‘दिल धक धक करने लगा…’ कुणाला प्रेमाच्या गुदगुल्या होतील, कोणाला हृदयरोगाची चाहूल लागेल, तर कुणाची भीतीने गाळण उडेल! हृदयाचे ठोकेच- ज्यांची गती वाढली आहे असे; ज्यामुळे त्यांची जाणीव व्हायला लागते असे आणि त्यामुळे आपले सगळे लक्ष तिकडे केंद्रित होते. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले, तर शरीरातील ॲड्रिनॅलिनचा स्राव वाढला, sympathetic nervous system कार्यान्वित झाली आणि हृदयाचे ठोके वाढले. कुठलाही शारीरिक आजार नसतानाही असे घडते. आपली जेव्हा भीतीने गाळण उडते तेव्हा याच ॲड्रिनॅलिनमुळे तर छातीत धडधड होण्याबरोबर अनेक शारीरिक लक्षणांचा अनुभव येतो. तोंडाला कोरड पडते, श्वास लागतो, हात-पाय थरथर कापू लागतात, दरदरून घाम फुटतो, पायांतले त्राण निघून गेल्यासारखे वाटते. काही वेळा पोटात कळ येते, एकदम थकवा जाणवतो, स्नायूंमध्ये एक ताण जाणवतो.

आणखी वाचा: Health Special: पावसाळी आहार कसा असावा? (पूर्वार्ध)

Union Finance Minister Nirmala Sitharaman highlighted mental health in Economic Survey 2024 25 report
तरुणांचे मानसिक आरोग्य कशामुळे बिघडते ? काय म्हणतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
Interview Stress Job Placement Interview career news
पहिले पाऊल: मुलाखतीचा ताण
children of divorced parents at higher risk of a stroke
आई-वडिलांचा घटस्फोट मुलांसाठी ठरतोय जीवघेणा? कारण काय? नवीन संशोधन काय सांगते?
niv test reveals the root cause of rare guillain barre syndrome disorder
‘एनआयव्ही’च्या तपासणीतून अखेर दुर्मीळ ‘जीबीएस’ विकाराचे मूळ कारण उघड; कशामुळे धोका जाणून घ्या…
guillain barre syndrome pune
पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे थैमान; काय आहे हा दुर्मीळ आजार? याची लक्षणे काय?
Brain Fog symptoms 4 Expert-Approved Foods To Sharpen Your Mind And Reduce Brain Fog
तुम्हालाही छोट्या-छोट्या गोष्टी विसरण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा, ‘या’ आजाराचं असू शकतं लक्षण

मनाला वाटणाऱ्या भीती, चिंतेचा असा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला कमी-अधिक प्रमाणात आलेला असेल. बरे चिंतेची रूपे तरी किती! मुलगा घरी वेळेवर आला नाही, तर आई काळजी करत बसते. दर पाच मिनिटांनी खिडकीतून डोकावून बघते. त्याच्या मोटरसायकलचा ओळखीचा आवाज ऐकू येतो आहे का याच्याकडे कान लावून बसते. घेतलेले कर्ज कसे फेडता येईल याची विवंचना मन पोखरते. मुलीचे सासरी व्यवस्थित चालले आहे ना या कल्पनेने जिवाला घोर लागतो. ‘कसलीही फिकीर न करता तो वेगाने निघून गेला’, असे आपण म्हणतो. ‘आज डावा डोळा का बरे फडफडतोय?’ असे वाटून मनाला हुरहुर लागते.

आणखी वाचा: Health Special: (आतड्यांचा) ‘आतला आवाज’ म्हणजे काय?

बहुतेक वेळा लागलेली हुरहुर थोड्या वेळेपुरती असते. डावा डोळा फडफडणे चांगले असते, अशी मनाची समजूत काढली की, आपोआप बरे वाटते. मुलगा घरी आला की, काळजी संपते. कर्ज प्रत्यक्ष लगेचच फेडले नाही, तरी काहीतरी मार्ग सुचतो आणि विवंचना मन पोखरणे थांबवते. मुलगी प्रत्यक्ष भेटली किंवा व्हिडीओ कॉलवर गप्पा मारताना नेहमीसारखे गोड हसली की, वडिलांच्या जिवाला लागलेला घोर संपतो.

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात काय खावे? काय टाळावे?

