झोप आपल्या एकूणच आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे; पण बदलत्या जीवनशैलीसह आपल्या झोपण्याचे गणितही बदलत चालले आहे. पूर्वी लोक रात्री लवकर झोपत आणि पहाटे लवकर उठत; पण आजच्या काळात लोक रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. काही लोकांची झोपदेखील पूर्ण होत नाही. आपल्या मानसिक आणि शारीरिक कार्यापासून अनेक घटकांमध्ये झोप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते; ज्यामुळे आपल्या आरोग्यावरही मोठा परिणाम होऊ शकतो. काही लोकांना उशिरा झोपण्याची सवय असते; पण त्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे आपल्याला माहीत नसते. म्हणूनच जर एखादी व्यक्ती जर सलग तीन दिवस झोपली नाही, तर त्याच्या
शरीर आणि मनावर काय परिणाम होतो याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेतले.

या विषयावर सविस्तर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांशी संपर्क साधला. दरम्यान, याबाबत गुरुग्रामच्या आर्टेमिस हॉस्पिटलचे न्यूरोइंटरव्हेंशनल सर्जरीचे प्रमुख व स्ट्रोक युनिटचे सहप्रमुख डॉ. विपुल गुप्ता यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “तीन दिवस झोप न घेतल्यास व्यक्तीच्या आरोग्यामध्ये आणि शरीरात मोठे बदल होतात; तसेच अनेक घातक परिणामदेखील होतात.”

brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
Loksatta chaturang Life Power Center Pleasure school Fear of Pain
सांधा बदलताना : जग हे आनंदशाळा
computer engineer dies after returning home from workout at gym
व्यायाम शाळेतून घरी येताच संगणक अभियंत्याचा मृत्यू; कुस्तीगिराच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी घटना
Morning detox tips
सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय करावं? तज्ज्ञांनी सांगितल्या ‘या’ पाच गोष्टी

जास्त काळ झोप न घेतल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम

डॉ. गुप्ता यांच्या मताशी सहमती दर्शवताना, अपोलो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे इंटेसिव्ह केअर युनिट व स्लीप लॅबचे इन्चार्ज आणि पल्मोनरी व क्रिटिकल केअर मेडिसिनचे सल्लागार डॉ. सुरेश रामसुब्बन म्हणाले, “कमी झोपेचे परिणाम केवळ २४ तासांच्या आता स्पष्टपणे दिसू शकतात. पण जेव्हा एखादी व्यक्ती सलग ७२ तास किंवा तीन दिवस झोपत नाही तेव्हा कमी झोप आणि थकव्याची लक्षणे आणखी तीव्र होतात.

“जास्त काळासाठी झोप न घेतल्यास एखाद्या व्यक्तीची मनःस्थिती आणि मेंदूची स्मरणशक्ती व आकलनशक्ती यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विद्यार्थी आणि व्यावसायिक यांच्यामध्ये कमी वेळ झोपणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. डॉक्टर म्हणूनही आम्हाला २४ तासांपेक्षा जास्त काळ काम करण्यास मनाई केले जाते.”

हेही वाचा – जांभूळ रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करते का? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात …

कमी झोपेमुळे उद्भवणारे काही परिणाम

या काळात कमी झोपेमुळे उद्भवणारे काही परिणाम म्हणजे अत्यंत थकवा, एकाच वेळी अनेक कामे करण्यात अडचण येणे, एकाग्रता व स्मरणशक्ती टिकवून ठेवणे अवघड होणे, पॅरानोईयाची (एक मानसिक विकार; ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला इतरांबद्दल कमालीची भीती व अविश्वास वाटत असतो) भावना जाणवणे, नैराश्य आणि परस्पर संवादामध्ये अडचणी येणे. “ही लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे; कारण- दीर्घ काळ झोप न मिळाल्यास त्याचे एखाद्या व्यक्तीच्या एकूणच आरोग्यावर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतात. अशा परिणामांमध्ये उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, चिंता व नैराश्य यांसारख्या परिस्थितींमध्ये वाढलेली संवेदनशीलता समाविष्ट असू शकते,” असे डॉ. रामसुब्बन यांनी सांगितले.

कमी झोपेचे श्वसनप्रणालीवरही तीव्र परिणाम होऊ शकतात.

