हिवाळ्यात थंडी जाणवत असताना आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पर्यायांचा शोध घेत असतो. असंख्य उपायांपैकी एक म्हणजे लिंबू आणि मध पाण्यात टाकून पिण्यामुळे आरामदायी भावना निर्माण होते. या उपायाचे काही संभाव्य फायदेदेखील आहेत. रोग-प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते तुमच्या त्वचेला नवचैतन्य देण्यापर्यंत त्याचे अनेक फायदे आहे. लिंबू-मध पाणी हे अत्यंत साधे; पण शक्तिशाली मिश्रण आहे. या पेयाचा हिवाळ्यात तुमच्या शरीरावर सर्वांगीण परिणाम होऊ शकतो.

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मुंबईतील क्लिनिकल डाएटिशियन आणि डायबिटीज एज्युकेटर, सल्लागार पूजा शाह भावे यांनी सांगितले, “हे पेय सामान्यतः आरोग्यदायी मानले जात असले तरी त्यामुळे तुमच्या आरोग्यावर फारसा फरक पडत नाही”. “पाण्यात ताजे लिंबू पिळून ताबडतोब सेवन केले, तर असे पेय जीवनसत्त्व कचा एक उत्तम स्रोत आहे; परंतु जर तुम्ही हे पाणी गरम केले, तर जीवनसत्त्व क लगेचच नष्ट होईल.”

Why papaya is the perfect fruit in winter season as per Ayurveda papaya juice benefit in winter
हिवाळ्यात ‘पपईचा ज्यूस’ प्रत्येकानं प्यायलाच हवा; फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
water intake
पाणी कसे व किती प्यावे?
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
is alcohol good for health
दारू प्यावी का? आयुर्वेद काय सांगतं?
healthy honey
भेसळयुक्त मध कसा ओळखावा? चांगला मध शरीराला कसा फायदेशीर ठरतो?
Why Drinking Cold Water May Not Be Good For Your Digestive System, As Per Experts
थंड पाणी सोडून रोज कोमट पाणी प्यायलं तर शरिरावर काय परिणाम होतील? तज्ज्ञांनी सांगितले आश्चर्यकारक फायदे

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना कोचीस्थित अमृता हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन विभागाच्या आहारतज्ज्ञ अनस्वरा लश्मी पीएस (Anaswara Lashmi PS) यांनी या पेयाचे फायदे आणि तोटे स्पष्ट केले आहेत.

हेही वाचा – धूम्रपान न करणार्‍यापेक्षा धूम्रपान करणार्‍याला मधुमेह होण्याचा धोका तिप्पट का असतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…

लिंबू-मध पाणी पिण्याचे फायदे

  • रोग-प्रतिकारशक्तीत होईल वाढ : लिंबामध्ये उच्चस्तरीय क जीवनसत्त्व असल्याने ते रोग-प्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते. हिवाळ्यातील आजारांपासून बचाव करण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे.
  • घसा खवखवण्यापासून मिळेल आराम : मधातील जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म घसा खवखवण्यापासून आराम देतो; जो हिवाळ्यातील एक सामान्य आजार आहे.
  • शरीरातील पाण्याची कमतरता होईल दूर : हे पेय शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते आणि शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी राखते. ही बाब थंडीच्या महिन्यांत आवश्यक असते.
  • पोषक घटकांचा पुरवठा : लिंबू अँटिऑक्सिडंट्स देते; तर मध दाहकविरोधी गुणधर्म प्रदान करतो.
  • पचनसंस्थेच्या कार्यात सुधारणा : लिंबाचा आंबटपणा पाचक एंझाइम्सना उत्तेजित करतो आणि मध प्री-बायोटिक म्हणून कार्य करते. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य म्हणजे पचनसंस्थेचे कार्य सुधारते.
  • चयापचयाला देईल समर्थन : काही अभ्यास असे सूचित करतात, “लिंबू आणि मध चयापचयामध्ये मदत करू शकतात. संभाव्यत: फॅट्सच्या विघटनास समर्थन देतात. लिंबूमध्ये पॉलीफेनॉल घटक असतात; जे लिपीड (फॅट्स) चयापचयावर (Lipid metabolism) सकारात्मक परिणाम करू शकतात. त्याचप्रमाणे मधाचे हळूहळू ग्लुकोज सोडण्यात योगदान मिळू शकते. ऊर्जा चयापचयाला (पोषक घटकांपासून ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया) मदत करते.
  • भूक निंयत्रित करेल : लिंबू आणि मध यांचे मिश्रण भूक नियंत्रित करण्यास मदत करू शकते, परिपूर्णतेची भावना वाढवते आणि संभाव्य वजन नियंत्रणास मदत करते.

