अनेकदा लोक पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज सारखे फास्ट-फूड खाताना थंडगार सोडायुक्त पेय पितात. बऱ्याच लोकांसाठी, थंड सोडा तहान भागवण्याबरोबरच संपूर्ण अन्नाचा स्वाद वाढवतो. पण, सोडायुक्त पेय आरोग्यासाठी धोका वाढवू शकतात. याबाबत डॉक्टरांनी वारंवार चेतावणी देऊनही लोक बिनधास्तपणे या पेयांचा आस्वाद घेतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही सोडायुक्त पेय पिता तेव्हा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही सोडायुक्त शीतपेये पिता तेव्हा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो?

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील आहारतज्ज्ञ डॉ. एकता सिंघवाल स्पष्ट करतात की, जेव्हा आपण सोडायुक्त पेय पितो तेव्हा कार्बन डाय ऑक्सायझेन प्रक्रियेतून कार्बन डाय ऑक्साइड बाहेर पडतो, ज्यामुळे तोंडात आणि घशात मुंग्या आल्यासारखी संवेदना जाणवते. पोटात कार्बन डाय ऑक्साईड वाढल्याने ढेकर येतात आणि काही प्रकरणांमध्ये छातीत जळजळ होऊ शकते

तात्काळ परिणामांच्या पलीकडे या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते, त्यानंतर अनेकदा ऊर्जा कमी होते. डॉ. सिंघवाल चेतावणी देतात, “या साखरयुक्त पेयांचे नियमित सेवन वजन वाढण्यास, दात किडण्यास आणि मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. याव्यतिरिक्त, कार्बोनेशनमुळे सूज आणि गॅस होऊ शकतो.

हेही वाचा –वजन कमी करताय? मग सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा आणि टोस्ट खाणे टाळा; का ते घ्या जाणून तज्ज्ञांकडून….

बहुतेक लोकांना कार्बोनेटेड पेये का आवडतात?

“बहुतेक लोक कार्बोनेटेड पेये पिण्याचा आनंद घेतात, कारण साखर, कॅफीन आणि कार्बोनेशन यांच्या मिश्रणामुळे ते वारंवार पिण्याची इच्छा होते. मेंदूची यंत्रणा जी आनंददायक क्रियाकलाप किंवा पदार्थांना प्रतिसाद देते, जसे की डोपामाइनसारखे हॉर्मोन्स शरीरात सोडते आणि उत्साहाची भावना निर्माण करते. अनेक शीतपेयांमध्ये आढळणारे कॅफीन मेंदूला उत्तेजित करते, सतर्कता आणि अवलंबित्व वाढवते,”असे डॉ. सिंघवाल यांनी स्पष्ट केले.

सिंघवाल यांनी सांगितले की, “सोडायुक्त पेयातील कार्बोनेशन प्रक्रिया एक अस्पष्ट संवेदना निर्माण करते, ज्यामुळे हा अनुभव अधिक तीव्र होतो, जो आणखी समाधानकारक भावना निर्माण करतो. सोडायुक्त पेय पिण्याची पद्धत, जसे की कॅन उघडण्याचा आवाज जे ऐकणे अनेकांसाठी मनोरंजक किंवा समाधानकारक असू शकते; त्यामुळे या पेयाबरोबर भावनिक संबंध निर्माण होऊ शकतात, म्हणूनच लोकांना हे पेय आणखी पिण्याची इच्छा होते.”

सिंघवाल यांनी नमूद केले की, “आपल्या आहारात कार्बोनेटेड पेयांचा समावेश संयमाने केला पाहिजे. “जरी ते अधूनमधून ट्रीट म्हणून आनंददायक असू शकतात, परंतु वारंवार सेवन केल्याने या पेयांमधील उच्च साखर घटकांमुळे ते लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आरोग्य समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतात. आहारात नेहमी सोडा प्यायल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

अमेरिकन हार्ट असोसिएशनने सोडायुक्त पेयाबाबत महिलांसाठी दररोज साखरेचे सेवन २५ ग्रॅमपेक्षा कमी आणि पुरुषांसाठी ३६ ग्रॅमपर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस केली आहे आणि नियमित सोड्याचा एक कॅन प्यायल्यास सहजपणे त्या मर्यादा ओलांडू शकतो.

सिंघवाल यांनी चांगल्या आरोग्यासाठी पाणी किंवा हर्बल टीसारख्या आरोग्यदायी पर्यायांचा विचार करण्याची शिफारस केली आहे.

हेही वाचा –“माझा मुलगा मला घाबरत नाही”, अजय देवगण असे का म्हणाला? वडील आणि मुलाच्या नात्याबाबत जाणून घ्या तज्ज्ञांचे मत….

अशी पेये पिणे कोणी टाळावे?

सोडायुक्त पेय पिताना मधुमेहींनी विशेषतः सावध असले पाहिजे, कारण उच्च साखर घटक असल्याने ते रक्तातील साखरेच्या पातळीत लक्षणीय वाढ करू शकते. लठ्ठ व्यक्तींना हे देखील दिसून येईल की, नियमित सेवनाने वजन वाढण्यास हातभार लागतो आणि ज्यांना हृदयाची समस्या आहे त्यांनी सावध रहावे. “ॲसिड रिफ्लक्स किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम यांसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या असलेल्या लोकांना कार्बोनेटेड पेयांमुळे बिघडलेली लक्षणे दिसू शकतात. गर्भवती स्त्रिया आणि मुलांना उच्च साखर आणि कॅफीन पातळीच्या चिंतेमुळे त्यांचे सेवन मर्यादित करण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे माता आणि बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो,” असेही सिंघवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happens to your body when you consume fizzy drinks snk