तज्ज्ञांनी पुढे सांगितले, “कमी झोपेचे विशेषतः श्वसनप्रणालीवर तीव्र परिणाम होऊ शकतात. “ऑक्सिजनची कमी झालेली पातळी आणि कार्बन डाय-ऑक्साइडच्या पातळीत झालेली वाढ ओळखण्यात आपले शरीर, तसेच मेंदू अपयशी ठरतो. कमी ऑक्सिजन आणि अधिक प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड असलेल्या या स्थितीला डिप्रेस्ड व्हेंटिलेटरी रिस्पॉन्स (Depressed Ventilatory Response) म्हणून ओळखले जाते. फुप्फुसाचे आजार असलेल्या व्यक्तींमध्ये ही लक्षणे आणखी तीव्र होऊ शकतात.”

“मानसिक आरोग्यासाठी झोप हा एक टप्पा आहे जेव्हा मेंदू संबंध तयार करतो किंवा सिनॅप्स [एक चेतापेशी (Nerve Cells) आणि दुसऱ्या पेशींदरम्यानची जागा) तयार करतो; ज्यामुळे आपल्याला स्मृती तयार करण्यास मदत होते”, असे नॉयडा येथील फोर्टिस हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कपिल सिंघ यांनी सांगितले. “कमी झोपेमुळे आपली स्मरणशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे मूड स्विंग होणे, चिडचिडेपणा व राग अशा समस्या उद्भवू शकतात; ज्याचा आपल्या दैनंदिन कामावर नकारात्मक परिणाम होतो. बराच काळ झोप न मिळाल्यास भास होऊ शकतात आणि त्याचा शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. जगण्यासाठी अन्न आणि ऑक्सिजनची जेवढी गरज आहे तेवढीच मेंदूसाठी झोपही आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – दिवसा घेतलेली डुलकी तुमच्या मेंदूसाठी चांगली आहे का? काय सांगते संशोधन, जाणून घ्या…

दोन-तीन दिवस न झोपण्याची विविध कारणे

एखादी व्यक्ती २-३ दिवस सतत झोपू शकत नाही याची विविध कारणे असू शकतात. ही स्थिती निद्रानाश, चिंता किंवा झोपेचे विकार यांमुळे उद्भवू शकते. प्रचंड ताण, काम किंवा अभ्यासाची गरज, जेट लॅग किंवा अस्वस्थ झोपेच्या सवयींसारखे बाह्य घटकदेखील दीर्घ काळापर्यंत निद्रानाश होण्यास कारणीभूत ठरू शकतात. कारण काहीही असो; पण सलग तीन दिवस न झोपल्याने झोपेचे मोठे नुकसान होते.

“झोप घेणे निःसंशयपणे आवश्यक असले तरी तो एकमेव उपाय नाही. निरोगी आणि अधिक संतुलित लाइफस्टाईलसाठी प्रयत्न करणे हा सर्वांत प्रभावी दृष्टिकोन आहे,” असे डॉ. रामसुब्बन म्हणाले.

डॉडॉ. सिंघल म्हणाले की, “जर एखाद्या व्यक्तीला बराच काळ झोप येत नसेल, तर त्याने कॅफिन व चहा यांसारख्या उत्तेजक घटकांचा वापर टाळावा. छोटी निवांत झोपदेखील उपयुक्त ठरू शकते. एखाद्याने शक्य तितक्या लवकर त्याच्या नेहमीच्या झोपेचे रुटीन सुरू करावे. हलके व्यायाम व ध्यान यांसारखे मनाला विश्रांती देणारे पर्यायदेखील उपयुक्त ठरू शकतात.

बिझी लाइफस्टाईल शेड्युलमध्ये योग्य झोप घेण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे आणि सातत्यपूर्ण झोपेचे रुटीन पाळणे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला झोपेची गुणवत्ता वाढवून शांत झोप मिळवण्याची असेल, तर खालील गोष्टींचे पालन करा :

  • नियमित झोपेचे वेळापत्रक तयार करा आणि ठरल्याप्रमाणे ते पाळा.
  • शांत झोपेसाठी योग्य वातावरण तयार करा.
  • व्यायाम, कॅफिन व इलेक्ट्रॉनिक उपकरणे या गोष्टी झोपण्याच्या वेळी टाळा.
  • झोपण्यापूर्वी आराम करण्यासाठी दीर्घ श्वासोच्छ्वास किंवा ध्यान यांसारख्या योग अवस्थांचा सराव करा.
  • चांगली झोप येण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि समतोल आहार घ्या.

Story img Loader