हेही वाचा – तुम्ही वारंवार फोन बघता का किंवा वारंवार हात धुता का? तुम्हाला OCD असू शकतो; OCD म्हणजे नेमकं काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या… 

लिंबू-मध पाणी पिण्याचे तोटे

  • दातांवर विपरीत परिणाम : लिंबामधील आंबट गुणधर्मामुळे जर त्याचे जास्त प्रमाणात सेवन केले गेले, तर त्याचा दातांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लिंबू पाणी प्यायल्यानंतर तोंड स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जातो.
  • अॅलर्जी असलेल्यांना वर्ज्य : लिंबूवर्गीय फळे किंवा मधाची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी हे या दोहोंनी तयार केलेले पेय टाळावे.
  • कॅलरीजमध्ये घट : जास्त प्रमाणात मधाचे सेवन केल्याने कॅलरीज कमी होऊ शकतात. त्यामुळे मधुमेहींनी सावध राहावे.
  • जळजळ : लिंबाच्या आंबटपणामुळे काही लोकांमध्ये जळजळ होण्याची लक्षणे वाढू शकतात
  • दातांच्या समस्या : मधातील साखर आणि लिंबाची आम्लता यांच्या मिश्रणामुळे या पेयाच्या सेवनानंतर तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्यास दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात
  • पोटासंबंधित समस्या : काहींना अस्वस्थता, सूज येणे किंवा अतिसाराचा अनुभव येऊ शकतो; विशेषत: रिकाम्या पोटी प्यायल्यास हा त्रास होऊ शकतो.

हेही वाचा – रताळे, पपई, संत्री आणि गाजर यांच्यात काय साम्य आहे, जो त्यांना सुपरफूड बनवतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर

लिंबू-मध पाणी कोणी टाळावे

मधुमेही व्यक्तींनी मध टाळावा. कारण जशी साखर खाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते त्याप्रमाणेही मध खाल्यानंतरही वाढते. असे भावे यांनी स्पष्ट केले. “तसेच हृदयरोगी, लठ्ठ व्यक्ती, उच्च ट्रायग्लिसराइड्स असलेल्या व्यक्ती, वजन नियंत्रित करू इच्छिणारे आणि फिटनेस फ्रिक; ज्यांना साखर टाळण्याचा सल्ला दिला जातो किंवा साखर टाळायची इच्छा असते, त्यांनीदेखील मधाचे सेवन टाळावे. ते साधे लिंबू पाणी घेऊ शकतात

लश्मी यांच्या म्हणण्यानुसार, कर्करोगाच्या रुग्णांनादेखील साखर किंवा साखरयुक्त पदार्थ बंद करण्याचा सल्ला दिला जातो. कारण- ट्युमर साखरेचा वापर करतो आणि तो वेगाने वाढतो. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांनीही मध टाळावा. काही लोकांना लिंबूवर्गीय फळांची अॅलर्जी असते. कारण- त्यांना खोकला आणि सर्दीचा त्रास होतो. त्यांनीही लिंबू पाणी टाळावे.

Story img Loader