प्रत्येक माणसाने सात ते आठ तास झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. सात ते आठ तासांपेक्षा कमी झोप झाल्यास त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. बहुतेक लोकांना रात्री चांगली झोप लागत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर त्यांची चिडचिड होते. जे लोक नीट झोप घेत नाहीत, त्यांच्यासाठी ही खरोखरच अतिशय गंभीर समस्या आहे. कित्येकांना कधी कधी रात्री उशिरा झोप लागते. मग अपुऱ्या झोपेमुळे स्वाभाविकपणे सकाळी उठल्यावर सतत चिडचिड होत असते. त्यामुळे त्यांचे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. अशा वेळी अनेकजण झोप येण्यासाठी मेलाटोनिन घेतात. मेलाटोनिन टॅबलेट ही चांगली झोप लागण्यासाठी, झोपेचे चक्र व्यवस्थित करण्याचे काम करते. मात्र, याचे जास्त प्रमाणातील सेवन शरीराचे नुकसान करू शकते.

नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथील डॉ. राशी अग्रवाल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. राशी अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, मेलाटोनिन हा एक संप्रेरक आहे, जो झोपेचे मुख्य कार्य आणि जागे होण्याचे चक्र नियंत्रित करतो. जरी मेलाटोनिनची गोळी नियमितपणे झोपेमध्ये मदत करीत असली तरी त्या गोळीचा सावधगिरीने वापर केला पाहिजे. कारण- जास्त प्रमाणात सेवन केल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

मेलाटोनिनच्या अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम

मेलाटोनिनच्या अत्यधिक वापरामुळे एखाद्याच्या शारीरिक आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम खालीलप्रमाणे :

डोके दुखणे आणि हलकी डोकेदुखी : अतिसेवनामुळे दोन्ही लक्षणे जाणवण्यासारखे संभाव्य दुष्परिणाम होतात.

वर्तणुकीतील बदल : वाढलेली चिंता, ताण हे सर्व जास्त डोस घेण्याचे नकारात्मक परिणाम आहेत.

पोटाच्या समस्या : ओटीपोटात दुखणे किंवा मळमळ होणे अपेक्षित आहे.

झोपेच्या पद्धतींमध्ये बदल : गंमत म्हणजे जास्त वेळ झोपण्याचा प्रयत्न करताना मेलाटोनिनचा उच्च डोस घेणे अजिबात योग्य ठरणार नाही.

किती मेलाटोनिनची शिफारस केली जाते?

डॉ. अग्रवाल यांनी सांगितले की, व्यक्तीचे वय, संवेदनशीलता यांच्या मदतीने त्यांच्या सल्ल्यानुसार डोस घ्यावा लागतो. जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी झोपण्याच्या ३० ते ६० मिनिटे आधी १-३ मिलिग्राम सेवन केले पाहिजे. काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये ५-१० मि.ग्रॅ. वापराची आवश्यकता असू शकते; परंतु तरीही दीर्घ काळापर्यंत सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मेलाटोनिनच्या सेवनापूर्वी आरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मेलाटोनिनचे आरोग्यदायी फायदे

जेव्हा मेलाटोनिनचे डोस योग्य प्रमाणात घेतले जातात तेव्हा तुम्ही सेवनकर्त्याला मिळणाऱ्या चांगल्या झोपेचे तुम्ही निरीक्षण करू शकता; विशेषत: लांब पल्ल्याच्या प्रवासात किंवा निद्रानाश असलेल्या व्यक्तींसाठी. मेलाटोनिन एक अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करून, पेशींचे संरक्षण करण्यास मदत करते आणि त्यांचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते. अशा प्रकारे रोगप्रतिकार शक्ती सुधारणा होते. हा डोस दीर्घकालीन मायग्रेनचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी असू शकतो आणि मानसिक विकारांवर सकारात्मक परिणाम करू शकतो. तसेच मेलाटोनिन तणाव कमी करून, मूड चांगला करू शकते.