कल्पना करा की तुम्ही अंतराळामध्येअडकला आहात. तुमच्या सभोवती चित्तथरारक दृश्य आहे परंतु या वातावरणात राहणे तुमच्या आरोग्यासाठी सतत धोका निर्माण करू शकते. ही कल्पना करूनही अंगावर काटा येत असला तरीही अंतराळवीर सुनीता विल्यम्सबरोबर हे प्रत्यक्षात घडत आहे

भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर या नासाच्या अंतराळवीरांना घेऊन बोइंग कंपनीचे ‘स्टारलायनर’ हे यान ५ जून रोजी अंतराळात झेपावले. त्यांनी ८ दिवस राहण्याची योजना आखली होती. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून एक किंवा दोन आठवड्यांत ते परततील अशी अपेक्षा होती. मात्र आता एक महिना होत आला असून अद्याप ‘स्टारलायनर’ पृथ्वीवर परतले नाही. त्यांच्या उपकरणांमध्ये समस्या निर्माण झाल्या होत्या, मात्र नासा आणि बोइंग यांनी उपकरणांच्या समस्यांचे निवारण केल्यामुळे ते मार्गावर आले आहे. मूलत: हे यान २५ मे रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या मोहिमेसाठी तयार करण्यात आले होते. पण, एक किरकोळ हेलियम गळतीमुळे त्यांच्या ISSच्या परतीच्या प्रवासात विलंब झाला. असे असूनही ते ६ जून रोजी सुरक्षितपणे ISS वर पोहोचले. आता, समस्या निश्चित होईपर्यंत त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त काळ थांबावे लागेल.

अंतराळवीर ISS वर सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत असताना, त्यांचा परतीचा प्रवास सध्या लांबला आहे. NASA च्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच म्हणाले, “NASA सावधगिरी बाळगत आहे आणि सर्वकाही योग्य आणि सुरक्षितपणे केले आहे याची खात्री करण्यासाठी त्यांचा वेळ घेत आहे. आणि ‘स्टँडर्ड मिशन मॅनेजमेंट टीम’ सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे.”

हेही वाचा – Monsoon foods : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत? डॉक्टरांकडून घ्या जाणून….

अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे शरीरातील द्रव पदार्थांचे (जसे रक्त आणि पाणी) नुकसान होते. सामान्यतः गुरुत्वाकर्षण शरीरातील द्रव संतुलित ठेवते. पण सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये, शरीराला द्रव पदार्थ उलट (पायापासून डोक्याच्या) दिशेने वाहू लागते, ज्यामुळे किडनीला त्रास होऊ शकतो. याबाबत इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉ. जयंत कुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती दिली. यामुळे पुढील गोष्टी होऊ शकतात:

द्रव असंतुलन(Fluid Imbalance) : मूत्रपिंड योग्य द्रव संतुलन राखण्यासाठी संघर्ष करतात, ज्यामुळे दीर्घकालीन निर्जलीकरण होऊ शकते किंवा द्रव घटकांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

मुथखडा (Kidney Stones): सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळे हाडांमधून कॅल्शियमचे उत्सर्जन वाढल्याने मुथखड्याचा धोका वाढतो, जो वेदनादायक असतो. अंतराळात, या त्रासाला सामोरे जाणे आणखी कठीण आहे कारण शरीरातून मुथखडा बाहेर पडण्यासाठी आवश्यक गुरुत्वाकर्षण तिथे उपलब्ध नसते.

गंभीर मूत्रपिंडाचा आजार (Chronic Kidney Disease): अंतराळामध्ये रेडिएशनच्या संपर्कात आल्यास सतत धोका वाढतो. किडनीच्या पेशी आणि ऊतींना नुकसान करू शकते, ज्यामुळे गंभीर मूत्रपिंडाच्या आजाराचा (Chronic Kidney Disease) धोका वाढतो.

अंतराळवीरांना अंतराळातून परत येण्यास उशीर झाल्यास आरोग्याला धोके आहेत.

हेही वाचा – जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा शरीरामध्ये काय बदल होतात?

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे अंतर्गत औषध, वरिष्ठ सल्लागार, डॉ. राकेश गुप्ता यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितली की,”सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना अंतराळातून परत येण्यास उशीर झाल्यास , किडनीच्या समस्यांपेक्षा इतरा आरोग्याचे धोके दिवसेंदिवस वाढत जातात.”

