Dry Ice Effect on Human Body : नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेत गुरुग्राम येथील एका रेस्टॉरंटमध्ये काही ग्राहकांना जेवणानंतर माऊथ फ्रेशनरऐवजी चुकून ड्राय देण्यात आला, ज्यामुळे त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) नुसार ड्राय आईस हा प्राणघातक पदार्थ असल्याचे सांगितले जाते. अगदी युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA), तसेच रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राद्वारे (CDC), “ड्राय आईसला थेट हातांनी स्पर्श न करण्याचा सल्ला दिला जातो. नेहमी अतिशय थंड तापमान आणि सुरक्षिततेसाठी डिझाइन केलेले हातमोजे आणि गॉगलचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

ड्राय आईस म्हणजे काय? ( What is dry ice?)

“ड्राय आईस हा अत्यंत कमी तापमानातील घन अवस्थेतील कार्बन डाय ऑक्साइड असतो, ज्याचे तापमान सुमारे -७८.५ अंश सेल्सिअस (-१०९.३ अंश फॅरेनहाइट) इतके असते. sublimation गुणधर्मामुळे ड्राय आईसचे घन अवस्थेतून थेट वायू अवस्थेमध्ये रुपांतर होते. पाण्याच्या बर्फाप्रमाणे त्याचे द्रवामध्ये रुपांतर होत नाही. ड्राय आईसचा वापर सहसा पदार्थ गोठवण्यासाठी आणि थंड करण्यासाठी वापरले जाते”, असे दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलचे (आर), अंतर्गत औषध विभागाचे संचालक, डॉ. राजीव गुप्ता यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सांगितले.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर

ड्राय आईस हे वैद्यकीय, अन्न, पेय आणि संशोधन क्षेत्रांमध्ये विविध उद्देशांसाठी काम करते.

ड्राय आईस संबंधित आरोग्य धोके काय आहेत?

जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबिना एनएम यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सांगितले की, “रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये ठराविक पदार्थ थंड ठेवण्यासाठी ड्राय आईसचा वापर केला जातो. अनेकदा ग्राहकांना भुरळ पाडण्यासाठी काही खाद्यपदार्थ सर्व्ह करताना, वाफ सदृष्य आभास निर्माण करण्यासाठी ड्राय आईसचा वापर केला जातो. ड्राय आईस जरी कुलिंग एजंट म्हणून चांगले काम करत असले तरी ते वापरताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ड्राय आईसमधील कार्बन डाय ऑक्साइड वायू आणि अत्यंत थंड तापमानामुळे तो अयोग्यरित्या हाताळल्यास श्वसनाच्या समस्या किंवा त्वचेला दुखापत होऊ शकते.

डॉ. गुप्ता यांच्या मते, “जेव्हा ड्राय आईस त्वचेच्या संपर्कात येतो, तेव्हा त्याच्या कमी तापमानामुळे फ्रॉस्टबाइट किंवा कोल्ड बर्न्स होऊ शकतात. ”

आरोग्यावरील परिणामांच्या बाबतीत, ड्राय आईसची मुख्य चिंता कार्बन डाय ऑक्साइड वायू सोडणे ही आहे. “जेव्हा ड्राय आईस घन स्वरुपातून वायूमध्ये रुपांतरीत होतो, तेव्हा तो कार्बन डाय ऑक्साइडमध्ये बदलतो. बंदिस्त जागा, जिथे हवा खेळती नसते अशा भागात कार्बन डाय ऑक्साइडच्या संचयनामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे श्वासोच्छवासाचा धोका निर्माण होऊ शकतो”, असे मुंबईतील परेल येथील ग्लोबल हॉस्पिटल्सच्या अंतर्गत औषध विभागाच्या वरिष्ठ सल्लागार, डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सांगितले.

हेही वाचा – Overeating & Weight Gain : अतिप्रमाणात खाण्याची सवय आहे? वजन वाढू शकते, खाण्याची सवय अशी करा संतुलित…

छोट्या बंदिस्त ठिकाणी जिथे ड्राय आईसपासून मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड वायू निर्माण होतो, अशा वायूमध्ये श्वास घेतल्यास चक्कर येणे आणि श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. “हवेशीर असलेल्या ठिकाणी ड्राय आईसचा वापर करणे आणि त्वचेचा संपर्क टाळण्यासाठी उष्णतारोधक हातमोजे किंवा चिमट्याने हाताळणे महत्त्वाचे आहे”, असे डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले.

शिवाय, “ड्राय आईसच्या किंवा त्याच्या वाफेच्या संपर्कात आल्याने डोळ्यांची जळजळ होऊ शकते, लालसरपणा आणि अस्वस्थता दिसून येते”, असे पालघरचे अधिकारी लाइफलाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार फिजिशियन डॉक्टर दीपक पाताडे यांनी स्पष्ट केले.

ड्राय आईस सेवन करणे किंवा गिळणे हे तो थेट हातात पकडण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. “ड्राय आईसमुळे तुमच्या तोंडातील ऊती, अन्ननलिका आणि पोट गोठू शकतात”, असे हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलच्या सल्लागार फिजिशियन, डॉ. रंगा संतोष कुमार यांनी सांगितले.

डॉ. कुमार म्हणाले की, सर्वात मोठा धोका तेव्हा असतो जेव्हा लोक ड्राय आईसचा वापर धूम्रपानाप्रमाणे करतात. अनेकदा काही लोक ड्राय आईस तोंडामध्ये टाकून त्याची वाफ तोंडातून बाहेर काढतात. “व्यावसायिक मनोरंजन करणारे आणि शिक्षक जरी हे प्रात्यक्षिक दाखवू शकत असले, तरी ड्राय आईसचा तुकडा चुकून गिळण्याचा धोका असतो”, असे डॉ. कुमार म्हणाले.

आरोग्याचा धोका टाळण्यासाठी ड्राय आईसचा वापर करताना नेहमी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.

हेही वाचा – कॉफी प्यायल्याने हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात का? किती कप कॉफी पिणे आहे सुरक्षित? तज्ज्ञांनी केला खुलासा

ड्राय आईस वापरताना सावधगिरी कशी बाळगावी?
“घरामध्ये ड्राय आईसचा वापर किंवा साठवणूक करताना तो हाताळण्याची योग्य पद्धत, सर्वसमावेशक संरक्षणात्मक उपाय आणि पुरेश्या प्रमाणात खेळती हवा असणे आवश्यक आहे”, असे डॉ. पाताडे म्हणाले.

Story img Loader