मंगल गेले अनेक दिवस कोणाशी काही बोलतच नव्हती. समोर कुठेतरी नजर लावून बसे. तासन तास एके ठिकाणी उभी राही, हलवले तरी जागेवरून हलत नसे. अंघोळ, जेवण हे सगळे तर सोडलेच होते. हात धरावा तर त्यात एक ताठरपणा जाणवे. तसा तिचा मानसिक आजार सुरू होऊन २ वर्षे झाली होती. स्किझोफ्रेनियाचे निदान झाले होते. गेले ३ महिने औषधे बंद होती. डॉक्टर म्हणले तिला ‘Catatonia’ झाला आहे, म्हणजे चलनवलनाच्या अनियमितपणाच्या लक्षणांचा सामुचय. स्किझोफ्रेनियाचे हे एक लक्षण असू शकते. डॉक्टर म्हणले, ‘ईसीटी द्यावे लागतील.’ मंगलचा भाऊ गडबडला, ‘म्हणजे विजेचे झटके ना? अरे बाप रे!’

गेले तीन महिने सुरेश स्वतःशीच झगडत होता. मनात सतत नकारात्मक विचार यायचे. दिवसभर उदास वाटायचे. कित्येक दिवसात ऑफिसला गेला नव्हता तो. झोप उडालीच होती. धड खाणेपिणे नाही, स्वतःची काही काळजी घेणे नाही, कसे तरी चुरगळलेले कपडे घातलेले. निराश होऊन घरात एका कोपऱ्यात बसून राहायचा. गेले पंधरा दिवस सतत त्याला सारखा एकाच विचार मनात यायचा, ‘ कशाला जगायचे? आयुष्यात काही चांगले कधी घडणारच नाही. मझ्या जगण्याला आता काही अर्थ राहिला नाही. त्यापेक्षा मरून जावे.’ त्याची पत्नी फार काळजीत होती. मनोविकारतज्ज्ञांकडे(psychiatrist) घेऊन गेली. त्यांनी निदान केले, ‘उदासपणा’(depression). सुरेशच्या मनात सारखे येणारे आत्महत्त्येचे विचार, त्याचे स्वतःकडे अजिबात लक्ष नसणे हे पाहून त्यांनी ईसीटी द्यावे असे सुचवले. सुरेशच्या पत्नीने विचारले,’वाचेल ना सुरेश?’

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
snake bites disease
सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी

आणखी वाचा: Health Special: सगळं संपवून टाकावं वाटतं तेव्हा काय विचार …

असे अनेक प्रश्न ई. सी. टी. च्या बद्दल सगळ्यांच्याच मनात असतात. ईसीटी म्हणजे Electroconvulsive Therapy. थोडक्यात विजेच्या सहाय्याने मेंदूला एक झटका देणे. कसा देतात तो? किती मोठा विजेचा प्रवाह (current) वापरला जातो? किती धोकादायक आहे ही पद्धत?
सगळ्यात प्रथम हे जाणून घेऊ की ई. सी. टी. ही उपचार पद्धत विविध प्रयोगांमधून सिद्ध झालेली आहे. १९३८ सालापासून अस्तित्वात असलेली आणि अधिकाधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित झालेली अशी ही उपचार पद्धत आहे. आत्ताच्या आधुनिक उपचारपद्धतीमध्ये विजेचा प्रवाह किती असावा, किती वेळ दिलं जावा, विजेचा दाब (voltage) किती असावा इत्यादी अनेक गोष्टींची परिमाणे ठरलेली आहेत आणि त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत. इतकेच नाही तर कायद्याने देखील याचे काही नियम घालून दिले आहेत.

ईसीटी ही प्रक्रिया एखाद्या शस्त्रक्रियेसारखी (surgery) असते. शस्त्रक्रियेआधी जशी भूल (anesthesia) दिली जाते, तशीच ईसीटी आधी दिली जाते. पेशंट, नातेवाईक यांच्या संमतीखेरीज ईसीटी देता येत नाहीत. लिखित स्वरूपात, माहितीपूर्ण अनुमती घेतली जाते.(written informed consent). अतिशय थोडा विजेचा प्रवाह, म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या विजेच्या एक पंचमांश(1/5 current ), विजेचा दाब एक चतुर्थांश(¼ voltage), इतकाच दिला जातो आणि तो ही केवळ एक दशांश सेकंद(100 msec, 1/10 second) ते जास्तीत जास्त ४-८ सेकंद दिला जातो. अत्यंत नियंत्रित स्वरूपात, भूल्ताज्ज्ञांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली जाते.

