आतापर्यंत ७२ तास फक्त फळे खाणे किंवा दररोज एवोकॅडो किंवा दररोज भात खाणे यांसारख्या वेगवेगळ्या परिस्थितीत आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण मागील काही लेखांतून केला आहे. आज हिवाळ्यात सर्वांचे आवडते पेय म्हणून प्रसिद्ध असलेले हॉट चॉकलेटचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हॉट चॉकलेट म्हणजे कोको पावडर आणि दूध यांचे मिश्रण आहे, जे तुमच्या आवडीच्या गोड पदार्थांसह तयार करता येऊ शकते. बदाम दूध किंवा सोया दूध वापरून तुम्ही व्हिगन आहार म्हणूनही हॉट चॉकलेट पिऊ शकता. हिवाळा हा एक कप हॉट चॉकलेट पिण्यासाठी योग्य वेळ आहे. बर्याच लोकांसाठी हॉट चॉकलेट हे आवडते अन्न आहे. हे उबदार, मलईदार आणि चॉकलेटी चव देते आणि त्याचा आनंद अनेक प्रकारे घेता येतो.
दररोज हॉट चॉकलेट पिण्याची शिफारस केली जाते का?
हिवाळ्यात दररोज हॉट चॉकलेट प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर चांगले (favorable) आणि संभाव्यत: वाईट(potential adverse) परिणाम होऊ शकतात. या गोड पेयाचे आपल्या शरीरावर सखोल परिणाम होतात, ज्यामुळे त्याचे दैनंदिन सेवन करताना शरीरावर होणाऱ्या परिणामांची जाण असणे आवश्यक आहे.
दररोज हॉट चॉकलेट पिण्याचे सकारात्मक परिणाम :
१. मूड सुधारतो : हॉट चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन (Theobromine) आणि फेनिलेथिलामाइन (phenylethylamine) सारखी संयुगे असतात. हे घटक एंडोर्फिनच्या उत्सर्जनाला उत्तेजित करून, समाधानाची भावना वाढवून आपला मूड सुधारू शकतात,” असे द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मुंबई सेंट्रल येथील, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ, अमरीन शेख यांनी सांगितले.
२. अँटिऑक्सिडंटचे फायदे : हॉट चॉकलेटमधील प्राथमिक घटक, कोको हे फ्लेव्होनॉइड्स म्हणून ओळखल्या जाणार्या अँटिऑक्सिडंट्सचा खजिना आहे. “ही शक्तिशाली संयुगे फ्री रॅडिकल्सशी लढा देतात, ज्यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो आणि हृदयाच्या आरोग्याला चालना मिळते,” असे अमरीन यांनी सांगितले.
३. पौष्टिक घटक : डार्क कोको किंवा उच्च-गुणवत्तेच्या कोको पावडरपासून बनविलेले हॉट चॉकलेट हे मॅग्नेशियम, लोह आणि पोटॅशियमसारख्या आवश्यक खनिजांचा मौल्यवान स्त्रोत म्हणून काम करते. हे एकूण पोषक तत्वांचे सेवन आणि शारीरिक कार्ये टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते.
४. आरामदायी उबदारपणा : हिवाळ्यातील थंडीच्या महिन्यांमध्ये, ‘या’ पेयामुळे उबदार आणि आरामादायी भावना मिळते, मानसिक आरोग्य आणि भावनिक समतोलावर सकारात्मक प्रभाव पाडते.
दररोज हॉट चॉकलेट पिण्याचे संभाव्य नकारात्मक प्रभाव :
१. कॅलरी आणि साखरयुक्त घटक : बाजारात उपलब्ध व्यावसायिक कंपन्यांचे हॉट चॉकलेट मिक्स आणि तयार हॉट चॉकलेटमध्ये जास्त साखर आणि कॅलरी असतात. “अशा प्रकारांच्या हॉट चॉकलेटचे नियमित सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि मधुमेहासारख्या परिस्थितीची संवेदनशीलता वाढू शकते,” असे अमरीन यांनी सांगितले.
अनेक अभ्यासातून असे आढळून आले आहे की, “चॉकलेटमध्ये दाहक-विरोधी फ्लेव्होनॉइड्स तसेच मूड सुधारणारे फ्लेव्होनॉइड्स असतात. कोको हा कोकाओ वनस्पतीच्या शेंगापासून बनवला जातो, ज्यामध्ये थिओब्रोमाइन, एक रसायन असते जे जळजळ कमी करते आणि रक्तदाब कमी करू शकते.”
“अशा प्रकारे हिवाळ्यात हेल्दी कप हॉट चॉकलेट निवडणे अधिक चांगले होईल, परंतु चॉकलेटमध्येच साखर आणि सॅच्युरेटेड फॅट असते, म्हणून ते कमी प्रमाणात पिण्याची खात्री करा,” असे द इंडियन एक्स्प्रेसला मुंबईच्या भाटिया हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ ऋषिका मीतू यांनी सांगितले.
२. कॅफिनचे प्रमाण : जरी हॉट चॉकलेटमध्ये सामान्यतः कॉफीपेक्षा कमी कॅफीन असते, तरीही ते माफक प्रमाणात असते. अमरीन यांनी सांगितले की, जास्त प्रमाणात सेवन केल्याने झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो, हृदय गती वाढू शकते किंवा कॅफिनला संवेदनशील असलेल्या व्यक्तींमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते.”
३. पचन समस्या : काही विशिष्ट प्रकारच्या तयार हॉट चॉकलेटमध्ये उच्च फॅट्सयुक्त घटक असल्यामुळे ते पचन क्रियेत अस्वस्थता निर्माण करू शकते, विशेषत: लॅक्टोज असहिष्णुता किंवा इतर संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींमध्ये ही समस्या निर्माण होऊ शकते.”
४. ॲडिटीव्ह आणि प्रक्रिया : पॅकबंद हॉट चॉकलेट मिक्समध्ये ॲडिटीव्ह, प्रिझर्वेटिव्ह आणि कृत्रिम फ्लेवर्स असतात. अमरीन यांनी सांगितले की, ‘हे घटक नियमितपणे सेवन केल्याने संपूर्ण आरोग्य बिघडू शकते.”
माफक प्रमाणात सेवन नेहमी चांगले
मध्यम प्रमाणात हॉट चॉकलेट सेवन केल्यास ते प्रतिकूल परिणाम न होऊ देता चांगल्या संतुलित आहारामध्ये सामविष्ट केले जाऊ शकते. “ चांगल्या गुणवत्तेची कोको पावडर, मर्यादित साखर आणि बदाम किंवा सोया दुधाचे पर्याय वापरून घरी तयार केल्याने संभाव्य नकारात्मक परिणामांची भरपाई होऊ शकते,” असे अमरीन यांनी सांगितले.