पण, जर ही चिंता नाही संपली तर? रोजच मुलगा घराबाहेर पडतानाच मनात चलबिचल व्हायला लागली, दारावरून जाणाऱ्या प्रत्येक मोटरसायकलच्या आवाजाकडे लक्ष जाऊन छातीत धडधड व्हायला लागली तर? कर्ज कसे फेडू या विवंचनेत रात्र रात्र संपून जायला लागली तर? मुलीची खुशाली कळली तरी रोज तिला विचारून खात्री करावी किंवा प्रत्यक्ष भेटावेच, असे सतत वाटू लागले तर? आज डावा डोळा फडफडला, उद्या उजवा फडफडेल, परवा आणखी काहीतरी अपशकुन घडेल, मग तसे होऊ नये म्हणून मी काय उपाय करू असे सतत वाटू लागले तर?

जेव्हा चिंतेचे प्रमाण वाढते, ती दीर्घकाळ राहते, तिच्यामुळे विविध लक्षणे दिसून येतात आणि तिचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो, कार्यक्षमतेवर परिणाम होतो, जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, तेव्हा या चिंतेचे अतिचिंतेच्या, चिंतातुर होण्याच्या मानसिक विकारात (anxiety disorder) रूपांतर होते. चिंता ‘पोखरते’, असे आपण म्हणतो, तेव्हा त्याची तीव्रता त्यातून व्यक्त होते. ‘चिंता किंवा काळजी’ प्रत्येकाला जाणवते; पण त्या सर्वसामान्य भावनेचे रूपांतर मनोविकारात होण्यासाठी तीव्रता, कालावधी व आयुष्यावरील परिणाम अशी तीन परिमाणे लावली लागतात आणि सामान्य (normal) व अस्वाभाविक (abnormal) यामधली सीमारेषा स्पष्ट होते.

चिंतेचा विकार हा साधारण ३-४% लोकांमध्ये आढळून येतो. महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कुठल्या तरी धोक्याच्या अपेक्षेने चिंता वाटू लागते. प्रत्यक्ष धोकादायक स्थिती असेल तर मन घाबरून जाते, भीती (fear) निर्माण होते. समोर वाघ उभा ठाकला, तर भीतीने बोबडी वळते. परंतु, जेव्हा प्रत्यक्ष धोकादायक स्थिती नसते, पण मन कुठला तरी धोका असेल अशी अपेक्षा करते, तेव्हा चिंता (anxiety) निर्माण होते. परीक्षेआधी दोन महिने काही ती ‘परीक्षा’ वाघाप्रमाणे आपल्यासमोर उभी ठाकलेली नसते; पण तरी मनात चलबिचल असते. आपल्याला जमेल की नाही, परीक्षेत यश मिळेल की नाही अशी चिंता वाटू लागते.

चिंता करणे हा एखाद्याचा स्थायीभाव असतो आणि अशी व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने चिंताग्रस्त असते. बाकी अनेक जण काही ना काही कारणाने विशिष्ट परिस्थितीत चिंता करू लागतात. परिस्थिती बदलली किंवा परिस्थितीला तोंड द्यायला शिकलो की, चिंता नाहीशी होते. काही जणांमध्ये लहानपणापासून अतिचिंता असते, आईपासून वेगळे होण्याची चिंता (separation anxiety), शाळेत जाताना भीती (school refusal) अशा विविध रूपांत सुरू झालेली चिंता मोठेपणीही वेगवेगळ्या रूपात त्रास देते. चिंतेच्या काही विकारांमध्ये आनुवंशिकतेचा काही हिस्सा असतो. भीतीचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूतील संरचनेमध्ये काही बदल झालेले दिसतात, अॅड्रीनॅलिन, नॉरअॅड्रीनॅलिन, सिरोटोनिन, डोपामिन अशा रसायनांचे संतुलन बिघडते, त्यांचे प्रमाण कमी होते. आपले मन घडणाऱ्या घटनांचे अवास्तव आणि अतिरेकी असे मूल्यमापन करते, विपरीत परिस्थितीला तोंड देताना विचारांपेक्षा भावनांचा वापर जास्त करते आणि चिंतेचा विकार होतो. कधीतरी एखाद्या गोष्टीची उदा. कबुतराची भीती मनात बसते आणि मोठेपणी आपण कोणत्याही पक्ष्याचे पंख फडफडले की घाबरून जातो. ‘भीती’सुद्धा शिकता येते.

चिंतेच्या विकाराचेसुद्धा अनेक प्रकार आहेत आणि त्यांवर उपायही अनेक आहेत. लवकर निदान आणि योग्य उपचार चिंता पळवून लावायला मदत करतात.
संत रामदास म्हणतात,
‘मनी मानव व्यर्थ चिंता वहाते
अकस्मात होणार होऊनि जाते
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे
मतीमंद ते खेद मनी वियोगे!

Story img Loader