बटाटा भजी, बटाटा पराठा, वडापाव, बटाटा पॅटीस, बटाटा सँडविच, फ्रेंच फ्राईज, मॅश केलेला बटाटा… असे बटाट्यापासून तयार होणाऱ्या कित्येक स्वादिष्ट पदार्थांवर आपण नेहमी ताव मारत असतो. बटाटा हा एक जागतिक पातळीवर आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. परंतु, बटाट्यामध्ये असलेल्या उच्च कार्ब्सबद्दल अनेकांना चिंता वाटते का? याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अनेकदा बटाट्यातील कार्बोहायड्रेट्स घटकांना हानिकारक मानले जात असते तरी त्यातील आश्चर्यकारक पोषक घटकांचे काही आरोग्य फायदेदेखील आहे. बटाटा हा फायबरचा चांगला स्रोत आहे. हे फायबर पचन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे),” असे हैदराबाद यशोदा हॉस्पिटल्स जनरल फिजिशियन व डायबेटोलॉजिस्ट, सल्लागार डॉ. रंगा संतोष कुमार यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

डॉ. रंगा संतोष कुमार यांनी सांगितले, “बटाटा हे पोटॅशियमनेही समृद्ध आहेत. पोटॅशियम हे एक खनिज आहे; जे रक्तदाब आणि स्नायूंचे कार्य नियंत्रित करते. बटाटे लोह, जीवनसत्त्व क व जीवनसत्त्व बी-६ देतात; जे विविध शारीरिक प्रक्रियांसाठी महत्त्वपूर्ण आहेत.

हेही वाचा – दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात, तुम्हालाही असे वाटते का? मग समज चुकीचा असू शकतो, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

कार्ब्सचे सेवन करताना घाबरू नका

“कार्ब्सचे सेवन करताना घाबरू नका! कार्ब्समध्ये शरीराच्या ऊर्जेचा प्राथमिक स्रोत असतो, विशेषत: कठोर व्यायामादरम्यान. बटाटे तुमच्या मेंदू आणि स्नायूंना सहज उपलब्ध उर्जा पुरवतात”, असे डॉ. कुमार म्हणाले.

डॉ. कुमार यांच्या म्हणण्यानुसार, “बटाटे शरीराला मौल्यवान पोषक घटक देतात; परंतु तुम्ही ते कशाबरोबर खाता यावर ते तुमच्या एकूण आरोग्यावर कसा लक्षणीय परिणाम करू शकतात हे अवलंबून असते. कॅलरीयुक्त चीज आणि अंड्यातील बलक यांच्याऐवजी औषधी वनस्पती किंवा मसाल्यांसारख्या आरोग्यदायी पर्यायांची निवड करा.”

बटाटे निरोगी आहार ठरू शकतो; पण…?

बटाटे निरोगी आहाराचा भाग असू शकतात; परंतु संयम महत्त्वाचा आहे. डॉ. कुमार यांनी सावधगिरीचा इशारा देत सांगितले, “मधुमेह किंवा लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या बटाट्याच्या सेवनाबद्दल अधिक जागरूक असणे आवश्यक आहे. कारण- कार्बोहायड्रेट्स या घटकाचा रक्तातील साखरेच्या पातळीवर संभाव्य प्रभाव पडतो. त्यामुळे वैयक्तिकृत आहारविषयक सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते.

हेही वाचा – खूप हसल्यामुळे हैदराबादमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध; पण हे कसे शक्य? तज्ज्ञांनी केला खुलासा

तुम्ही रोज बटाट्याचा आनंद घेऊ शकता का?

डॉ. कुमार सांगतात, ते तुमच्या तयार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. बटाटे आरोग्यदायी पद्धतीने (भाजलेले, उकडलेले, हवेत तळलेले) असतील आणि त्याचे माफक प्रमाणात सेवन केल्यास, ते दररोज संतुलित आहाराचा भाग बनू शकतात. पण, मधुमेह किंवा लठ्ठपणा असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास प्राधान्य द्यावे. लक्षात ठेवा, या अष्टपैलू बटाट्याचे पौष्टिक फायदे जास्तीत जास्त वाढविण्यासाठी त्यांचे माफक प्रमाणात आणि निरोगी पदार्थांसह सेवन करणे आवश्यक आहे.”