दहा वर्षाच्या सौरभला घेऊन त्याची आई माझ्याकडे आली होती . मला म्हणाली,“डॉक्टर गेले वर्षभर याचे केस असे जाऊन तिकडे गोल गोल चट्टे पडत आहेत. लोक म्हणतात ही चाई आहे. तिकडे कधी कधी आपोआपही केस येत आहेत. तर काही ठिकाणचे चट्टे औषधोपचार करूनही तसेच आहेत. मला तर बाई फारच काळजी वाटून राहिली आहे.” मी सौरभला तपासले. त्याला खरोखरच चाई म्हणजेच Alopecia Areata हा आजार झाला होता. आज आपण या आजाराबद्दल जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय असते ही चाई किंवा एलोपेशिया एरियाटा ( Alopecia Areata )?
या आजारामध्ये केस मुळातूनच सैल होतात व गळून पडतात व तिथे टक्कल पडल्यासारखा गोल चट्टा दिसू लागतो. यालाच चाई किंवा एलोपेशिया एरियाटा असे म्हणतात. एलोपेशियाचा अर्थ केस जाणे व एरियाटाचा अर्थ क्षेत्र. म्हणजेच ठराविक भागाचे केस जाणे. हा तसं म्हटलं तर बऱ्यापैकी सर्वसाधारण आजार आहे व साधारण दोन टक्के लोकांना आयुष्यात कधी ना कधीतरी चाई हा आजार होतो. हा आजार लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणालाही होऊ शकतो. पण १५ ते ३० या वयोगटातील व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. स्त्रिया व पुरुषांमध्ये हा आजार साधारण सारख्या प्रमाणात होतो.काही प्रमाणात हा आजार आनुवंशिक आहे. हा आजार झालेल्या वीस टक्के रुग्णांमध्ये कुटुंबातील इतर व्यक्तीला देखील हा आजार झाल्याचे आढळून येते.
हेही वाचा : Health Special : केटोजेनिक आहाराचे नेमके परिणाम काय आहेत? (भाग १)
या आजाराचे कारण काय?
हा एक प्रकारचा स्वयंप्रतिरोधक रोग (Autoimmune Disease) आहे. या आजारामध्ये व्यक्तीच्या केसाचं जे मूळ आहे त्यालाच प्रतिपिंडे (Antibodies) तयार होतात व त्यामुळे केस सैल होऊन गळून पडतात. पण अशा प्रकारे स्वतःची रोगप्रतिकारशक्ती स्वतः विरुद्धच का काम करते हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. कधी कधी या आजाराबरोबरच इतर स्वयंप्रतिरोधक आजार (उदा. कोड व थायरॉईड ग्रंथीचे आजार) देखील होऊ शकतात. हा आजार मानसिक ताणामुळे वाढू शकतो. पण हा आजार मानसिक ताणामुळेच होतो असे सिद्ध झालेले नाही.
या आजाराची लक्षणे काय आहेत?
हा आजार अचानकच सुरू होतो. डोक्यावरील केसांमध्ये किंवा क्वचित प्रसंगी दाढीतील केसांमध्ये साधारण दहा रुपयाच्या नाण्याइतका चट्टा दिसतो, तिथे केस नसतात व तो हाताला एकदम गुळगुळीत लागतो. काही जणांमध्ये या चट्ट्याचा आकार मोठाही असू शकतो. ८० टक्के लोकांमध्ये एकच चट्टा येतो. दहा टक्के लोकांमध्ये दोन चट्टे येतात, तर बाकी दहा टक्के लोकांमध्ये हळूहळू बरेच चट्टे येतात. या ठिकाणी खाज वगैरे काही नसते. कधी कधी तर असा चट्टा पडला आहे. हेसुद्धा आपल्याला दुसऱ्याकडून कळतं. बायकांचे केस लांब असल्यामुळे त्यांना मात्र चट्टा पडण्यादरम्यान केस गळती जाणवते. ९० टक्के रुग्णांना डोक्यामध्ये चाई पडते तर काही जणांना दाढीमध्ये व हात पाय व शरीरावरील इतर ठिकाणी असलेल्या केसांमध्ये देखील चाई पडू शकते.
हेही वाचा : १०० ग्रॅम हिरव्या चण्याच्या सेवनाने शरीरात काय बदल घडतात? दररोज मुठभर खाणे चांगले? आहारतज्ज्ञ सांगतात की…
या आजाराचे प्रकार कोणते?
एलोपेशिया एरियाटा (Alopecia Areata ): यामध्ये डोक्यावर किंवा इतर ठिकाणी काही मोजके केसविरहित चट्टे पडतात.
एलोपेशिया टोटॅलीस (Alopecia Totalis ): या प्रकारात चाई पडून हळूहळू करत डोक्यावरील सर्वच केस जातात.
एलोपेशिया युनिव्हर्सलिस (Alopecia Universalis): या प्रकारात डोक्याचे, चेहऱ्याचे व अंगावरीलही बहुतांश केस चट्टे पडून पडून निघून जातात
ओफियासिस ( Ophiasis ): या प्रकारामध्ये डोक्यावरील सभोवतालचे केस चट्ट्याच्या स्वरूपात जातात. हा आजार थोडा चिवट असतो व औषधांना हवा तसा प्रतिसाद देत नाही.
