ऑलिव्ह ऑइल जगभरातील स्वयंपाकघरांत एक मुख्य पदार्थ म्हणून सर्रास वापरला जातो. ऑलिव्ह आइलची स्वादिष्ट चव आणि आरोग्य फायद्यांमुळे ते लोकप्रिय आहे. पण, फक्त ऑलिव्ह ऑइल वापरून स्वयंपाक करणे ही खरोखरच चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे का? चला ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाबाबत विज्ञान काय सांगते हे पाहू या. फक्त ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजविलेल्या अन्नाचे सेवन केल्यास त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊ या
ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजविलेले अन्न खाण्याचे फायदे काय आहेत?
हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सते वरिष्ठ सल्लागार चिकित्सक व मधुमेह तज्ज्ञ डॉ. के. सोमनाथ गुप्ता यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाबाबतच्या सकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकला. ऑलिव्ह ऑइल हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असते. मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सला चांगले फॅट्स मानले जातात. हे चांगले फॅट्स ऑलिव्ह ऑइलच्या सेवनामुळे मिळणाऱ्या फायद्यांमध्ये मुख्य भूमिका बजावतात.
खराब कोलेस्ट्रॉल कमी करणे : मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स LDL किंवा खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात; ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. जागतिक पातळीवर होणाऱ्या मृत्यूंचे हृदयविकार हे प्रमुख कारण आहे.
अँटिऑक्सिडंट पॉवरहाऊस : ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई आणि पॉलीफेनॉल यांसारखे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध घटक आहेत. हे घटक शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढतात. हे मुक्त रॅडिकल्स शरीरातील दाह किंवा सूज आणि दीर्घकाळ टिकणारे आजार होण्यास कारणीभूत ठरू शकतात.
हेही वाचा – जेवण केल्यानंतर तुम्हाला स्नॅक्स खाण्याची सवय आहे का? जाणून घ्या याचे दुष्परिणाम, तज्ज्ञ सांगतात…
ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजविलेल्या अन्नसेवनामुळे मिळणारे दीर्घकालीन फायदे कोणते?
डॉ. गुप्ता यांच्या मते, अभ्यास असे सूचित करतात की, आपल्या आहारात ऑलिव्ह ऑइलचा समावेश केल्याने लक्षणीय दीर्घकालीन फायदे मिळू शकतात.
क्रॉनिक डिसीज डिफेन्स : ऑलिव्ह ऑइलचे सेवन आणि हृदयविकार, स्ट्रोक, अगदी काही कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करणे यांच्यातील संभाव्य संबंध संशोधनातून समोर आले आहेत.
रक्तातील साखरेवर नियंत्रण : ऑलिव्ह ऑइलमधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स इन्सुलिन संवेदनशीलता आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यात सुधारू घडवून आणू शकतात. संभाव्यतः ते टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी करू शकतात.
अँटी-एजिंग ॲल्युअर : ऑलिव्ह ऑइलमधील अँटीऑक्सिडंट्समध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असू शकतात आणि ते संज्ञानात्मक घट होण्यापासून काही संरक्षण देऊ शकतात.
हेही वाचा – वजन कमी करण्याचे हे औषध हृदयविकाराचा झटका टाळू शकते का? Semaglutide बाबत काय सांगतात डॉक्टर?
ऑलिव्ह ऑइलचे काही दुष्परिणाम होतात का?
ऑलिव्ह ऑइल हा आरोग्यदायी पर्याय म्हणून चमकत असताना, डॉ. गुप्ता यांनी ऑलिव्ह ऑईलचे अति सेवन करण्यापासून सावध केले:
उष्मांक चेतना : सर्व फॅट्सप्रमाणे ऑलिव्ह ऑइल कॅलरीजने समृद्ध आहे. त्यामुळे वजन वाढू नये म्हणून ऑलिव्ह ऑइलचे प्रमाणातच सेवन करायला हवे.
पचनाच्या समस्या: जास्त प्रमाणात ऑलिव्ह ऑईलचे सेवन केल्याने काही व्यक्तींमध्ये फुगणे किंवा अतिसार यांसारख्या पचनाच्या समस्या उदभवू शकतात.
धुरामुळे होऊ शकतो त्रास : ऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक खाद्यपदार्थ तळताना सामान्य तेलापेक्षा जास्त धूर निर्माण होतो. तसेच, हे तेल खूप उच्च तापमानात दीर्घकाळपर्यंत गरम केल्यास खराब होऊ शकते आणि हानिकारक संयुगे तयार होऊ शकतात.
संतुलित आहारामध्ये ऑलिव्ह ऑइलचा समावेश केल्याने बहुतेक लोकांसाठी असंख्य संभाव्य फायदे होतात. पण, तरीही हे लक्षात ठेवा की, संयम महत्त्वाचा आहे. ऑलिव्ह ऑइलचा स्वयंपाकासाठी प्रमाणात वापर करा आणि निरोगी व वैविध्यपूर्ण आहाराच्या चौकटीत त्याच्या स्वादिष्ट चवीचा आनंद घ्या. ऑलिव्ह ऑइलच्या वापराबद्दल तुम्हाला काही चिंता असल्यास, वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुमच्या डॉक्टरांचा किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.