वजन कमी करणे, हृदयाचे आरोग्य जपणे व पचनक्रिया सुधारण्यासह अनेक फायद्यांसाठी तुम्ही नियमितपणे ओट्स खाता का? पण त्याचा तुमच्या शरीरावर नक्की काय परिणाम होतो याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का, याच प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञांकडून जाणून घेऊ या. त्याबाबत दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट डी. टी. दीपाली शर्मा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “दररोज ओट्स खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.”

“ओट्समध्ये भरपूर फायबर असतात; जे बराच काळ पोट भरल्याची आणि तृप्ततेची भावना निर्माण करते. परिणामी भूक कमी होते आणि एकूण कॅलरीजचे सेवन कमी होते. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी हे फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर ओट्समध्ये असलेले फायबर्स पचनक्रिया सुधारतात; परिणामी बद्धकोष्ठतेची समस्या टाळता येते,” असे शर्मा यांनी सांगितले.

Health Benefits Of Anjeer
Health Benefits Of Anjeer : सकाळी रिकाम्या पोटी खा अंजीर; लगेच दूर होतील ‘या’ पाच समस्या
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
eating egg whites is not good for you
Eating Egg Whites Healthy Or Not : फक्त अंड्यातील पांढरा भाग खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी मांडली मते…
Eggs and height: We find out if there is any link what do you do for increasing height
आहारात नियमित अंडी खाल्ल्याने उंची वाढते का? डॉक्टरांनी दिलेली माहिती एकदा वाचा
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
This is when you should have your last meal of the day
तुम्ही दिवसभरातील शेवटचे जेवण कोणत्या वेळी केले पाहिजे? तज्ज्ञांनी केला खुलासा
chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use
रोज चिया सीड्स खाण्याचे हे आहेत आरोग्य फायदे, वाचा कशाप्रकारे करावे सेवन
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे

शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ओट्समधील फायबर्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे हळूहळू पचन होते; ज्यामुळे रक्तप्रवाहात हळूहळू साखर सोडली जाते. एकंदरीत ओट्समुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होत असल्याने रक्तातील साखरेमध्ये अचानक होणारी वाढ टाळता येते; ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी किंवा दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा देणारा आहार म्हणून ओट्स उत्तम पर्याय ठरतो.

हेही वाचा – दूध, दही, बटर, पनीर खाऊन शरीर होतं लठ्ठ? तज्ज्ञांनी सांगितले किती प्रमाणात करावे सेवन?

ओट्सच्या जाड्या भरड्या पिठामधील फायबर्स घटकही कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर सकारात्मक प्रभाव टाकतो. विशेषतः खराब कोलेस्ट्रॉलवर (LDL cholesterol) त्याचा जास्त प्रभाव पडतो. “ओट्स नियमित खाल्ल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलच्या पातळीत घट होते; ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा धोका कमी होतो. त्याव्यतिरिक्त ओट्समुळे रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत होते; जी बाब हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्याचबरोबर उच्च रक्तदाब आणि संबंधित हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो,” असे शर्मा यांनी सांगितले.

“हृदयाचे आरोग्य जपणे, वजन नियंत्रण यांसाठी ओट्सच्या सेवनाचा फायदा होतो. ओट्समधील फायबर्समुळे चांगल्या जीवाणूंची वाढ होऊन पचनक्रिया सुधारते आणि त्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. त्यातून शरीरातील विषारी पदार्थ आणि कचरा काढून टाकण्यास मदत होते,” असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – एका महिन्यासाठी मद्यपान सोडले तर शरीरावर काय परिणाम होईल? Dry January Challenge आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल का?

ओट्स कसे खाल्ले, तर अधिक फायदेशीर ठरेल?

तुमच्या नियमित आहारात ओट्स (steel cut or rolled oats) समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. “ओट्स फायबर्सनी समृद्ध आहे आणि त्यात झिंक, फोलेट व मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटकदेखील असतात. कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. तुम्ही फक्त ओट्सचा आस्वाद घेऊ शकता किंवा पौष्टिक मूल्य व चव दोन्ही वाढवण्यासाठी बदाम, बेरी किंवा फळांसह ओट्स खाऊ शकता,” असे पोषण व आरोग्य सल्लागार शीला कृष्णस्वामी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

आहारतज्ज्ञ कृष्णस्वामी यांनी ओट्सचे पौष्टिक मूल्य वाढवण्याचा सल्ला दिला आहे. बदामासह ओट्स खाण्यामुळे आरोग्याला दुप्पट फायदा मिळू शकतो. कृष्णस्वामी सांगतात, “बदामामध्ये जीवनसत्त्व ई, मॅग्नेशियम, प्रथिने व झिंक यांसह १५ आवश्यक पोषक घटक असतात आणि मधुमेह व उच्च कोलेस्ट्रॉल यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी ते विशेष फायदेशीर असतात.”

हेही वाचा – डाळिंब मधुमेह नियंत्रणात मदत करू शकते का? तुम्ही दररोज किती प्रमाणात सेवन केले पाहिजे?

ओट्सच्या खाण्याचे अनेक फायदे आहेत हे लक्षात घेऊन संतुलित आहारात त्याचा समावेश करणे आवश्यक आहे. “इतर पौष्टिक पदार्थांबरोबर ओट्स खाल्यामुळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या इतर पोषक घटकांचे योग्य प्रमाणात सेवन केले जाईल हे सुनिश्चित होते,” असे शर्मा यांनी स्पष्ट केले.