आवळा हा त्याच्या औषधी गुणधर्मासाठी जगभरामध्ये वापरला जातो. आवळ्यामध्ये खूप पौष्टिक घटक आहेत आणि आवळ्याचे लोणचे, आवळ्याचा रस, आवळ्याची कँडी, आवळ्याची चटणी यांसारखे पदार्थं तयार करून सेवन केले जाऊ शकते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि तो व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, लोह यांचा चांगला स्रोत आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण, तुम्हाला हे माहितीये का? रोज एक वाफवलेला आवळा खाण्याचे आरोग्यासाठी काही फायदे आहेत. कारण आवळा वाफवल्यानंतरही त्यातील पोषक घटक त्यात टिकून राहतात.

“कच्चा आवळा वाफवल्यानंतरही त्याची चव चांगली असते हे लक्षात घेऊन, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट काव्या नायडू यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, “रोज एक वाफवलेला आवळा खाल्ल्याने तुमच्या शरीरात निरोगी बदल होऊ शकतात. आवळा वाफवल्याने त्यातील व्हिटॅमिन सी टिकून राहते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे व जे रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास, त्वचेचे आरोग्य सुधारण्यास, केसांची पोत सुधारण्यास आणि एकूणच आरोग्यास मदत करते.”

Health Special What exactly is insulin
Health Special : इन्सुलिनच्या जगात
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
eating egg whites is not good for you
Eating Egg Whites Healthy Or Not : फक्त अंड्यातील पांढरा भाग खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी मांडली मते…
what happens to the body if you brisk walk 2 kms every day
जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
‘McDonald’ बर्गर खाल्ल्याने ४९ जणांना ई-कोलायचा संसर्ग; कारण काय? हा जीवाणू किती घातक?
chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use
रोज चिया सीड्स खाण्याचे हे आहेत आरोग्य फायदे, वाचा कशाप्रकारे करावे सेवन
diabetes, health issue, tips
Health Special: डायबिटीस होण्याची कारणं काय आहेत? – भाग १

हेही वाचा – किशोरवयात नियमित धावल्याने ह्रदयाची काळजी घेता येईल का? नव्या संशोधनातून मिळाले उत्तर, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

आवळा वाफवल्यामुळे त्याच्यातील अँन्टीऑक्सिडंट टिकवून ठेवण्यासाठी मदत होते आणि शरीराचे नुकसान करणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि फ्री रॅडिकल्सचा सामना करण्यास मदतही करते. डॉ. नायडू यांच्या मतानुसार, “आवळा वाफवण्यामुळे पचनक्रिया सुलभ होण्यासह फायदा मिळतो. बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते, पचनक्रिया सुधारते आणि तुमच्या आतड्याचे आरोग्य जपण्यास मदत होते.

एवढंच नव्हे, तर केसांना चमक आणि त्वचेवर तेज आणण्यासाठीदेखील हे मदत करते. ” आवळ्यातील ॲन्टीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी निरोगी त्वचेसाठी फ्री रॅडिकल्सचा सामना करते आणि कोलजेन निर्मितीसाठी (collagen production) मदत करते. नियमित सेवन केल्यामुळे नैसर्गिक रेडिअन्स आणि त्वचेची पोत सुधारण्यास मदत होते”, असे जिंदल नेचर केअर इंस्टिट्यूटच्या चीफ डायटीशियन सुश्मा पीएस यांनी सांगितले आहे.

खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबधी आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करून आवळा हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी योगदान देते. मधुमेही व्यक्तीने एक वाफवलेला आवळा आरोग्यदायी आहारासह सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणास ठेवण्यास मदत होईल. हे शक्य आहे, कारण वाफवल्यामुळे आवळ्यातील सक्रिय संयुगे (ॲक्टिव्ह कंपाऊडस्) जपण्यास मदत होते”, असे नायडू यांनी सांगितले.

नायडू यांनी सांगितले की, “आवळ्यामध्ये दाहक-विरोधी घटक असतात, ज्यामुळे शरीरातील सूज आणि जळजळ कमी होते. त्याचबरोबर डोळ्याच्या आरोग्यासाठीदेखील ते चांगले आहे.

हेही वाचा – कोमट दूध प्यायल्यास खरेच शांत झोप लागते का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या काय आहे सत्य….

तज्ज्ञांच्या मतानुसार, वाफवलेला आवळा खाल्ल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. आवळ्यामध्ये असलेली प्रथिने तुमची सतत काहीतरी खाण्याची इच्छा नियंत्रित करण्यात मदत करतात आणि तुमच्या वजन नियंत्रण करण्याच्या धोरणामध्ये महत्त्वाचे योगदान देते. जास्तीची भूक कमी करून आवळा आरोग्यदायी खाण्याच्या सवयींना हातभार लावण्यास मदत करतो”, असे सुश्मा यांनी सांगितले.

हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, आवळा अनेक आरोग्य फायदे देतो, त्याच्या सेवनामुळे प्रत्येकासाठी होणारे परिणाम भिन्न असू शकतात. तुम्हाला विशिष्ट आरोग्यविषयक समस्या असल्यास, तुमच्या आहारात महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, विविध पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आणि संतुलित जीवनशैली राखणे हे संपूर्ण आरोग्य आणि कल्याणासाठी योगदान देईल.