मेटाबॉलिजम म्हणजेच चयपचयाची एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यक्ती जे खातो आणि पितो त्याचे उर्जेमध्ये रूपांतर होते. ही शरीरात घडणारी एक रासायनिक प्रक्रिया आहे. तुमचा मेटाबॉलिजम दर तुमच्या शरीरात वापरल्या जाणाऱ्या कॅलरीजची संख्या ठरवतो. हे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबसह सर्व काही संतुलित ठेवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेटाबॉलिजमवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. प्रत्येक जेवणात आपण जे काही खातो यापासून शरीर ते कसे पचवते यापर्यंत, आपले शरीर किती चांगले कार्य करते हे जाणून घेण्यासाठी मेटाबॉलिजम अत्यंत उपयुक्त प्रक्रिया आहे. त्यामुळे मेटाबॉलिजमवर नक्की कशाचा प्रभाव होते हे माहित असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, मेटाबॉलिजम हा अनुवांशिक, शारीरिक, जीवनशैली आणि पर्यावरणीय घटकांचा एमकेमकांबरोबर (कॉम्प्लेक्स) संबंध आहे जो एकत्रितपणे शरीरात किती ऊर्जा वापरली जाते हे निश्चित करते.

मेटाबॉलिज्मवर परिणाम करणारे घटक

अनुवांशिक घटक आणि वय

मेटाबॉलिजम हे अनुवांशिक, शारीरिक आणि पर्यावरणीय घटकांच्या कॉम्बिनेशनमुळे प्रभावित होतो. याबाबत इंडियन एक्सप्रेसबरोबर संवाद साधताना, गुरुग्राम येथील नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसनचे, सिनिअर कन्सलटंट, डॉ. पंकज वर्मा यांनी सांगितले की, “ पिढानपिंढ्या पालकांकडून मुलांना मिळणारा वारसा आधारभूत मेटाबॉलिक दर निश्चित करण्यासाठी अनुवांशिक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. वय देखील मेटाबॉलिजम प्रभावित करते; स्नायुंचे वस्तूमान कमी होण्यामुळे आणि हॉर्मोनल बदलांमुळे वयोमानानुसार जसे जसे वय वाढते तसे तसे हा प्रभाव कमी होतो.”


हेही वाचा – पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक मंद गतीने फॅटस् का बर्न होतात? तज्ज्ञांनी सांगितले कारण….

शरीराची रचना, आहार आणि शारीरिक हालचाल

”शरीराची रचना देखील महत्त्वाची आहे. फॅट्सपेक्षा स्नायू तयार करण्यासाठी जास्त उर्जा वापरली जाते त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे स्नायूंचे वस्तुमान जास्त असेल तर त्याचा मेटाबॉलिजम दर जास्त असतो. आहार आणि शारीरिक हालचाल हे मेटाबॉलिजम प्रभावित करणारे बाह्यघटक आहे. क्रॅश डाएट केल्यास आणि बराच काळ कॅलरीच्या सेवन टाळल्यास मेटाबॉलिक दर कमी होऊ शकतो कारण ऊर्जा वाचवण्यासाठी शरीर बदलत्या स्थितीबरोबर जुळवून घेते. नियमित व्यायाम करणे, विशेषत: स्ट्रेंथ ट्रेंनिग हे स्नायू तयार करून मेटाबॉलिजम वाढवू शकते. ”

याबाबत सहमती दर्शवत मुंबई येथील रेजुआ एनर्जी सेंटरचे नैसर्गिक चिकित्सक आणि एक्यूपंक्चर तज्ञ, डॉ. संतोष पांडे यांनी सांगितले की, ”शारीरिक हालचाली केवळ कॅलरीज् वापरत नाही तर मेटाबॉलिजम दर देखील वाढवतात. तुम्ही खात असलेले अन्न देखील मेटाबॉलिजमवर परिणाम करू शकते. दिवसभरात थोड्या प्रमाणात, वांरवांर खाल्यास मेटाबॉलिजमचा दर जास्त ठेवण्यास मदत होते.”

जास्त कॅलरीजच्या सेवनामुळे मेटाबॉलिजम प्रभावित होऊ शकतो. बऱ्याच काळासासाठी कॅलरीचे सेवन गांभीर्याने टाळल्यास कालांतराने मेटाबॉलिजम दर मंदावण्याची शक्यता असते कारण शरीर ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करते” असे लीन बाय सुविधीच्या लाइफस्टाइल, एक्सरसाईज आणि न्यूट्रिशन कोच आणि को- फांउडर सुविधी जैन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – हाताच्या कोपराला दुखापत झाल्यानंतर इतक्या वेदना का होतात? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

झोप आणि तणाव

”झोप आणि तणावाची पातळी देखील मेटाबॉलिजमवर परिणाम करू शकते. अपुरी झोप आणि तीव्र ताण असल्यास हॉर्मोनल बॅलन्स बिघडतो आणि परिणामी मेटाबॉलिजमचे कार्य मंदवते. कमी वेळ झोपणे किंवा चांगली झोप न मिळल्यास मेटाबॉलिजम प्रभावित होऊ शकते कारण झोप तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करते. कमी वेळ झोपल्यामुळे तुमच्या शरीराच्या ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे ऊर्जा कमी पडते आणि मेटाबॉलिजमवर नकारात्मक परिणाम होतो आणि वजन वाढते,” असे डॉ पांडे यांनी सांगितले.

मेटाबॉलिज्म मंदावल्याची लक्षणे

जर तुम्हाला बद्धकोष्ठता, सूज येणे किंवा इतर पाचन समस्या असतील तर हे तुमची मेटाबॉलिजम मंदावल्याची लक्षणे आहेत असे डॉ. पांडे यांनी नमुद केले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What impacts metabolism and what can you do snk