे. टरबुजाच्या रसातील नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील साखर वाढू शकते. आपल्या उन्हाळ्याच्या दिनचर्येमध्ये दररोज टरबुजाचा रस समाविष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या वैयक्तिक आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन, ते तुम्हाला योग्य प्रमाणात सल्ला देऊ शकतात, असे सुषमा म्हणाल्या.

Story img Loader