“सलग ७२ तासांच्या उपवासाला तीन दिवस पाणी पिऊन केलेला उपवास म्हणून ओळखले जाते. हा उपवास केल्यानंतर तुमच्या शरीरावर विविध परिणाम होतात. सुरुवातीला तुमच्या शरीरात साठवलेले ग्लायकोजेन (Glycogen) ऊर्जा म्हणून वापरले जाते; ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते. जसजसा उपवास चालू राहतो, तसतसे शरीराचे केटोसिसमध्ये (Ketosis) रूपांतर होते; जे उर्जेसाठी फॅट्सचा वापर करते. ही चयापचयाची स्थिती वजन कमी करण्यास मदत करू शकते,” असे गुरुग्रामच्या नारायणा हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसीन विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. पंकज वर्मा यांनी सांगितले आहे.

उपवासादरम्यान इन्सुलिनच्या पातळीत संभाव्य घट झाल्याने इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin Sensitivity) सुधारते. “ऑटोफॅजी (Autophagy) ही एक प्रक्रिया आहे; जिथे शरीर खराब झालेल्या पेशी काढून टाकते. ही प्रक्रियादेखील वाढू शकते; ज्यामुळे पेशींसंबंधित आरोग्यास (Cellular Health) फायदा होतो,” असे डॉ. वर्मा यांनी स्पष्ट केले.

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती

सलग ७२ तास उपवास केल्याने एकत्रितपणे सात हजार कॅलरीजची घट होते; जी दोन पौंड फॅट्सच्या समान असते. “जर ७२ तासांचा उपवास जास्त काळ केला, तर त्याचा वजनावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि अडॅप्टिव्ह थर्मोजेनेसिसमुळे (Adaptive Thermogenesis) वजन वाढू शकते. अशा उपवासांमध्ये पुरेसे पाणी, इलेक्ट्रोलाइट, जीवनसत्त्वे, खनिजे भरून काढण्याची खात्री केली पाहिजे,” असे डॉ. दिलीप गुडे, वरिष्ठ सल्लागार फिजिशियन, यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद यांनी नमूद केले.

पण, जास्त तास उपवास करण्याचे तोटे असू शकतात. पोषक घटकांची कमतरता उदभवू शकते; ज्यामुळे संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.

हेही वाचा – ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते का? संशोधनाबाबत काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या 

“शरीर पर्यायी ऊर्जास्रोत शोधत असल्याने स्नायूंचे वस्तुमान (Muscle mass) कमी होऊ शकते. निर्जलीकरण (Dehydration) ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे द्रवपदार्थांचे योग्य तेवढे सेवन केले जाणे आवश्यक आहे,” डॉ. वर्मा यांनी सांगितले.

७२ तासांचा उपवास ‘धोकादायक’ आहे, असे डॉ. गुडे यांनी सांगितले. याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “७२ तासांचा उपवास सहसा शरीराच्या चयापचय क्रियेला केटोन्सकडे (ketones) ढकलतो आणि हे लघवीतील केटोन्स शरीरामध्ये (Starvation Ketosis) दिसून येते. (केटोन्स हे एक प्रकारचे रसायन आहे; जे यकृत जेव्हा फॅट्स वापरते तेव्हा तयार करते. या केटोन्सचा विशेषत: उपवास करताना, दीर्घकाळ व्यायाम करताना किंवा शरीरात जास्त कर्बोदके नसताना तुमचे शरीर उर्जेसाठी वापर करते.)

“असे दीर्घकाळ उपवास कोणत्याही देखरेखीशिवाय करणे बहुतांशी धोकादायक असते. हा उपवास करताना जर निर्जलीकरणाची समस्या निर्माण झाली, तर मूत्रपिंडाला बरी न होणारी दुखापत होऊ शकते. हायपोटेन्शन (Hypotension), अॅरिथिमिया (Arrhythmias) व हायपरयुरिसेमिया (Hyperuricemia) यांसारखे आजार, सोडियम, कॅल्शियम व मॅग्नेशियमची कमतरता, लीन मसल्स कमी होणे आणि आम्लयुक्त लघवी (Acidic urine) यांसारखे विविध आजार होऊ शकतात,” असे डॉ. गुडे यांनी सांगितले.

हेही वाचा – आलिंगन किंवा मिठी मारणे हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

”उपवासाचे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात आणि दीर्घकाळ उपवास करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ज्यांना आरोग्याशी संबंधित कोणताही त्रास आहे त्यांनी, विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांनी असे उपवास टाळावेत,” असेही डॉ. गुडे म्हणाले.

डॉ. वर्मा यांच्या मते, “अधूनमधून उपवास केल्याने संभाव्य आरोग्य फायदे दिसून आले आहेत. परंतु, अन्नाशिवाय जास्त कालावधीसाठी उपवास करताना काळजी घेणे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.”

हेही वाचा – ‘पेपा पिग’, ‘कोको मेलन’ आणि ‘कार्टून मॅरथॉन’ पाहण्यामुळे तुमची मुलं ‘zombie’ झाली आहेत का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

याबाबत सहमती दर्शवीत डॉ. गुडे यांनी सांगितले की, नियंत्रित पद्धतीने उपवास करण्याचे कर्करोग, हृदय बंद पडणे, Parkinson’s /अल्झायमर व इतर न्यूरोडीजनरेटिव्ह (Neurodegenerative) विकार टाळण्याच्या दृष्टीने फायदे दिसून आले आहेत. “चांगल्या जीवाणूंची वाढ होणे आणि वाईट जीवाणू कमी होणे यांसारखे अनुकूल रोगप्रतिकारक प्रतिसादही दिसून येतात. ठरावीक कालावधीसाठी उपवास केल्याने यकृत एन्झाइम (Liver enzymes- एन्झाइम हे सर्व सजीवांतील जैविक क्रिया चालू ठेवणारी वैशिष्ट्यपूर्ण रसायन आहे)देखील सुधारू शकतात. त्यामुळे दीर्घायुष्य मिळू शकते. इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin sensitivity) सुधारते. तसेच नियंत्रित आणि देखरेखीखाली उपवास केल्यास प्री-डायबेटिक अवस्थेतून बाहेर पडण्याचा फायदा मिळू शकतो,” असे डॉ. गुडे म्हणाले.

Story img Loader