हळद हा भारतीय घरात वापरला जाणाऱ्या मुख्य पदार्थांपैकी एक आहे. हळदीचा वापर फक्त स्वयंपाकघरात अन्न तयार करताना केला जातो; पण त्याचबरोबर औषधी गुणधर्मांमुळे पारंपरिक विवाह समारंभात आणि सौंदर्य उपचारांसाठीही हळदीचा वापर केला जातो.

डिजिटल निर्माते डॉ. बर्ग यांच्या मते, “जर तुम्हाला संधिवात, टेंडोनिटिस (Tendonitis) व बर्सायटिस (bursitis) यांसारखे ऑटोइम्युन रोग असतील, तर हळदीचे दाहकविरोधी गुणधर्म त्यावर जादूसारखे काम करतात. त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि पायांची सूज कमी होते.” त्याचे परिणाम अनुभवण्यासाठी त्यांनी हा मसाला १४ दिवस खाण्याची शिफारस केली आहे.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

तुमच्या रोजच्या जेवणात हळदीचा समावेश केल्यास काय होईल?

तुमच्या रोजच्या जेवणात हळदीचा समावेश केल्यास काय होईल? याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना बंगळुरू येथी नागरभावी येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आहारतज्ज्ञ भारती कुमार यांनी सलग दोन आठवडे तुमच्या आहारात हळदीचा समावेश करण्यामुळे आरोग्य फायदे होतील याबाबत सांगितले.

हेही वाचा – दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करावे का? जाणून घ्या त्याचे अनेक फायदे आणि काही तोटे

हळदीच्या सेवनाचे फायदे

हळद ट्रायग्लिसराईडची पातळी (Triglyceride levels) व एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यात दाहकविरोधी, अँटीऑक्सिडंट्स व अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात; जे जखमेच्या उपचार आणि संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. हे गुणधर्म संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठीही फायदेशीर आहेत.

हेही वाचा – अभिनेता मोहसिन खानला २०२३ मध्ये आला होता हृदयविकाराचा झटका, फॅटी लिव्हरचे निदान; हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचा काय आहे संबध?

तुम्ही हळदीचे वारंवार सेवन केल्यास आरोग्याला काही धोका संभवतो का?

हळदीचे जास्त सेवन केल्याने अ‍ॅलर्जीची प्रतिक्रिया आणि अतिसार यांसारख्या पाचक समस्या होऊ शकतात. हळदीमध्ये कॅल्शियम ऑक्झलेटदेखील लक्षणीय प्रमाणात असते; ज्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मूतखडा (किडनी स्टोन) तयार होऊ शकतो.

हेही वाचा – दररोज सकाळी मिठाचे पाणी का प्यावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या त्याचे पाच फायदे आणि तोटे

कसा केला जातो हळदीचा आहारात वापर

हळद संपूर्ण स्वरूपात वापरली जाऊ शकते किंवा स्वयंपाकात सुलभतेसाठी बारीक पावडर बनवता येते. भारतीय स्वयंपाकात हळदीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बहुतेक पाककृतींमध्ये चिमूटभर मसाल्याचा रंग आणि आरोग्यासाठी फायद्यांचा वापर केला जातो.

WHO ने शिफारस केल्यानुसार, नियमित आहारात हळदीचे प्रमाण सुमारे २०० मि.ग्रॅ. आहे.

Story img Loader