ऑनलाईन जगात मुलं एकमेकांना मोठ्या प्रमाणावर अब्युज करतात. त्यांच्या भाषेत सांगायचे रोस्ट करतात. मग ते बॉडी शेमीन्ग असेल, बुलिंग असेल किंवा अजून काहीही. या गोष्टी जशा मोठ्यांच्या जगात घडतात तशाच त्या मुलांच्याही जगात घडतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या सगळ्याचा समाज शास्त्रज्ञांनी अभ्यास केल्यावर काही मुद्दे मांडले होते. त्याला ‘ब्रोकन विंडो थिअरी’ म्हटलं जातं. ब्रोकन विंडो थिअरी माणसांमधील विध्वंसक वृत्ती अधोरेखित करते. सभ्य समाजरचनेच्या बाहेर जात विध्वंसकपणे वागण्याची काही व्यक्तींची सवय असते किंवा वेळोवेळी उबळ येते. त्यांच्या व्यक्तिमत्वातच हा विध्वंस असतो. समाज शास्त्रज्ञ असं मानतात की ऑनलाईन जगात या हिंसक वृत्तीला खतपाणी मिळते. जर आजूबाजूला लोक एखाद्या विशिष्ट विषयांच्या नावाने आरडाओरडा करत असतील, छाती बडवून बोलत असतील तर मुळात विध्वंसक वृत्ती असलेला व्यक्ती याकडे सहज खेचली जाते आणि आपण जे काही वागतोय ते बरोबर आहे असं मानून ट्रोलिंग/अब्युज/रोस्टला सुरुवात करते.

हेही वाचा : कमी वयात होणाऱ्या मधुमेहामुळे तुमचे आयुर्मान घटणार? संशोधनात समोर आली ‘ही’ माहिती

एका गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, आपण जेव्हा प्रत्यक्ष संवाद करत असतो तेव्हा आपल्या क्रिया या प्रतिक्रिया स्वरूपाच्या असतात. तो प्रतिसाद असतो. आपण गप्पा मारत असतो तेव्हा कुणाच्या तरी बोलण्यावर प्रतिसाद म्हणून आपण काही गोष्टी बोलत असतो. या सगळ्या प्रतिक्रिया देण्याच्या प्रक्रियेत समोरच्याचे शब्द, देहबोली यांचा मोठा सहभाग असतो. आपण समोरच्या व्यक्तीच्या नजरेत बघत बोलत असतो. आपल्याला देहबोलीतून काही गोष्टी समोरच्याला समजत असतात ज्या शब्दातून व्यक्त होत नाहीत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपण आपल्या प्रतिक्रिया देत असतो. पण ऑनलाईन संवादात, चर्चेत हे काहीच घडत नाही.

प्रतिसाद टाईप करताना समोरचा माणूस काय विचार करतोय, त्याची देहबोली काय सांगू बघतेय, त्याचे डोळे काय सांगतायत, तो त्या क्षणी कुठे आहे, कुठल्या मानसिक अवस्थेत आहे यातलं काहीही आपल्याला समजत नाही. त्यामुळे अनेकदा समोरच्या माणसाला म्हणायचं असतं एक आणि समजून होते दुसरीच. बहुतेकदा चर्चेत प्रत्येक व्यक्ती जो अर्थ काढत असतो तो ज्या त्या व्यक्तीच्या त्या वेळच्या मानसिकतेनुसार काढत असतो. एखादा वैतागलेला असेल तर सगळ्या प्रतिक्रिया मुद्दामून अपमानित करण्यासाठी लिहिल्या आहेत असं वाटण्याची दाट शक्यता असते. त्यातून गैरसमज होतात आणि कुणीतरी एक जण पातळी सोडून बोलायला लागतो.

हेही वाचा : ‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे नैराश्याची समस्या वाढतेय का? नैराश्य येण्याचे नेमके कारण काय? डॉक्टर सांगतात…

मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे, ऑनलाईन होणारा संवाद हा अपूर्ण संवाद आहे. समोरची व्यक्ती काय मानसिकतेत आहे, प्रतिक्रिया लिहिताना ती नेमकं काय करते आहे हे काहीही आपल्याला ठाऊक नसताना निव्वळ शब्दांच्या आधारावर अनेकजण मत बनवून आणि ठोकून मोकळे होतात. आणि गैरसमजांचं बीज पेरलं जातं. मुलांच्या बाततीत हे सगळं अनेकदा गंभीर स्वरूप घेतं. त्यातून नैराश्य, अस्वस्थता, स्व प्रतिमेचे प्रश्न तयार होणं या गोष्टी घडतात आणि अनेकदा मुलं मोडून पडतात. त्यामुळे मुलांच्या हातात फोन देताना त्यांना ऑनलाईन चॅटिंगमधले एरर्स सांगितले पाहिजेत. चॅटिंगमध्ये फक्त शब्द आणि ईमोजी असतात, ना आवाज असतो, ना नजर असते ना देहबोली… या गोष्टी नसल्याने काय होऊ शकतं याची माहिती मुलांना हवीच. म्हणजे मग चॅटिंग करताना होणारे गैरसमज, भांडणं, बुलिंगचे प्रकार यांना आळा घालता येऊ शकतो. निदान तसा प्रयत्न करता येऊ शकतो.

हेही वाचा : चायनीजमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो असतो तरी काय? खरंच शरीराचं नुकसान होतं का, तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर..

म्हणजे याचा अर्थ चॅटिंग करू नाही का? तर तसं नाही, जरूर करावं. पण संपूर्ण संवाद फक्त चॅटिंगवरुनच असू नये. जिथे प्रत्यक्ष भेटणं, फोनवर बोलणं शक्य आहे तिथे ते आवर्जून केलं पाहिजे आणि अधून मधून चॅटिंग केलं पाहिजे. थोडक्यात ऑनलाईन आणि ऑफलाईनचा समतोल साधला पाहिजे. हायब्रीड जगणं यालाच म्हणतात.