Sushmita sen Angioplasty: बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला दोन-तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. काल (२ मार्च) तिने वडिलांसह फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सुश्मिताने “तुम्ही तुमच्या हृदयाला कायमच खंबीर आणि आनंदी ठेवा. कारण तुमच्या वाईट काळात ते कायमच तुमच्या पाठिशी उभे राहील. हा सल्ला मला माझ्या वडिलांनी दिला होता”, असे लिहिले आहे. या पोस्टमुळे चाहते आणि अन्य सेलिब्रिटी तिची विचारपूस करत आहेत.

शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. माझी अँजियोप्लास्टी झाली आहे. स्टेंट जागेवर आहे. माझे हृदय आता व्यवस्थितपणे काम करत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या कार्डियोलॉजिस्टने माझे हृदय खऱ्या अर्थाने खूप मोठे आहे या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे. अशी म्हटले होते. गेल्या काही वर्षांमध्ये सेलिब्रिटींमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे चित्र समोर आहे.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
supreme court marital dispute case
Factors to decide Alimony Amount: घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम किती असावी? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले ८ महत्त्वाचे घटक
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
hundred liver transplants at New Era Hospital in nagpur
अवयव दानाला बळ… मध्य भारतातील एकाच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचे शतक
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण

आणखी वाचा – हृदयविकाराचा झटका आलेल्या सुश्मिता सेनला वडिलांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले “तुम्ही हृदयाला…”

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्लेक किंवा रक्ताच्या गाठी झाल्याने धमन्या ब्लॉक होतात. अशा वेळी हृदयाकजे जाणारा रक्ताचा प्रवाह मर्यादित होतो. तेव्हा छातीमध्ये वेदना व्हायला लागतात. याला अँजाइना (Angina) असे म्हटले जाते. ताणतणाव, काही ठराविक शारीरिक हालचाली अशा कारणांमुळे ही समस्या संभवते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ उपचार म्हणून अँजिओप्लास्टी केली जाते.

अँजिओप्लास्टी म्हणजे काय?

अँजिओप्लास्टीला Percutaneous Coronary Intervention (PCI) असेही म्हटले जाते. प्लेक/ रक्ताच्या गाठींमुळे धमन्या ब्लॉक होतात. त्यांना उघडण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेला Angioplasty म्हणतात. या प्रक्रियेद्वारे ओपन-हार्ट सर्जरी न करता हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्ताभिरण सुरु होण्यास मदत होत असते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ उपचार म्हणून या पर्यायाचा अवलंब केला जातो.

ही प्रक्रिया सुरु असताना पातळ, लांब कॅथेटर ट्यूब रक्तवाहिनीमध्ये टाकली जाते. कॅथेटर ट्यूबच्या सहाय्याने ब्लॉक झालेली जागा शोधता येते. या ट्यूबच्या पुढच्या टोकाला लहान फुगा असतो. ब्लॉकेज शोधून काढल्यानंतर तो फुगा फुगवला जातो आणि त्याच्यामार्फत तेथील ब्लॉक दूर केला जातो. यामुळे रक्त प्रवाह पुन्हा सुरु होतो. हे करत असताना कार्डियोलॉजिस्ट एक्सरेची देखील मदत घेत असतात.

आणखी वाचा – १० वर्षांपूर्वीच दिसू लागतात हृदयविकाराची ‘ही’ गंभीर लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे

स्टेंट (Stent) कशाला म्हणतात?

सुश्मिता सेनने तिच्या शरीरामध्ये स्टेंट ठेवण्यात आली असल्याची माहिती दिली होती. धमन्यांमध्ये ब्लॉक होऊ नये यासाठी स्टेंटची मदत होते. अनेक कार्डियोलॉजिस्ट अँजिओप्लास्टी करताना स्टेंटचा वापर करतात. धातूच्या अतिसूक्ष्म, जाळीदार कॉइल्स म्हणजेच स्टेंट रक्तवाहिनीच्या उघडलेल्या भागामध्ये टाकल्या जातात. ब्लॉकेज होऊ नये आणि रक्ताभिसरण व्यवस्थितपणे सुरु राहावे यासाठी स्टेंटचा वापर केला जातो.

Story img Loader