हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी सुक्या मेव्याचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. रोज सुका मेवा खाल्ल्याने हृदय, मन व शरीर तंदुरुस्त राहते. सुका मेवा खाल्ल्याने वजन कमी तर होतेच; शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर व हेल्दी फॅट्स यांसारखे अनेक पोषक घटक असतात; जे मेंदूला गती देऊ शकतात. त्यासोबतच अनेकांची स्मरणशक्ती वाढवते. थायरॉइडसारख्या समस्या दूर करण्यासाठीही सुका मेवा प्रभावी ठरू शकतो.

अक्रोड खाल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात, हे तुम्हाला माहीत असेलच. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते; जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. अक्रोड हे लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम व सेलेनियम यांसारख्या पोषक घटकांचे भांडार आहे. बहुतेक लोक अक्रोड भिजवून खातात; तर अनेक लोक अक्रोड न भिजवता खातात. परंतु, रोज सकाळी अक्रोड खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का? याविषयी हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्सच्या सल्लागार व क्लिनिकल आहारतज्ज्ञ डॉ. जी. सुषमा यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Pistachios Health Benefits
पिस्ता आरोग्यासाठी चांगला…पण दिवसात कधी आणि किती खावा? जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
know pistachio benefits for health it keep heart healthy in many ways
हिवाळ्यात पिस्ता खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या
Benefits of eating Walnut
अक्रोड एक सुपर फूड; ‘हे’ आरोग्यदायक फायदे तुम्हाला माहित आहेत का?
sesame seeds benefits
‘या’ ४ आजारांवर औषधाप्रमाणे काम करतात पांढरे तीळ; फक्त कधी आणि कसे खावेत जाणून घ्या
Tulasi Water Benefits :
Tulsi Water: सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्या; शरीराला मिळतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला

आहारतज्ज्ञ सांगतात, “अक्रोडचा वापर सुका मेवा म्हणून केला जातो. अक्रोड हे मेंदूच्या कार्यक्षतेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. अक्रोडमध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे तसेच लोह, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, मॅग्नेशियम, ओमेगा -३ फॅटी अॅसिडसह इतर अनेक घटक असतात. हे सर्व घटक आपल्या शरीराला विविध रोगांशी लढण्यात मदत करतात आणि शरीराला त्याचा फायदा होतो. अक्रोडमध्ये भरपूर फायबर्स असतात. त्यामुळे आपली पचनक्रिया निरोगी राहते. त्यासोबतच भिजवलेले अक्रोड पचायलाही सोपे असतात.

(हे ही वाचा : ‘हे’ एक फळ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी, साखर नियंत्रणात अन् बद्धकोष्ठता होईल दूर? समजून घ्या खाण्याची पद्धत तज्ज्ञांकडून…)

रोज सकाळी अक्रोड खाण्याचे फायदे

१. मधुमेहाच्या रुग्णांसाठी अक्रोड खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. त्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

२. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात; जे हृदयाला आजारांपासून दूर ठेवतात.

३. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते; जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकते आणि त्यामुळे तुमचे वाढते वजन कमी होऊ शकते.

४.अक्रोडात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.

५. अक्रोडमध्ये असलेले व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक तुमचा मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतात.

६. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडाचे सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. विशेषत: याच्या सेवनाने तुम्हाला टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी होतो.

(हे ही वाचा : नसांमध्ये जमलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतील ‘या’ बिया? कधी व किती सेवन करावे तज्ज्ञांकडून समजून घ्या…)

सकाळी आहारात अक्रोडाचा समावेश केल्याने होणारे नुकसान

१. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणाक कॅलरीज व फायबर्स असतात आणि त्यामुळे याचे जास्त सेवन केल्यास तुमचे वजन वाढू शकते.

२. जास्त प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो.

३. अक्रोडाचे जास्त सेवन केल्याने दमा होऊ शकतो. जर तुम्हाला आधीच दमा असेल, तर अक्रोड खाणे टाळा.

४. अक्रोड खाण्यामुळे काही व्यक्तींना अॅलर्जी आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो. दमा असलेल्या रुग्णांनी आणि गरोदर महिलांनी आहारात अक्रोडचा समावेश करण्यापूर्वी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, असेही त्या सांगतात.

अशा प्रकारे, दररोज अक्रोड खाणे आवश्यक आहे. मात्र, जास्त प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.