तुळस, ज्याला Holy Basil म्हणूनही ओळखले जाते. आयुर्वेदिक औषधांमध्ये अनेक आरोग्य फायद्यांसह एक शक्तिशाली औषधी वनस्पती म्हणून तुळशीला शतकानुशतके आदरणीय स्थान आहे. अलीकडच्या काही वर्षांत, रिकाम्यापोटी तुळशीच्या पानांचे सेवन करण्याची प्रथा आरोग्यप्रेमी आणि नैसर्गिक उपाय शोधणाऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे.

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना हिमाचल प्रदेशातील धरमकोट येथील हिमालयन अय्यंगार योग केंद्राच्या संस्थापक आणि प्रमुख योग शिक्षक शारथ अरोरा यांनी माहिती दिली. अरोरा यांनी सांगितले की, “तुळशीला भारताची औषधी वनस्पती म्हणून महत्त्व आहेच, पण त्याच बरोबर हिंदू संस्कृतीत याला आदरणीय दर्जा आहे आणि ती देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते, जी सर्वांना समृद्धी देते आणि कल्याण करते. भारतात अनेक घरांच्या अंगणात आकर्षक तुळस पाहायला मिळेल, जी हे शुद्धता, संरक्षण आणि आध्यात्मिक भक्तीचे प्रतीक आहे. तुळशीचे पान धार्मिक समारंभात वापरले जाते, देवतांना अर्पण केले जाते आणि अगदी ‘प्रसाद’ म्हणूनही वापरले जाते.”

health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात
poor children collected food
‘जेव्हा पोटातली भूक मर्यादा ओलांडते…’ त्यांनी खरकटं अन्न गोळा करून असं काही केलं… VIDEO पाहून व्हाल भावूक
Here’s what happens to the body if you have ghee water on an empty stomach daily
Ghee: झोपेतून उठताच एक चमचा तुपाचे सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; खाण्याची पद्धतही नीट वाचा
What happens to the body when you sleep at 8 PM and wake up at 4 AM? health tips
जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल? वाचा डॉक्टर काय सांगतात
How eating adulterated ghee affects health
तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडूमध्ये बीफ टॅलो वापरल्याचा दावा! भेसळयुक्त तूप खाल्ल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो?
Amla Water Benefits
सकाळीच नाही रात्रीदेखील आवळा खाण्याचे अनेक फायदे; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

अरोरा सांगतात की, तुळस ही आयुर्वेद, भारताची पारंपरिक औषधप्रणाली, सहस्राब्दीपासून आधारस्तंभ म्हणून ओळखली जाते. आयुर्वेदिक ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची राणी’ आणि ‘अमृत’ म्हणून तुळशीच्या उपचार करणाऱ्या गुणधर्मांवर प्रकाश टाकतात. हा समृद्ध, सांस्कृतिक आणि औषधी वारसा लाभल्याने तुळस ही भारतातील खरोखरच एक अद्वितीय आणि मौल्यवान वनस्पती ठरते.

हेही वाचा – तुम्ही पावसाळ्यात इअरड्रॉप्स वापरता का? आता सोडा ही सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण….

रिकाम्यापोटी तुळशीचे सेवन केल्याने आरोग्याला फायदा होतो. दररोज रिकाम्यापोटी खाल्ल्यास तुळशीचे काय फायदे होतात, याबाबत अरोरा यांनी सांगितले आहे.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते : तुळशीची पाने व्हिटॅमिन सी आणि युजेनॉलसारख्या अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस आहेत. तुळस हे हानिकारक मुक्त रॅडिकल्सचा सामना करते आणि शरीराच्या संरक्षण यंत्रणा मजबूत करतात. नियमित तुळशीची पाने सेवन केल्याने संसर्ग टाळता येतो, आजारांची तीव्रता कमी होते आणि एकूणच रोगप्रतिकारकशक्ती वाढवता येते.

विषारी पदार्थ काढून टाकते : तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढते आणि शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यास मदत होते. हा शुद्धीकरण प्रभाव केवळ मूत्रपिंडाच्या कार्याला मदत करतो, पण त्याचबरोबर रक्त शुद्ध करण्यास मदत करतो आणि चांगली त्वचा आणि निरोगी आरोग्यास प्रोत्साहन देतो.

पचनक्रिया सुधारणे : रिकाम्यापोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पाचक एन्झाईम्सचे उत्पादन उत्तेजित होऊ शकते, पोषक शोषण वाढवते आणि पचन सुरळीत होते. त्याचे दाहकविरोधी गुणधर्म आतड्याच्या अस्तरांनादेखील शांत करू शकतात, अस्वस्थता आणि सूज कमी करतात.