  • सतत द्रव असंतुलन : सतत गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, विशेषत: डोके आणि शरीराच्या वरच्या भागांमध्ये अससेले शारीरिक द्रव (जसे रक्त आणि पाणी) यावर दीर्घकालीन परिणाम होतात. यामुळे दीर्घकालीन निर्जलीकरण होऊ शकते किंवा द्रव घटकांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
  • स्नायू आणि हाडांचे नुकसान: सतत गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण शरीराची हाडे आणि स्नायू कमकुवत करते.
  • फ्लुइड रिडिस्ट्रीब्युशन (Fluid Redistribution): म्हणजे अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या नसल्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, विशेषत: डोके आणि कंबरे वरच्या भागांमध्ये(Uppder Body) शरीताली द्रव पदार्थ (जसे रक्त आणि पाणी) उलट दिशने वाहू लागतात ज्यामुळे चेहरा सुजतो, तुमच्या टाळूवर intracranial) दाब वाढू शकतो आणि दृष्टी कमी होऊ शकते आणि मेंदूच्या कार्यावर (cognitive function) संभाव्य परिणाम होऊ शकतो.
  • रेडिएशन सिकनेस आणि कॅन्सर (Radiation Sickness and Cancer) : कॉस्मिक रेडिएशनच्या संपर्कात आल्याने कॅन्सर आणि गंभीर रेडिएशन सिकनेसचा धोका वाढतो.
  • मानसिक आरोग्यविषयक चिंता: अंतराळात विलगीकरण केल्यासारखे वाटते. अशा बंदिस्त आणि उच्च धोका असलेल्या वातावरणात राहिल्यामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
  • कमकुवत रोगप्रतिकार शक्ती: अंतराळवीरांना रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते

नोएडा एक्स्टेंशन येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सल्लागार अंतर्गत औषध विभागात कार्यरत असलेल्या डॉ. श्रुती शर्मा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, “काही संवेदी आणि न्यूरोलॉजिकल आव्हानांचा सामाना देखील करावा लागू शकतो. जसे की अवकाशात कुठे आहात हे ओळखण्याची क्षमता (spatial orientation), शरीराचा समतोल बिघडतो आणि डोळे आणि हात यांच्यातील समन्वय साधण्यास समस्या निर्माण होते. यामुळे स्पेस मोशन सिकनेस (SMS) होऊ शकतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी ताण, चयापचयातील बदल आणि हार्मोन्स पातळी आणि आतड्यांतील मायक्रोबायोटा रचनेतील बदल यामुळे आरोग्य धोके आणखी गुंतागुंतीचे होतात,”असे तिने स्पष्ट केले.

हेही वाचा – ‘या’ एका सवयीमुळे घशात वाढू लागले केस; ५ सेमी लांब केस काढण्यासाठी मारल्या हॉस्पिटलच्या फेऱ्या; हा आजार नेमका काय?

अवकाशामध्ये दीर्घकाळ राहिल्यास अंतराळवीरांना आणखी कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो याबाबत डॉ. शर्मा आणि गुप्ता यांनी हे धोके कमी करण्यासाठी काही धोरणे सांगितले आहे.

व्यायाम : विशेष उपकरणे वापरून नियमित व्यायाम केल्याने स्नायूंचे वस्तुमान आणि हाडांची घनता राखण्यास मदत होते.
आहाराचे नियोजन: एक सुनियोजित आहार संपूर्ण आरोग्यासाठी पुरेसे पोषण सुनिश्चित करतो.
शरीरातील द्रव समस्यांचे व्यवस्थापन: विशिष्ट व्यायाम आणि शरीराच्या खालच्या भागावर नकारात्मक दाब निर्माण करणारी उपकरणे वापरून शरीरातील द्रव समस्यांचे व्यवस्थापन आणि टाळूवरील दाब कमी करण्यास मदत होऊ शकते.
रेडिएशन प्रोटेक्शन: सौर उर्जा कमी असताना स्पेसवॉक करणे आणि स्पेसक्राफ्ट शील्डिंग वापरणे, रेडिएशनचा संपर्क कमी करणे या गोष्टी कराव्या लागतील.
मनोवैज्ञानिकांची मदत घ्या: मनोरंजनात्मक गोष्टी करण्यासंह कुटुंब आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी नियमित संवाद, तणावाचे नियोजन करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य राखण्यात मदत करते.
वैद्यकीय देखरेख: सतत देखरेख केल्याने आरोग्य समस्या लवकर ओळखणे आणि उपचार करणे शक्य होते.

हे प्रतिकारक उपाय महत्त्वाचे असले तरी दीर्घकालीन आरोग्यासाठी पृथ्वीवर त्वरित परत येणे आवश्यक आहे. दिर्घकाळ अवकाशामध्ये राहिल्यास या आरोग्य धोक्यांचे एकत्रित परिणाम गंभीर होऊ शकतात, असे डॉ. कुमार यांनी सांगितले.