आईस अॅपल म्हणजेच ताडगोळे. हे फळ चवीला गोड, स्वादिष्ट असून ते दिसायला मांसल आणि पारदर्शक असते. हे दुर्मिळ समुद्र किनारी फळ तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या प्रदेशात आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये आढळते. ते नारळासारख्या फळाच्या आत बंद असते ज्याचे बी बाहेर काढण्यासाठी बाहेरचे आवरण कापले जाते. याच बीला आईस अॅपल किंवा ताडगोळा म्हणून ओळखले जाते जे मासांसारखे दिसते आणि पारदर्शक पिवळसर असते. हे फळ बर्फासारखे दिसते आणि चौकोनी आकाराचे असते. तुम्हाला माहितीये का या फळाला सुपरफूड मानले जाते पण का ? चला जाणून घेऊ या.
आईस अॅपल म्हणजेच ताडगोळे
हे चौकोनी बर्फासारखे फळ, आईस अॅपलला मराठी, हिंदीत ताडगोळा आणि तमिळमध्ये नुंगू असेही म्हणतात. आईस अॅपल हे मुळात पामच्या झाडाचे फळ आहे, जे शीतलता देण्याचे काम करते आणि भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात एक सामान्य उन्हाळी फळ आहे. या वनस्पतीचे बाह्य कवच नारळासारखे दिसते, परंतु ते एक सुपरफ्रूट ठरते ते त्याच्या पोषक तत्वांनी भरलेली रचनेमुळे. ताडगोळा हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि निरोगी साखरेने समृद्ध असे फळ आहे. हे फळ वजन कमी करण्यास मदत करू शकते असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी ताडगोळ्यांचे सेवन करण्याचे शिफारस पुण्याचील सर्वाय आयुर्वेदच्या डॉ. स्नेहल जाधव यांनी केली आहे. ”नैर्सगिक पाण्याने समृद्ध असे ताडगोळे शरीराला थंडावा देतात आणि अनेक पोषक घटक पुरवितात.”
आईस अॅपलचे हे सुपरफूड का आहे?
बर्फासारखे दिसणारे हे फळ जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, फायटोन्यूट्रिएंट्स आणि कार्बोहायड्रेट्सने भरलेले आहे. त्याशिवाय, या कमी-कॅलरी असलेल्या या फळामध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे ए, सी, ई, आणि के, लोह, जस्त, फॉस्फरस आणि पोटॅशियम जास्त असते, जे संपूर्ण प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. हे फळ तुमच्या आहारात समाविष्ट केल्याने चयापचय वाढण्यास मदत होते, जे पचन सुधारण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते. शिवाय, आहारातील फायबर, प्रथिने आणि पाण्याचे प्रमाण एकत्र असल्याने प्रभावी वजन नियंत्रित करण्यास मदत होते.
आईस अॅपल वजन कमी करण्यात कशी मदत करते?
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मग हे फळ तुमच्या आहारात समाविष्ट करा. ताडगोळे नैसर्गिकरित्या पाण्याने भरलेले असतात, जे उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी उत्तम आहे. या फळातील फायबर घटक तृप्ति प्रदान करतात आणि शरीराला थंडपणा देते, जे पचन आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. या फळामध्ये असलेले आहारातील फायबर लॅक्सेटिव्ह म्हणूनही काम करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. अखेर, या फळाच्या कमी कॅलरी असलेली रचनेमुळे ते उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी एक परिपूर्ण फळ ठरते.