मुक्ता चैतन्य, समाजमाध्यम अभ्यासक
सायबरबुलिंग हा शब्द आपल्यापैकी अनेकांच्या कानावरून गेलेला असतो, विशेषतः मुलांच्या संदर्भात. मुलांच्या आणि टिनेजर्सच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन जगात मोठ्याप्रमाणावर सायबरबुलिंग चालतं; मग ते दिसण्यावरुन असेल, एखाद्याच्या रंगावरुन, कपडे, बोलणं, आर्थिक परिस्थिती अशा कुठल्याही विषयावर मुलं ऑनलाईन जगात एकमेकांना प्रचंड त्रास देत असतात. सायबरबुलिंगचे ते बळीही ठरतात तसंच काही टिनेजर्स जाणीवपूर्णक सायबरबुलिंगही करतात. असं मानलं जातं की, ऑनलाईन जगात असलेल्या मुलांपैकी ८५ टक्क्यांहून अधिक मुलांना कधी ना कधी सायबरबुलिंगला सामोरं जावं लागतं.
सायबर/ ऑनलाईनबुलिंग म्हणजे काय?
सायबरबुलिंग हा अतिशय गंभीर प्रकारचा सायबर गुन्हा आहे. सायबरबुलिंगला ऑनलाईनबुलिंगही म्हटलं जातं. बुलिंग म्हणजे गुंडगिरी, एक प्रकारचा छळ. आपण सगळेच व्हॉट्सअप वापरतो, वेगवेगळ्या सोशल मीडियावर असतो, चॅटिंग करतो, आपल्या सगळ्यांची ईमेल अकाउंट्स असतात. या सगळ्या माध्यमातून जर कुणी एखाद्याला धमकावत असेल, त्रास देत असेल, अपमान करत असेल, वाईटसाईट बोलत असेल, घाबरवत असेल, अश्लील बोलत असेल, अश्लील चित्र किंवा फोटो दाखवत असेल, भीती वाटेल, असुरक्षित वाटेल असं बोलत असेल, दिसण्यावरुन टोमणे मारत असेल, कपड्यांवरुन, आर्थिक परिस्थितीवरुन वाईट साईट बोलत-लिहीत असेल तर या सगळ्यालाच सायबरबुलिंग म्हटलं जातं.
हेही वाचा… Health Special: ‘हे’ शैवाल ठरते आहे नवीन नैसर्गिक संतुलित आहार!
अनेकदा सायबरबुलिंग इतकं टोकाचं होतं की ती व्यक्ती निराश होऊन जाते. यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही असंही त्यांना वाटू लागतं. अनेकदा टीनेजर्सना चेष्टा कुठे संपते आणि बुलिंग कुठे सुरु होतं हे समजत नाही; तर काहीवेळा, एखाद्या मुलाला/मुलीला टार्गेट करुन मुद्दामहून त्रास देत मजा घेणं हा प्रकारही पाहायला मिळतो. हे प्रकार व्हॉट्सअॅप, इन्स्टाचे ग्रुप्स अशा प्लॅटफॉर्म्सवरुन मोठ्याप्रमाणावर होतात. ट्रोलिंग करणारे ओळखीचे अनोळखी कुणीही असतात, सायबरबुलिंग करणारे बहुतेकदा टिनेजर्सच्या ओळखीचे, त्यांचेच मित्र- मैत्रीण असतात.
परिणाम काय होतो?
सायबरबुलिंगचे मनोसामाजिक परिणाम पाहायला मिळतात.
मला खूप उदास वाटतंय: भावनिक परिणाम
सायबर बुलिंगमध्ये कुणीही समोर येऊन वाट्टेल ते बोलत नाही. पण चॅटिंगमधले शब्दच अनेकदा खूप बोचतात. एखाद्याने केलेली कॉमेंट अगदी मनाला लागते. सायबरबुलिंगमुळे अनेक टिनेजर्सना आणि मुलांनाही अस्वस्थता येते, आत्मविश्वास कमी होतो. काहीवेळा निराश वाटू शकतं, नैराश्य येऊ शकतं. भारतात तर सायबरबुलिंगमुळे काही टीनेजर्सनी आत्महत्यासुद्धा केल्या आहेत.