चाई या आजारामध्ये कधी कधी उपचाराशिवाय देखील आपोआपच काही कालावधीने केस येतातही व चाई बरी होते. तर काहीजणांमध्ये हा आजार असा काही हटवादी असतो की विविध उपचार करून देखील केस पूर्ववत येतातच असे नाही. तर कधी कधी हा आजार बरा झाल्यानंतरही काही महिने किंवा काही वर्षांनी परतही उद्भवू शकतो. त्यामुळे हा आजार झालेल्या व्यक्तीमध्ये त्या आजाराची नैसर्गिक वाटचाल कशी होईल याचा अंदाज करणे पुष्कळदा कठीण जाते.
या आजारामध्ये तसं पाहिल्यास व्यक्तीला खाज किंवा इतर काही त्रास होत नसतो. तरीदेखील या आजारामुळे मानसिक ताण मात्र बऱ्यापैकी येतो व काही जणांमध्ये आत्मविश्वास खच्ची होतो. आणखीही काही आजार आहेत की ज्यामध्ये केस जाऊन असे चट्टे पडतात. उदाहरणार्थ- केसांचा नायटा. पण त्यामध्ये अशा व्यक्तीला खाज येते व चट्ट्यामध्ये लाली येणे, पुरळ येणे, पापुद्रे जाणे अशी लक्षणे पाहावयास मिळतात.
या आजारावर काय उपचार आहे?
हा आजार तसा सौम्य असल्यामुळे व या आजारामध्ये कधी कधी आपोआप देखील केस येत असल्यामुळे आजार कमी असल्यास कधी कधी फक्त समुपदेशन करून थांबा आणि वाट पहा असे धोरण अवलंबिले जाते. पण पेशंट चिंताग्रस्त असल्यामुळे बऱ्याचदा आम्हाला उपचार चालू करावे लागतात. त्या जागेवर लावण्यासाठी मिनॉक्सिडील (Minoxidil ) तसेच स्टिरॉइडचे पातळ औषध दिले जाते. कधीकधी ज्या औषधाची हमखास अॅलर्जी येते असे औषध उदाहरणार्थ डीपीसीपी (Di-phenyl cyclopropenone) आम्ही चाईवर लावण्यास देतो. त्यामुळे तिथे सौम्य खाजरे पुरळ
येते व त्यामुळे केस येण्यास चालना मिळते. पण ही औषधे त्वचारोगतज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय वापरू नयेत. चाईचे जर मोजकेच चट्टे असतील तर त्यामध्ये स्टिरॉइडचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे केस येण्याची दाट शक्यता असते. जर आजाराला सुरुवातीपासूनच वाढ असेल तर ती थांबून तिथे केस येण्यासाठी म्हणून तोंडावाटे स्टिरॉइडच्या गोळ्या दिल्या जातात.
कधी कधी आपली प्रतिकारशक्ती नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी Methotrexate किंवा Azathioprine या गोळ्या दिल्या जातात. अलीकडे जानस कायनेज इनहीबीटर (Janus Kinase Inhibitor) या औषधी गटातील औषध उदाहरणार्थ Tofacitinib हे या आजारासाठी वापरले जाते. पण स्टिरॉइड तसेच या इतर औषधांनी आपल्या रोगप्रतिकारशक्तीचे दमन होत असल्याकारणाने ही औषधे तज्ञ डॉक्टरांच्या व विशेषतः त्वचारोगतज्ञांच्या सल्ल्यानेच वापरणे आवश्यक आहे. कारण ती औषधे सुरू करण्यापूर्वी आपल्या शरीरामध्ये क्षयरोग किंवा इतर काही संसर्गजन्य आजार हे सुप्तावस्थेत लपलेले तर नाही ना याचा पूर्ण तपास करावा लागतो. तसेच आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन व पांढऱ्या पेशींचे प्रमाण तसेच आपले यकृत व मूत्रपिंडे यांचे कार्य व्यवस्थित आहे की नाही हे तपासावे लागते. तसेच ही औषधे चालू असताना त्यांचे दुष्परिणाम तर होत नाहीत ना हे पाहण्यासाठी अधून मधून रक्त तपासावे लागते. या औषधांनी चाईचे नवीन नवीन येणारे चट्टे थांबून त्या जागेवर केस आले तरीदेखील ही औषधे बऱ्याच कालावधीसाठी चालू ठेवावी लागतात. नाहीतर हा आजार परत उद्भवू शकतो.
हेही वाचा : Health Special : बॅक्टेरिया आपला मित्र कसा?
कधी कधी ही औषधे देऊन देखील आजार बरा होत नाही व डोक्यावरील बहुतांश केस निघून जातात. अशा वेळी रुग्णाचे समुपदेशन करून त्याला केसांचा टोप घालण्याचा सल्ला दिला जातो. कधी कधी चाईवर घरगुती उपाय म्हणून आसपासच्या लोकांकडून सलूनमधून जमाल गोटा किंवा इतर झाडपाल्याची औषधे लावण्याचा सल्ला दिला जातो. या उपचाराने केस कधीकधी येतात देखील, पण कधीकधी जास्त झोंबल्यास तिथे पाणी भरून फोड येतात व लस येऊ लागते व तो भाग चिघळल्यासारखा होतो. त्यामुळे असे उपचार टाळणेच बरे. चाई हा जरी साधा व सौम्य आजार असला तरी त्याचे चट्टे लोकांना दिसत असल्यामुळे तो झालेल्या व्यक्तीला चिंता वाटणे साहजिकच आहे. यासाठी चट्टा असलेल्या त्वचेमध्ये इंजेक्शन देणे किंवा इतरही अनेक उपचार उपलब्ध आहेत. पण त्यासाठी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.