लाओसमध्ये दूषित मद्यामुळे झालेल्या मृत्यूंमुळे जागतिक चिंता वाढली आहे आणि मद्ययुक्त पेयांमधून मिथेनॉल विषबाधेबद्दलची चिंता वाढली आहे. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, “गेल्या आठवड्यात, मिथेनॉलच्या संशयास्पद विषबाधेमुळे लाओसमध्ये सहा पर्यटकांना दुःखदपणे प्राण गमवावे लागले. या बळींमध्ये दोन ऑस्ट्रेलियन, दोन डेन्स, एक ब्रिटन व एका अमेरिकन नागरिकाचा समावेश होता. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक जण १९ ते २० या वयोगटातील तरुण होते. ही घटना दक्षिण भारतात जून मध्ये घडलेल्या अशाच एका शोकांतिकेनंतर घडली आहे; जिथे मिथेनॉलयुक्त मद्याचे सेवन केल्यामुळे किमान ५६ लोकांचा मृत्यू झाला.

मिथेनॉल उद्योगांमध्ये वापरले जाते. हे द्रव्य एक प्रकारचे मद्य म्हणून जेव्हा शरीरात प्रवेश करते तेव्हा अशी विषबाधा होते. मिथेनॉलयुक्त द्रव्य प्यायल्याने, मिथेनॉलच्या धुरात श्वास घेतल्यास, मिथेनॉलला स्पर्श केल्यास ते त्वचेद्वारे शोषून घेतले जाते तेव्हा ही विषबाधा होते. मिथेनॉलमुळे होणारी विषबाधा गंभीर आहे आणि वेळेवर उपचार न केल्यास ती जीवघेणी ठरू शकते.

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
Sanjay Raut
Ladki Bahin Yojana : “१५०० रुपयांच्या बदल्यात बहि‍णींच्या घरात दारूडे…”; लाडकी बहीण योजनेवरून राऊतांची अजित पवारांवर टीका
fish die due to polluted water in miraj
मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू
nashik Malegaon liquor marathi news
मालेगावजवळ बनावट मद्यनिर्मिती कारखान्यावर छापा, ७० लाखांचा ऐवज जप्त

मिथेनॉल स्वतःच त्याच्या मूळ स्वरूपात तुलनेने निरुपद्रवी आहे; परंतु त्याचे विषारी परिणाम शरीरात फॉर्मल्डिहाइड आणि फॉर्मिक ॲसिडसारख्या हानिकारक संयुगामध्ये चयापचय केल्यानंतर दिसून येतात. ही उप-उत्पादने मज्जासंस्था (Nervous System), ऑप्टिक नर्व्ह आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करून, ते नष्ट करू शकतात.

हेही वाचा –तुम्ही सोडायुक्त पेय पिता तेव्हा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून घ्या जाणून

मद्यामुळे मिथेनॉल विषबाधा कशी होते? (How does alcohol cause methanol poisoning?)

मिथेनॉल विषबाधा सामान्यत: बनावट किंवा बेकायदा पद्धतीने तयार केलेले मद्य सेवन केले जाते तेव्हा उद्भवते. अनेकदा मद्यामध्ये इथेनॉल( पेयांमध्ये आढळणारा मद्याचा प्रकार) ऐवजी बनावट किंवा बेकायदा पद्धतीने मिथेनॉल वापरले जाते. शरीरात, मिथेनॉलचे चयापचय यकृतातील एंझाइमद्वारे अल्कोहोल डिहायड्रोजनेजचे फॉर्मल्डिहाइडमध्ये परिवर्तित होते आणि नंतर त्याचे रूपांतर फॉर्मिक ॲसिडमध्ये होते. हे दोन्ही पदार्थ विषारी असतात, असे नोएडा यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अंतर्गत औषध विभागात वरिष्ठ सल्लागार डॉ. निशांत सिंग यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट केले.

पण, इथेनॉल त्याच एंझाइमचा सामना करते, मिथेनॉल चयापचय मंद करून तात्पुरते अॅन्टीडोट म्हणून काम करते.

मिथेनॉल विषबाधा घातक आहे का? (Is methanol poisoning fatal?)

उपचार न केल्यास मिथेनॉल विषबाधा खरोखरच प्राणघातक ठरू शकते. डॉ सिंग म्हणाले, “विषारी उपपदार्थांमुळे गुंतागुंत निर्माण होते, जसे की :

मेटाबॉलिक ॲसिडोसिस : रक्तातील पीएच पातळीमध्ये एक धोकादायक घट.
ऑप्टिक नर्व्ह डॅमेज : संभाव्यतः आंशिक किंवा पूर्ण अंधत्व.
सेंट्रल नर्व्हस सिस्टीम डिप्रेशन : गोंधळ, कोमा किंवा मृत्यू.
या प्रभावांची तीव्रता मिथेनॉलचे सेवन आणि वैद्यकीय हस्तक्षेपाच्या वेळेवर अवलंबून असते.

हेही वाचा –कार्बोनेटेड पेय सतत प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

मिथेनॉल विषबाधा कशी टाळता येते? (Preventing methanol poisoning)

मिथेनॉल विषबाधेच्या घटना कमी करण्यासाठी प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. सिंह यांनी नमूद केले. येथे काही प्रभावी उपाय आहेत :

न पिण्यायोग्य मद्य पिणे टाळा (Avoid Non-Drinkable Alcohol) : अविश्वासू स्रोतांकडून कधीही औद्योगिक मद्य किंवा मद्ययुक्त पेये घेऊ नका, कारण- त्यात मिथेनॉल असू शकते.
नियमन केलेले मद्य विक्री (Regulated Alcohol Sales): मिथेनॉलची हानिकारक पातळी काढून टाकण्यासाठी सरकारने मद्याचे उत्पादन आणि विक्री सुरक्षा मानकांचे पालन केले जाणे सुनिश्चित केले पाहिजे.

सार्वजनिक जागरूकता : बेकायदा किंवा बनावट दारू पिण्याच्या धोक्यांबद्दल समुदायांना शिक्षित करा.
मिथेनॉल स्क्रीनिंग (Methanol Screening) : अनियंत्रित बाजारपेठांमध्ये मद्ययुक्त उत्पादनांची नियमित चाचणी दूषित पेये ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापासून ओळखण्यात आणि प्रतिबंधित करण्यात मदत करू शकतात.

त्वरित वैद्यकीय मदत घ्या (Seek Prompt Medical Care) : मिथेनॉल विषबाधा झाल्याचा संशय असल्यास त्वरित वैद्यकीय मदत मिळवा.

मिथेनॉल विषबाधा ही एक टाळता येण्याजोगी; परंतु धोकादायक स्थिती आहे. त्याच्या जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक जागरूकता, कडक नियम आणि वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप केला जाणे महत्त्वाचे आहे.

Story img Loader