हल्ली अनेक रुग्णांमध्ये पोटाची सोनोग्राफी केल्यास त्यामध्ये यकृतातील चरबी वाढल्याचे आढळून येते. सर्वसाधारणव्यक्ती असा रिपोर्ट पाहून घाबरून जातात. म्हणूनच आज आपण यकृतातील चरबी विषयी जाणून घेऊया. यकृत हा तुमच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. यकृत तुमच्या शरीराला अन्न पचवण्यास, ऊर्जा साठवण्यास आणि शरीरातील विष काढून टाकण्यास मदत करते. यकृतातील चरबी का बरे वाढते? जेव्हा आपण आवश्यकतेपेक्षा जास्त साखर किंवा चरबीयुक्त अन्नपदार्थ खातो तेव्हा आपल्या शरीरात ही जास्तीची साखर किंवा चरबी यकृतामध्ये चरबीच्या रूपात साठवली जाते.

या आजाराचे दोन मुख्य प्रकार आहेत:
१. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग (NAFLD)
२. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग, ज्याला अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटीस (यकृताला आलेली सूज) देखील म्हणतात.

Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
How Cold Weather Impacts Men's Sexual Health
हिवाळ्यात पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितले, कशी घ्यावी काळजी?
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
Roasted chana with kishmish benefits
उपाशीपोटी हरभरा आणि मनुक्यांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता का? त्यावर उपाय काय?
what post dinner sugar cravings are doing to your sleep metabolism and health
रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय ठरतेय धोकादायक! झोपेसह आरोग्यावर होतायत ‘हे’ गंभीर परिणाम, वाचा….

आणखी वाचा: Health Special: वेदना आपल्या संरक्षणासाठी असते, म्हणजे काय?

१. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) म्हणजे काय?
NAFLD मद्यपी नसणाऱ्या व्यक्तींच्या यकृतातील चरबी वाढणे. त्याचेही दोन प्रकार असतात.
अ. साधी यकृतातील चरबी , ज्यामध्ये तुमच्या यकृतामध्ये चरबी असते परंतु त्यामुळे यकृत पेशींचे नुकसान होत नाही.
ब . नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपॅटायटीस (NASH), ज्यामध्ये यकृत पेशींचे नुकसान होते त्यामुळे यकृतामध्ये अनेक बदल होतात. यामध्ये यकृत घट्ट होते ( फायब्रोसिस) किंवा यकृत पेशींचा नाश होऊ शकतो. NASH मुळे पुढे सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो.

२. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग म्हणजे काय?
अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा आजार जास्त मद्यपानामुळे होतो. तुमचे यकृत शरीरातील मद्यावर प्रक्रिया करून, ते तुमच्या शरीरातून काढून टाकते. मद्यपानामुळे तयार झालेली ऊर्जा चरबीच्या स्वरूपात यकृतात साठा करून ठेवली जाते. परंतु हे करताना हानिकारक पदार्थ तयार होतात. हे पदार्थ यकृताच्या पेशींना हानी पोहोचव तात. आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारक शक्ती कमकुवत करतात. तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात मद्यपान कराल तितके तुमचे यकृत जास्त बिघडत जाते. अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग (यकृतातील चरबी) हा मद्यपाना संबंधित यकृत रोगाचा प्रारंभिक टप्पा आहे. पुढील टप्पे अल्कोहोलिक हेपेटायटीस आणि सिरोसिस आहेत.

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात एसी आरोग्याला धोकादायक?

यकृतातील चरबीची कारणे
जेव्हा आपल्या आहारातील चरबीचे योग्य रीतीने विघटन होऊन त्याचा योग्य वापर झाला नाही तर यकृतामध्ये चरबीची साठवण होते. आहारात जास्त साखर किंवा स्निग्ध पदार्थ आणि त्यामानाने कमी व्यायाम/ हालचाल यामुळे असे होते. स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड/इतर अंतस्त्रावाची कमतरता, स्थूलपणावर केलेल्या शस्त्रक्रिया (Gastric bypass Surgery) आणि कोलेस्टेरॉल/ट्रायग्लीसराइड चे रक्तातील प्रमाण वाढणे या मुळे यकृतातील चरबीचे प्रमाण वाढते.

यकृतातील चरबी या रोगाचा धोका कोणाला आहे?
खालील व्याधी असलेल्या व्यक्तींना यकृतातील चरबी होण्याची जास्त शक्यता असते.