आणखी वाचा:  Health Special: ‘मुलांच्या मोबाइलचं व्यसन सोडवायला हवं का?’ त्याआधी हे नक्की वाचा

ईसीटी सुरू करण्यापूर्वी सर्व शारीरिक तपासण्या कराव्या लागतात. साधारणतः ६,८, १० किंवा पेशंटच्या लक्षणांच्या तीव्रतेनुसार, होणाऱ्या सुधारणेनुसार आवश्यक तेवढे ईसीटी दिले जातात. आत्महत्येचे सतत विचार येणे, खाणे पिणे इत्यादी गोष्टींकडे सलग काही काळ दुर्लक्ष असणे, catatonia, उदासपणाची अतिशय तीव्र लक्षणे, औषधांना पुरेसा प्रतिसाद नसणे अशा अनेक कारणांनी ईसीटी दिले जातात. लहान मुलांना १८ वयापर्यंत ईसीटी द्यायला कायद्याची अनुमती नाही. परंतु वृद्धांमध्ये ईसीटी दिले जाऊ शकतात.

ईसीटीच्या सहाय्याने वेगाने सुधारणा होते. ईसीटी कसे काम करतात यासंबंधीही बरेच संशोधन झाले आहे. मेंदूचा रक्तप्रवाह, साखरेचा आणि ऑक्सिजनचा मेंदूतील वापर ईसीटीच्या काळात वाढतो आणि मग कमी होतो. तसेच विविध रासायनिक बदल होतात, मेंदूतील रासायनिक असंतुलन कमी केले जाते.
ईसीटीचे दुष्परिणाम कमी आहेत आणि तात्पुरते असतात. काही काळ डोके दुखणे, एखादे वेळेस गोंधळून जाणे(delirium), स्मरणशक्तीवर परिणाम हे काही सर्वसाधारण दुष्परिणाम आहेत. अतिशय सुरक्षित अशी ही उपचार पद्धती आहे. ईसीटीविषयी पुरेशी आणि वैज्ञानिक माहिती असेल तर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या उपचाराचा खरा लाभ घेतात.

ईसीटी ही प्रक्रिया एखाद्या शस्त्रक्रियेसारखी आहे. त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने चेतासंस्थेला उद्दीपित करण्याची पद्धत शोधून काढण्याचा गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहे. आता आणखी काही नवीन उपचार पद्धती विकसित झाल्या आहेत आणि त्यांचा मर्यादित स्वरूपात उपयोग केला जात आहे.
त्यातली एक उपचार पद्धती म्हणजे Transcranial magnetic stimulation, म्हणजे मेंदूचे चुंबकीय उत्तेजन. यात सतत बदलणारे चुंबकीय क्षेत्र डोक्याला लावलेल्या एका यंत्रातून निर्माण केले जाते. यामुळे छोटे छोटे अनेक विजेचे प्रवाह तयार होतात ज्यातून चेतापेशींचे वेगवेगळे विभाग (circuits) उद्दीपित होतात. यातून मेंदूतील कमी कार्यशील भाग उद्दीपित होतात आणि लक्षणांमध्ये सुधारणा होते. उदासपणा, सतत येणारे आत्महत्त्येचे विचार, उपचारांना प्रतिसाद न देणारे भास, काही अतिचिंतेचे विकार अशा विविध विकारांवर या उपचारपद्धतीचा वापर सुरू झाला आहे. तसेच या सर्वांसाठी अधिकाधिक शास्त्रीय पुरावे गोळा करणेही सुरू आहे. फिट येण्याची शक्यता हा मुख्य दुष्परिणाम या प्रक्रियेमध्ये आहे.

अशीच आणखी एक उपचार पद्धत गेल्या काही वर्षांत विकसित झाली आहे- Transcranial Direct Current Stimulation. यामध्ये अतिशय कमी (1-3 mA) असा विजेचा प्रवाह डोक्याला बाहेरून दिला जातो. यामुळे चेतापेशींच्या ध्रुवीकरणात (polarization) बदल होतो त्यामुळे चेतापेशींच्या कार्यावर परिणाम होऊन पेशंटच्या लक्षणात सुधारणा होते. उदासपणा, उपचारांना प्रतिसाद न देणारे भास, दारू आणि तंबाखूचे व्यसन, मंत्रचळ(obsessive compulsive disorder) अशा मानसिक विकारांवर हा उपचार वापरला जाऊ लागला आहे. डिमेन्शियामध्येसुद्धा याचा वापर केला गेला आहे.
छोटे उपकरण आणि स्वस्त उपाय असा हा उपचार आहे, हा त्याचा फायदा. अशा प्रकारे मनोविकारांवर परिणामकारक आणि सुरक्षित असे उपाय शोधण्याचा, वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करण्याचा आणि मगच उपयोगात आणण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. या सगळ्याचा रुग्णांना नक्कीच लाभ होईल अशी खात्री आहे.

Story img Loader