झोपच येत नाही: शारीरिक परिणाम
मनावरचा ताण वाढला की, त्याचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो. जी मुलं सायबरबुलिंगचे बळी ठरतात त्यांच्यामध्ये ताणातून निर्माण झालेले शारीरिक परिणाम दिसून येतात. अनेक टीनेजर्सना रात्री शांत झोप लागत नाही. काही टिनेजर्सना ताण हाताळता आला नाही की, ते खूप खायला तरी लागतात किंवा त्यांची भूक तरी मरते. त्यामुळे वजन वाढलं किंवा कमी झालं तरी त्यामुळेही परत ऑनलाईनबुलिंग होण्याची शक्यता असते.
मला कुणाशी बोलायचं नाही: नात्यांवर परिणाम
सायबरबुलिंगचा अजून एक परिणाम म्हणजे आयसोलेशन, म्हणजेच एकटेपणा. कुणाशीही बोलावंसं न वाटणं, कशातच सहभागी व्हावंसं न वाटणं. अगदी आईबाबा, आजीआजोबा यांच्याशीही बोलण्याची इच्छा नसणं. शाळा कॉलेजमध्येही कुठल्याच उपक्रमात सहभागी न होणं.
मी कोण आहे?: दीर्घकालीन परिणाम
सायबरबुलिंगचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. आपण नेमके कोण आहोत असा प्रश्न पडू शकतो. छळणाऱ्या, त्रास देणाऱ्या व्यक्तीने जो त्रास दिलेला असतो त्यामुळे आत्मविश्वास जावून, स्वतःवर शंका घेणं सुरु होऊ शकतं. आपल्यातच काहीतरी चुकीचं असेल म्हणून आपल्याबरोबर असं सगळं घडलं असंही वाटू शकतं.
पालक आणि शिक्षकांनी काय करायला हवं?
- अनेकदा मुलं बुलिंगविषयी पालकांना किंवा शिक्षकांना सांगत नाहीत. यामागे दोन कारणे असतात. एक तर मुलांना बुलिंग करणाऱ्या इतर मुलांची किंवा मोठ्यांची भीती वाटत असते. किंवा आपण आपले प्रश्न सोडवू शकतो असंही त्यांना वाटतं असतं, त्यामुळे ते सांगत नाहीत. अशावेळी मुलांमध्ये काही वर्तणुकीय बदल घडतायेत का याकडे पालक आणि शिक्षकांचे लक्ष हवे.
- मूल सतत मोबाईलवर असेल आणि मोबाईल वापरून झाल्यावर एकटं एकटं राहत असेल, रडत असेल तर त्यांच्याशी बोललं पाहिजे. ऑनलाईन जगात काही सुरु नाहीये ना हे विश्वासात घेऊन विचारलं पाहिजे.
- जर मुलाला सायबरबुलिंग होतंय असं लक्षात आलं तर संबंधित मुलांच्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा केली पाहिजे. बुलिंगचे मानसिक परिणाम फार दीर्घ आणि खोलवर असतात. त्यामुळे याकडे गांभीर्यानेच पाहिलेलं बरं.
- मूल निराश दिसत असेल, एकटं राहत असेल तर त्याला ताबडतोब समुपदेशकाकडे घेऊन गेलं पाहिजे. काहीवेळा पालकांनी सांगण्यापेक्षा तीच गोष्ट समुपदेशकांनी सांगितली तर मुलांना चटकन कळते. पटतेही.
- सायबरबुलिंग फार गंभीर प्रकारचे असेल, म्हणजे उदा. फोटो मॉर्फ करुन, न्यूड फोटो तयार करणं किंवा चुकीची माहिती व्हायरल करणं अशा गोष्टी घडल्या असतील आणि पुन्हा पुन्हा सूचना देऊन घडत असतील तर मात्र या विषयाकडे शाळेने गंभीरपणे पाहायला हवे. बुलिंग करणारी व्यक्ती फक्त ऑनलाईन परिचयाची असेल तर अशावेळी सायबर पोलिसांची मदत घेतली पाहिजे.
- ऑनलाईन बुलिंग झालेल्या मुलांना आत्मविश्वास देणं, त्यात त्यांची चूक नाही हे सांगणं आणि ते नैराश्यात जाणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक असतं. कारण ऑनलाईन बुलिंगचा परिणाम मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर, अभ्यासावर, वर्तणुकीवर सगळ्यावर होत असतो.