जेवणानंतर गोड पदार्थ खाणे ही अनेकांच्या घरात सामान्य गोष्ट आहे. जेवणानंतर काहीतरी गोड खायला मिळाले म्हणजे जेवण पूर्ण झाल्याचे समाधान मिळते. पण, रोज रात्री जेवल्यानंतर गोड खाण्याच्या या सवयीचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार कोणी करीत नाही.
चयापचयापासून ते झोपेपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होतो. काही संभाव्य परिणाम दीर्घकाळापर्यंत दिसून येतात. तुम्ही रात्री काय अन्न खाता आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हा विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे.
मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट केले की, जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने इन्सुलिनचा प्रतिकार (Insulin Resistance) होऊ शकतो; ज्यामुळे टाईप-२ मधुमेहाचा धोका वाढतो. “शरीर अतिरिक्त साखरेचे फॅट्समध्ये रूपांतर करते आणि चयापचयावर परिणाम करणारी ही बाब लठ्ठपणाला कारणीभूत ठरते.”
नियमितपणे साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने ट्रायग्लिसराइडची पातळी (Triglyceride levels) वाढू शकते. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्यादेखील वाढू शकतात. त्याशिवाय साखरेची पातळी सतत उच्च राहण्यामुळे जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होऊ शकतो. अकाली वृद्धत्व येऊ शकते; जी बाब संभाव्यतः दीर्घकालीन आजारांना (Chronic diseases) होण्यास कारणीभूत ठरू शकते. या सवयीमुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे एकूणच आरोग्यावर परिणाम होतो.
याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना खार येथील पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल रिसर्च सेंटरच्या डॉ. रुतू धोडपकर यांनी सांगितले की, त्याचे काही सकारात्मक फायदेही आहेत. “मिठाई रात्रीच्या जेवणानंतर चांगली भावना निर्माण करते आणि जेवण केल्यानंतर गोड खाल्ले, तर समाधान मिळते. कारण- शरीरात डोपामाइन हा न्यूरोट्रान्समीटर सोडला जातो; जो आनंदासाठी जबाबदार असतो आणि त्यामुळे समाधानाची भावना निर्माण होते. तसेच मूड सुधारण्यासाठी जबाबदार असलेला एंडोमॉर्फिनदेखील शरीरात सोडला जातो.”
त्यांनी पुढे असे स्पष्ट केले, “ज्यांना पौष्टिकतेची कमतरता आहे आणि वजन कमी आहे, त्यांच्यासाठी गोड पदार्थ खाणे फायदेशीर ठरू शकते; जेणेकरून मुख्य जेवणादरम्यान आणि झोपेच्या वेळीदेखील पौष्टिक गरजा पूर्ण होऊ शकतात.”
रोज गोड पदार्थाचे सेवन तुम्हाला दीर्घकालीन नुकसान पोहोचवू शकते का?
- रात्रीच्या जेवणानंतर मिठाईचे वारंवार सेवन केल्याने अनेक दीर्घकालीन धोके निर्माण होतात.
- जास्त साखरेच्या सेवनामुळे वजन वाढणे, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता (insulin resistance) आणि मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजाराचा धोका उदभवू शकतो.
- साखरेचे उच्च पातळीमध्ये सतत सेवन करण्याची सवय हार्मोन्स संतुलनात व्यत्यय आणू शकते.
- चुकीच्या आहाराच्या निवडीमुळे पौष्टिकतेची कमतरता होऊ शकते.
हेही वाचा – हिवाळ्यात येणारा हार्ट अटॅक टाळण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे फायदेशीर ठरेल का?
तुम्हाला या समस्यांचा जास्त धोका आहे का?
काही आरोग्य स्थिती किंवा पूर्वस्थिती असणाऱ्या व्यक्तींनी दररोज गोड पदार्थांचे सेवन करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
- ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी साखरेचे काळजीपूर्वक सेवन केले पाहिजे.
- लठ्ठपणा किंवा हृदयाशी संबंधित समस्यांशी झुंजत असलेल्या व्यक्तींनी उच्च कॅलरीज आणि साखरयुक्त पदार्थ मर्यादित केले पाहिजेत.
- ज्यांना जळजळ किंवा स्वयंप्रतिकार विकार होण्याची शक्यता असते, त्यांना कमी साखरयुक्त आहाराचा फायदा होऊ शकतो.
- विशिष्ट आहाराची अॅलर्जी असलेल्या कोणालाही त्यांच्या गरजेनुसार गोड पदार्थ निवडावेत.
- गरोदर महिलांनी गर्भावस्थेत चांगल्या आरोग्यासाठी साखरेच्या सेवनाचे प्रमाण लक्षात घेतले पाहिजे.
- वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींनी वैयक्तिक सल्ला आणि अनुरूप आहारविषयक शिफारशींसाठी आहारतज्ज्ञ किंवा आरोग्य सेवेतील व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा – एखाद्या व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबाने काय केले पाहिजे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात….
आपण या समस्यांचा सामना कसा करू शकता?
दैनंदिन गोड पदार्थांच्या सेवनाच्या प्रतिकूल परिणामांचा सामना करण्यासाठी पोषणासाठी संतुलित आणि सजग दृष्टिकोन स्वीकारणे समाविष्ट आहे. त्या दृष्टीने पालन करावयाच्या बाबी खालीलप्रमाणे :
- साखरेच्या पदार्थांचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे आणि सेवन करताना पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देणे.
- चयापचय वाढविण्यासाठी आणि वजन नियंत्रित करण्यासाठी तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात नियमित शारीरिक व्यायामाचा समावेश करा.
- किती प्रमाणात गोड पदार्थ खाता याकडे लक्ष द्या आणि असे आरोग्यदायी गोड पदार्थ निवडा की, ज्यातून कॅलरीज आणि साखरेचे सेवन कमी होईल.
- नियमित आरोग्य तपासणी करा. त्यामुळे संभाव्य समस्यांचे निरीक्षण केले जाऊन, आवश्यक ती उपाययोजना वेळीच केली जाऊ शकेल.
- प्रत्येक घासाचा आस्वाद घेणे आणि तृप्त झाल्याचे संकेत ओळखणे यांसारख्या सजगतेने खाण्याच्या सवयी जोपासा; ज्या अन्नाशी निरोगी संबंध वाढवतात.
डॉ. सामंत म्हणाल्या, “एक समग्र दृष्टिकोन, पौष्टिक आहार, व्यायाम व सजग सवयी यांचा मेळ घातल्यास अतिगोड पदार्थ सेवनाशी संबंधित दीर्घकालीन धोके लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात.