मीठ हे आपल्या आहारातील एक आवश्यक घटक आहे – ते अन्नाची चव वाढवते, जास्त दिवस अन्न टिकवण्यास मदत करते. पण मीठाचे सेवन करण्याचे काही फायदे आणि काही तोटे देखील आहेत. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्याने अनेक आजार होऊ शकतात विशेषतः उच्च रक्तदाब जो हार्ट अ‍ॅटक आणि स्ट्रोक होण्यास कारणीभूत ठरणारा मुख्य घटक आहे. गरजेपेक्षा जास्त मीठ खाल्यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते किंवा मुतखडा होऊ शकतो. याशिवाय, जास्त मीठयुक्त आहार पोटाचा कर्करोग आणि ऑस्टिओपोरोसिस होण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे एखाद्याने त्यांच्या आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाकावे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. म्हणूनच एका महिन्यासाठी मीठाचे सेवन बंद केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतात? याबाबत इंडियन एक्सप्रेस एक तज्ज्ञांशी चर्चा केली.

याबाबत कोलकत्ता येथील मुकुंदापूरच्या आरएन टागोर हॉस्पिटलमध्ये पोषण आणि आहारतज्ज्ञ स्वेता बोस यांनी ठामपणे सांगितले की,”मानवी शरीर सोडियमशिवाय जगू शकत नाही. जेव्हा तुम्ही एका महिन्यासाठी मीठाचे सेवन पूर्णपणे बंद करता तेव्हा शरीरामध्ये मोठे बदल होतात. सुरुवातीला सोडियमचे सेवन कमी झाल्यामुळे तुमच्या शरीरातील पाणी साठवण्याची क्षमता कमी होते आणि रक्तदाबात तात्पुरती घट जाणवू शकते. कालांतराने, चवीच्या बाबतीत तुम्ही अधिक संवेदनशील होता आणि तुम्हाला जाणवते की, पदार्थांची चव वेगळी किंवा अगदी बेचव आहे. शरीरात अजिबात मीठ नसल्यामुळे इलेक्ट्रोलाइटचे संतलून बिघडू शकते, ज्यामुळे स्नायूंच्या कार्यावर परिणाम होतो जसे की, मळमळ, उलट्या, चक्कर येऊ शकते आणि संपूर्ण शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात

बोस यांनी सांगितले,” आहारातून संपूर्ण मीठाचे सेवन बंद करणे विसराच पण शरीरातील थोडे जरी मीठ कमी झाले तरी एखाद्याला कोमा, शॉक किंवा गंभीर स्थितीमध्ये मृत्यू होण्याची धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच इतर घटकांद्वारे आवश्यक खनिजांचे संतुलित सेवन करणे आणि आहारातील महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. आपल्या शरीराला दररोज ५ ग्रॅम म्हणजे सामान्य व्यक्तीसाठी १ चमचे मीठ आवश्यक असते. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी सारख्या मूत्रपिंड, यकृत किंवा हृदयाशी संबंधित समस्या होत नाहीत, तोपर्यंत आपल्या दैनंदिन आहारात मीठाचे सेवन कमी करू नये.”

हेही वाचा – तुम्ही तीन दिवस झोपला नाहीत, तर तुमच्या शरीर आणि मनावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या …

या मतावर सहमती दर्शवताना मीरा रोड येथील नेफ्रोलॉजिस्ट सल्लागार आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन, पोषणतज्ञ, डॉ. पुनित भुवनिया यांनी सांगितले , शरीरात मीठाच्या कमतरतेमुळे शॉक, कोमा आणि गंभीर स्थितीमध्ये मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. आपल्या जेवणात आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ असल्याने, मीठाच्या कमतरमुळे शरीरावर तितका परिणाम होत नाही. जे प्रौढ व्यक्ती दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ वापरतात, त्यांचा रक्तदाब कमी असतो आणि त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो. मिठाचे सेवन कमी करण्याचा प्राथमिक फायदा म्हणजे उच्च रक्तदाब कमी करणे.

”डॉक्टरांनी विशेष सल्ला दिल्याशिवाय एका महिन्यासाठी मीठ पूर्णपणे सोडून देण्याची शिफारस केली जात नाही. “अति मीठ सेवनाने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, परंतु आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाकल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सोडियम हे विविध शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेले एक आवश्यक खनिज आहे. पुरेश्या प्रमाणात मीठ वापरण्याची आणि आरोग्यदायी सोडियमचे पर्याय निवडण्याची शिफारस केली जाते, जसे की समुद्री मीठ(sea salt), हिमालयीन गुलाबी मीठ (Himalayan pink salt) किंवा संपूर्ण पदार्थांमध्ये आढळणारे नैसर्गिक क्षार” असे बोस यांनी सांगितले.

अ‍ॅथीलिट्सने देखील त्यांच्या आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाकल्यास त्यांना आरोग्याच्या समस्या होण्याचा धोका होऊ शकतो. “हायपोनाट्रेमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात सामान्यपणे कार्य करण्यासाठी पुरेसे मीठ नसते. मिठाच्या सेवनाशिवाय चांगला अ‍ॅथीलिटही दोन दिवसांत आजारी पडू शकतो. हृदय आणि स्नायूंच्या आवश्यक कार्यासाठी मीठ गरजेचे असल्याने, heart failure हा मुख्य धोका आहे,” असे डॉ भुवानिया सांगितले.

मिठाच्या सेवनाबाबत परिपूर्ण संतुलन कसे साधता येईल? त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि त्याचे फायदे मिळवण्यासाठी काय करावे? या घटकांचा विचार करून बोस म्हणाले की ”मीठ पूर्णपणे काढून टाकण्याऐवजी, आरोग्यदायी पर्याय निवडणे आणि एकूण सोडियमचे सेवन कमी करणे योग्य आहे. काही आरोग्यदायी पर्यायांमध्ये स्वयंपाकात लसूण, आले, हळद, ओरेगॅनो, किंवा दालचिनी, पुदीना, तुळस, जायफळ, पेपरिका यांसारख्या चव वाढवण्यासाठी औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करणे गरजेच आहे,”

हेही वाचा – सकाळी सकाळी बडीशेपचे पाणी पिणे फायदेशीर का ठरते? आहारतज्ञांकडून जाणून घ्या

डॉ. भुवानिया यांनी सहमती दर्शवली आणि सांगितले की, ”औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर हा मीठाच्या अतिसेवनासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.

याव्यतिरिक्त, ताजे लिंबू किंवा लिंबाचा रस, व्हिनेगर किंवा कमी-सोडियम सोया सॉस वापरल्याने पदार्थांना आंबट चव येऊ शकते.ताजे पदार्थ निवडणे आणि घरी जेवण तयार केल्याने मीठाचे सेवन अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते. फळे आणि भाज्यांचा सेवन वाढवणे, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या सोडियमचे प्रमाण कमी असते, ते देखील निरोगी आहारासाठी उपयूक्त ठरू शकतो.