तणाव कमी करणे आणि मूड सुधारणे : तुळशीचे ॲडप्टोजेनिक गुणधर्म शरीराला कॉर्टिसोल पातळी, स्ट्रेस हार्मोनचे नियमन करून तणावाचा सामना करण्यास मदत करतात. हे चिंता कमी करते, मनःस्थिती सुधारते आणि शांततेची आणि निरोगीपणाची जाणीव होऊ शकते.

श्वसनाच्या समस्या दूर करते : शतकानुशतके तुळशीचा उपयोग खोकला, सर्दी आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठी केला जात आहे. त्याचे प्रतिजैविक (antimicrobial) गुणधर्म संसर्गासह लढण्यास मदत करतात, तर त्याचे दाहकविरोधी प्रभाव श्वसन मार्गांना शांत करते, ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते.

रक्तातील साखरेचे नियंत्रण : अभ्यास सुचवितो की, “तुळस इन्सुलिन संवेदनशीलता वाढवून आणि ग्लुकोजच्या वापरास प्रोत्साहन देऊन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. हे विशेषतः मधुमेह असलेल्या किंवा धोका असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते.”

हेही वाचा – अभिनेता रोहित रॉयने १४ दिवसात कमी केले ६ किलो वजन! आयुर्वेदिक पंचकर्म म्हणजे नक्की काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

संभाव्य दुष्परिणाम आणि खबरदारी नेव्हिगेट करणे (Navigating potential side effects and precautions )

अरोरा सांगतात, “तुळशीचे अनेक फायदे असले तरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्त पातळ होणे आणि हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखर कमी होणे) सारखे दुष्परिणाम होऊ शकतात. सुरुवात एक-दोन पानांपासून करा आणि हळूहळू सहन होईल त्यानुसार पानांचे प्रमाण वाढवणे चांगले ठरेल.

तुम्ही गरोदर असाल, स्तनदा माता असला औषधे घेत असाल (विशेषत: रक्त पातळ करणारी किंवा मधुमेहावरील औषधे) किंवा तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, तुमच्या दिनचर्येत तुळशीचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुमचे शरीर तुळशीला कसे प्रतिक्रिया देते याकडे लक्ष द्या. तुम्हाला कोणतेही प्रतिकूल परिणाम जाणवल्यास वापर बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा – रोज थंड पाण्याने अंघोळ केल्यास खरंच वजन कमी होईल का? सुनील छेत्री यांच्या सल्ल्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

चयापचय आणि उर्जेवर तुळशीचा प्रभाव (Tulsi’s impact on metabolism and energy)

रिकाम्यापोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तुमची चयापचय क्रिया मंदावते”, असे अरोरा सांगतात. तुळशीच्या सेवनामुळे, पचनक्रिया सुधारल्याने आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यामुळे शरीराची पोषक तत्त्वांचे शोषण्याची क्षमता वाढते आणि ऊर्जा वाढते; ज्यामुळे दिवसभर चैतन्य वाढते. मज्जासंस्थेवर तुळशीचा शांत प्रभावदेखील शाश्वत ऊर्जा पातळी आणि थकवा कमी करण्यासाठी योगदान देऊ शकतो.”

“तुळशीचे सेवन करण्याचे आदर्श प्रमाण वैयक्तिक गरजा आणि सहनशीलतेवरती आधारित बदलत असल्याने, एकाच आकारात बसणारे कोणतेही उत्तर नाही.” एका सामान्य मार्गदर्शक तत्त्वानुसार, सकाळी रिकाम्यापोटी २-३ पानांनी सुरुवात करा. तुमचे शरीर कशी प्रतिक्रिया देते पाहून तुम्ही हळूहळू ५-६ पाने वाढवू शकता.”

पर्यायी मार्ग म्हणून तुम्ही तुळशीच्या पानांचा चहा म्हणून वापर करू शकता किंवा तुळशीची पाने स्मुदी किंवा सॅलेडमध्ये घालू शकता. लक्षात ठेवा, पूर्ण लाभ घेण्यासाठी दैनंदिन वापराचे लक्ष्य ठेवा.

अरोरा असेही चेतावणी देतात की, “तुळस हा संभाव्य आरोग्य फायद्यांसह एक नैसर्गिक उपाय असला तरी त्याला पारंपरिक वैद्यकीय उपचारांचा पर्याय मानू नये. कोणताही नवीन पूरक आहार किंवा आहाराची पथ्ये सुरू करण्यापूर्वी नेहमी आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या.”

Story img Loader