आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधाने दिवसाची सुरुवात करणे ही गुरुकिल्ली असू शकते. यासाठी एक ग्लास ताज्या पालकाच्या रसाचा आनंद घेण्यापेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकतो? पालकाचा रस ऐकताच नाक मुरडण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर सर्वप्रथम हे हिरवे अमृत पिण्याचे अनेक फायदे काय आहेत हे समजून घ्या. पालकाचा रस पिण्याचे फायदे आणि ते तुमच्या आहारात समाविष्ट करण्याचे सर्वोत्तम मार्ग याबद्दल तज्ज्ञांचे काय मत आहे जाणून घ्या..
पालकाच्या रसाचे फायदे
इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना चेन्नई येथील ‘द क्लेफ्ट अँड क्रॅनियोफेशियल सेंटर आणि श्री बालाजी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल’च्या नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी म्हणाल्या की, ” सकाळी उठल्यानंतर पालकाचा रस प्यायल्यास अनेक आरोग्य फायदे मिळतात, ज्यामध्ये हायड्रेशन, डिटॉक्सिफिकेशन यांचा समावेश होतो; कारण त्यात पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचन सुधारणे यांचा समावेश आहे. “हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, लोहसह लाल रक्तपेशींच्या उत्पादनास समर्थन देते आणि ऊर्जा आणि सहनशक्ती वाढवते.”
इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना चेन्नईतील श्री रामचंद्र उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेतील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि लेक्चरर सी. व्ही. ऐश्वर्या यांनी सांगितले की, “पालकाच्या रसात व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि ल्युटीनसारख्या अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे निरोगी त्वचा, मजबूत केस आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.”
“पालकातील नायट्रेट्स रक्ताभिसरण सुधारून हृदयाच्या आरोग्यास योगदान देतात, तर त्यातील व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम हाडे बळकट करतात. त्यातील ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनचे प्रमाण वयाशी संबंधित मॅक्युलर डीजनरेशनचा धोका (age-related macular degeneration,) कमी करून दृष्टीचे (protect vision) संरक्षण करण्यास मदत करते,” असे ती म्हणाली.
ऐश्वर्या पुष्टी करतात की, “रिकाम्या पोटी पालकाचा रस पिणे सामान्यतः सुरक्षित असते आणि पोषक तत्त्वाचे शोषण, हायड्रेशन आणि पचन सुधारते.”
पालकाच्या रसात फायबर आणि पोटॅशियमदेखील भरपूर प्रमाणात असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करून हृदयाच्या आरोग्यास मदत करतात. नियमित सेवनाने रक्ताभिसरण सुधारते, लोहाचे शोषण वाढते आणि वजन व्यवस्थापनात मदत होते, परंतु बहुतेक व्यक्तींसाठी दररोज १२०-२४० मिली पालकाचा रस पुरेसा असतो. पण, आरोग्य उपाय म्हणून फक्त पालक रस पिण्याऐवजी त्याचबरोबर भाज्या, फळे, प्रथिने आणि निरोगी फॅट्सयुक्त संतुलित आहार घ्यावा.
तुम्ही काय लक्षात ठेवावे? (What should you keep in mind)
दीपलक्ष्मी यांनी इशारा दिला की, “जास्त प्रमाणात पालक रसाचे सेवन केल्याने शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त होऊ शकते, जे लोह शोषण्यास अडथळा आणू शकते. याला तोंड देण्यासाठी लिंबाचा रस किंवा संत्र्यासारख्या व्हिटॅमिन सी स्त्रोतांसह पालकाचा रस मिसळल्याने लोहाची जैवउपलब्धता वाढू शकते. त्यांनी आठवड्यातून तीन ते चार वेळा पालकाचा रस कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला आहे.”
“जास्तीत जास्त फायद्यांसाठी, फायबर टिकवून ठेवण्यासाठी पालकाचा रस प्या, कारण ते पचनास मदत करते आणि तृप्ततेला प्रोत्साहन देते. काकडीसारख्या इतर हायड्रेटिंग आणि अल्कधर्मी घटकांसह त्याचे सेवन केल्यास पौष्टिक मूल्य आणखी वाढू शकते.
दीपलक्ष्मी यांनी दुग्धजन्य पदार्थांसह पालकाचा रस न घेण्याचा सल्ला दिला, कारण कॅल्शियम लोह शोषणात व्यत्यय आणू शकते.