• मधुमेह
• लठ्ठपणा
• मध्यमवयीन किंवा वयस्कर
• रक्तातील चरबीची उच्च पातळी, जसे की कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स
• उच्च रक्तदाब
• कॉर्टिकोस्टिरॉईड्स आणि काही कर्करोगाची औषधे
• मेटाबोलिक सिंड्रोमसह व चयापचय विकार
• जलद वजन कमी होणे
• हिपॅटायटीस सी सारखे आजार

काही वर्षांपूर्वीपर्यन्त आयुष्यात निवांतपणा होता. जो आताच्या धकाधकीत कुठे दिसेनासा झाला आहे आणि ह्या जीवनशैलीतील बदलाचे परिणाम यकृतातील चरबीच्या रूपात आपल्याला दिसत आहेत. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा रोग जगातील सुमारे २५% लोकांमध्ये आढळतो. अमेरिकेत लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह आणि उच्च कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत आहेत, त्याचप्रमाणे NAFLD च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात देखील हे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग फक्त जास्त मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये होतो, विशेषत: जे दीर्घ कालावधीपासून मद्यपान करतात. जास्त मद्यपान करणाऱ्या स्त्रिया, लठ्ठपणा किंवा काही अनुवांशिक उत्परिवर्तन असलेल्या महिलांना धोका जास्त असतो.

यकृतातील चरबी या रोगाची लक्षणे काय आहेत?
यकृतातील चरबी चे प्रमाण चार ग्रेड मध्ये केले जाते. ग्रेड १ म्हणजे मामुली किंवा अगदी कमी प्रमाणात असते. तर ग्रेड 4 म्हणजे जास्त प्रमाणात असणे. बहुतांशी व्यक्तीमध्ये ग्रेड 1 चरबीचे प्रमाण असू शकते. सुरुवातीच्या आजारात (ग्रेड १) – याचा काहीच त्रास होत नाही. यकृतातील चरबी या मध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे नसतात. परंतु काही व्यक्तींना थकल्यासारखे वाटू शकते किंवा त्यांच्या पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला सौम्य दाह होऊ शकतो. परंतु जर हा आजार तीव्र स्वरूपाचा असेल तर यकृत मोठे होऊ शकते, यकृताला सूज येते आणि कावीळ होऊ शकते
काही चाचण्या देखील तुम्हाला फॅटी लिव्हरचे निदान करण्यात मदत करतात . यामध्ये रक्त आणि सोनोग्राफी, इलास्टोग्राफी आणि कधीकधी बायोप्सी यांचा समावेश होतो. वाढलेल्या चरबीचे निदान हे सोनोग्राफी, सिटी स्कॅन किंवा एम आर आय अश्या तपासण्या मध्ये होते. रक्ताच्या तपासात कावीळ असू शकते. रक्तातल्या तपासण्यात ALT, AST , GGT या एन्झाईमचे प्रमाण तपासावे. यकृतातील चरबीमुळे रक्तातील enzymes वाढल्या असतील तरच काळजी करावी. सूज जास्त काळ राहिली तर बायोप्सी (यकृताचा तुकडा काढून तपासणे) करावी. यकृतातील चरबी मुळे जर यकृताच्या पेशींचा नाश होत असेल तर रक्तातील काही एन्झयम्स (GGT ) ह्या वाढतात . यकृतातील पेशींचा नाश झाल्याने, ती जागा भरून काढताना यकृत घट्ट होऊ शकते. यकृताच्या घट्ट्पणाचा अर्थ फायब्रोसिस असू शकतो. पुढे त्याचे रूपांतर सिर्र्होसीस मध्ये होते.

यकृतातील चरबी या रोगासाठी कोणते उपचार आहेत?
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरसाठी वजन कमी करण्याची शिफारस केली जाते. वजन कमी केल्याने यकृतातील चरबी, सूज आणि फायब्रोसिस कमी होऊ शकते. काही औषधे यकृतातील चरबीचे कारण असू शकतात, मग ती डॉक्टरांच्या सल्ल्याने थांबवली जाऊ शकतात. काही मधुमेही औषधे आणि व्हिटॅमिन ई फॅटी यकृतावर उपचार करण्यास मदत करू शकतात.
अल्कोहोल-संबंधित यकृतातील चरबी रोगाचा उपचार करण्याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे दारू पिणे थांबवणे.
अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग किंवा नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग (नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस) या दोन्हीमध्ये सिरोसिस होऊ शकतो. सिरोसिसमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांवर औषधे, ऑपरेशन्स आणि इतर वैद्यकीय प्रक्रियांद्वारे उपचार करता येतात. जर सिरोसिसमुळे यकृत निकामी झाले तर तुम्हाला यकृत प्रत्यारोपणाची गरज भासू शकते.
यकृतातील चरबी रोखण्यासाठी आवश्यक असे जीवनशैलीतील बदल
• समतोल आहार घ्या, मीठ आणि साखर मर्यादित करा, तसेच भरपूर फळे, भाज्या खा.
• हिपॅटायटीस A आणि B, फ्लू आणि न्यूमोकोकल रोगासाठी लसीकरण करा. जर तुम्हाला फॅटी लिव्हरसोबत हिपॅटायटीस ए किंवा बी झाला तर यकृत निकामी होण्याची शक्यता जास्त असते.
• नियमित व्यायाम करा, ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल आणि यकृतातील चरबी कमी होईल
• जीवनसत्त्वे, किंवा कोणतीही पूरक किंवा पर्यायी औषधे किंवा विशिष्ट आहार घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी बोला.

Story img Loader