अनेकदा आपण गर्भावस्थेत असणाऱ्या स्त्रियांमध्ये असताना मधुमेहाचे निदान झाल्याचे ऐकतो. यात गर्भवती महिलेच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढलेली असते. ही पातळी बाळाचा जन्म झाल्यावर आपोआप कमी होते. मात्र या प्रकारच्या मधुमेह असणाऱ्या स्त्रियांना वजन, आहार, विहार याबद्दल दक्षता घेणे आवश्यक ठरते.

गर्भावस्थेतील मधुमेह म्हणजे नक्की काय?

अनेक महिलांना गर्भारपणात मधुमेहाचे निदान होते. याला इंग्रजीत जेस्टेशनल डायबिटीस असे म्हटले जाते. टाईप २ प्रकारातील हा मधुमेह आहे. यात उपाशी पोटी ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. तसेच HbA1cचे प्रमाण देखील ६% हून जास्त असते.

Health Special What exactly is insulin
Health Special : इन्सुलिनच्या जगात
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
what happens to blood sugar levels when you walk after a meal
जेवल्यानंतर चालल्यास खरोखर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा….
Donald Trump
विश्लेषण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची जागतिक समुदायाला धास्ती का वाटते? शांतता, पर्यावरण, आर्थिक मदतीचे मुद्दे बासनात?
eating egg whites is not good for you
Eating Egg Whites Healthy Or Not : फक्त अंड्यातील पांढरा भाग खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी मांडली मते…

गर्भारपणात होणारा मधुमेह खालील महिलांमध्ये विशेषतः आढळून येतो.

वय वर्ष २५ नंतर गर्भधारणा होणाऱ्या महिला

गर्भारपणाआधी प्री -डायबिटीसचे निदान झालेल्या महिला

गर्भधारणा होण्यापूर्वी स्थूलत्व असणाऱ्या महिला

शरीरात संप्रेरकांचे असंतुलन असणाऱ्या महिला (PCOS , थायरॉईड इत्यादी)

निकृष्ट आहार / तणावयुक्त जीवनशैली असणाऱ्या महिला

गर्भारपणात वाढलेली रक्तातील वाढलेली साखरेची पातळी गर्भार मातेमध्ये खालील लक्षणे दाखवू लागते

हेही वाचा : तुम्ही दिवसभरातील शेवटचे जेवण कोणत्या वेळी केले पाहिजे? तज्ज्ञांनी केला खुलासा

१. वजन आवश्यकतेहून जास्त वाढणे

२. तोंडाला कोरड पडणे

३. खूप तहान लागणे

४. थकवा जाणवणे

५. जननेंद्रियांना खाज येणे

६. रात्रीची लघवी होणे

गर्भावस्थेत झालेल्या मधुमेहामुळे काय परिणाम होतात?

-बाळाचे वजन अनावश्यक वाढणे

-गर्भाशयातील पाण्याचे प्रमाण वाढणे

-गर्भावस्थेत गर्भाशयावर ताण येऊन बाळाला जन्म देताना अपघाती त्रास होणे

-ठरलेल्या कालावधी आधीच किंवा ३७ आठवड्यापूर्वीच बाळाचा जन्म होणे

नेहमी गर्भधारणेसाठी उत्सुक असणाऱ्या स्त्रियांना आहार , जीवनशैली यात आवश्यक शिस्त आणणे महत्वाचे आहे. वेळेवर जेवणे शक्य तितकं सकस अन्न खाणं आवश्यक आहे.

हेही वाचा : डोकेदुखी, पोटदुखी झाली की लगेच पेनकिलर घेताय? अतिवापरामुळे होऊ शकतो आरोग्याला धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

अनेकदा पहिल्या तीन महिन्यातच वजन वाढवण्याच्या उद्देशाने गर्भवती महिला डोहाळे आहेत म्हणून किंवा गर्भावस्थेत वजन नीट वाढावं म्हणून अनावश्यक प्रमाणात जास्तीचे अन्न खातात. यातील काही खाद्यपदार्थ डोहाळे म्हणून खाताना गर्भावस्थेतील पौष्टिक तत्वांच्या कमतरतेचा विचार होणं अत्यावश्यक ठरतं.

दोन जीवांसाठी किंवा दोघांसाठी आहारात बदल करताना पोषणतत्वांचा विचार प्रामुख्याने करायला हवा. केवळ कॅलरीजने भरपूर असलेल्या पदार्थांपेक्षा लोह, खनिजे, क जीवनसत्त्व, प्रथिने यांचं संतुलित प्रमाण असलेला आहार गर्भावस्थेतील मधुमेहापासून रक्षण करू शकतो.

डायबिटीसचा जनुकीय प्रकार म्हणजे डायबिटीस इन्सिपिडस ज्याला नेफ्रोजेनिक डायबिटीस इन्सिपिडस असे देखील म्हटले जाते. या मधुमेहाच्या प्रकाराबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

या प्रकारच्या मधुमेहाला अर्जिनीन वासोप्रेसीन(AVP) डिसऑर्डर असे देखील म्हटले जाते. शरीरातील अँटी डाय युरेटिक संप्रेरकाचे प्रमाण कमी होऊन शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी होते. मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीमधून वासोप्रेसीनचे प्रमाण कमी प्रमाणात स्त्रवत असल्यामुळे या प्रकारचा मधुमेह झाल्याचे निदान होते. २५००० लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारचा मधुमेह आढळून येतो. या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीरातील काही जनुकीय प्रमाण कमी असल्याने जे मानवी शरीरात फार क्वचित आढळते या प्रकारच्या मधुमेहाच्या रुग्णाचे प्रमाण जगभरात कमी आहे.

शरीरातील पाण्याची पातळी, रक्तातील क्षारांची पातळी , काही वैद्यकीय औषधांचा दुष्परिणाम म्हणून देखील तोंडाला कोरड पडण्यापासून लक्षणे दिसू लागतात.
या रुग्णांमध्ये शरीरातील केवळ पाण्याचे प्रमाण अतिरेकी वाढून क्षार अतिशय कमी होऊ शकतात.

हेही वाचा : Rava vs Wheat Flour : रवा की गव्हाचे पीठ; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

या प्रकारच्या मधुमेहामध्ये खालील लक्षणे आढळून येतात

-वजन कमी होणे

-शरीराचे तापमान कमी होणे

-थकवा येणे

-डोकेदुखी होणे

-मूत्राशय कमकुवत होणे

-मेंदूची कार्यक्षमता कमी होणे

या प्रकारच्या मधुमेहामध्ये रुग्णांच्या आहारातील क्षारांचे प्रमाण, प्रथिनांचे प्रमाण मोजूनच घ्यावे लागते. अनेकदा शस्त्रक्रिया हा एकच पर्याय या प्रकारच्या मधुमेही रुगांसाठी उपलब्ध असतो. मात्र अत्यंत दुर्मिळ असलेल्या या मधुमेहाच्या शक्यता कमी करण्याकरिता आहारातील मीठ आणि प्रथिने यांचे अत्यल्प प्रमाण परिणामकारक ठरते.

आतापर्यंत आपण विविध प्रकारच्या मधुमेहाबद्दल जाणून घेतलं. पुढच्या भागांमध्ये मधुमेह आणि आहाराबद्दल जाणून घेऊ.

Story img Loader