मागच्या लेखात आपण ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये गुडघ्यात नेमके कसे आणि कोणते बदल होतात ते पहिलं या लेखात आपण ऑस्टिओआर्थरायटिस बद्दल अधिक जाणून घेऊया.
कारटीलेज हळूहळू विरून जायला सुरुवात झाल्याने दोन हाडांमधली जागा (जॉइंट स्पेस) कमी होऊ लागते, परिणामी वेगवेगळ्या हालचाली दरम्यान मांडीचं हाड आणि पोटरीचं हाड एकमेकांवर घासले जातात.
हेही वाचा… Health Special: ऋतूसंधीकाळात तब्येत नीट ठेवणं का महत्त्वाचं?
असं सतत होऊ लागलं की हाडाच्या घासल्या जाणार्या पृष्ठभागावर छोटे उंचवटे तयार होतात याला ऑस्टियोफाइट्स किंवा बोन स्पर असं म्हणतात. मोडेरट टु सिवीअर ऑस्टिओआर्थरायटिसमधे हे उंचवटे बर्याच वेळा एक्स रे वरही दिसतात.
सौम्य ऑस्टिओआर्थरायटिस
- गुडघ्यात अधून मधून जाणवणारी पुसटशी वेदना किंवा फक्त एका विशिष्ट हालचालीपूर्ती मर्यादित असणारी वेदना
- कारटीलेजमध्ये होणारे बदल नुकतेच सुरू झालेले असतात, बोन स्पर्स या टप्प्यात तयार झालेल्या नसतात
- हा टप्पा अतिशय महत्वाचा ठरतो कारण या टप्प्यात योग्य व्यायाम सुरू केले आणि व्यक्तिनुरूप जीवनशैलीतील बदल केले तर वर सांगितलेल्या प्रक्रियांना अटकाव घालता येतो.
- मात्र जर या टप्प्यात असलेल्या रूग्णाला सरसकट चालणं, खाली बसणं, अशा हालचाली पूर्णपणे बंद करण्यास सांगितल्या तर यामुळे रुग्णाचा दीर्घकालीन त्रास वाढण्याची शक्यता असते. या टप्प्यात अनेकांना योग्य ती माहिती न मिळाल्यामुळे (किंवा चुकीची माहिती मिळाल्यामुळे) काही शारीरिक हालचाली या मोडीफाय न होता पूर्णच बंद होऊन जातात. या टप्प्यात रुग्णाच्या मनात हालचालींविषयी सगळ्यात जास्त भीती (कायने सिओफोबिया) आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात शिवाय वेदनेची भीतीसुद्धा मनात घर करू शकते.
मध्यम ऑस्टिओआर्थरायटिस
- गुडघ्यात विशिष्ट हालचालींना जाणवणारी पुसटशी वेदना आता वारंवार आणि तीव्रपणे जाणवू लागते.
- उठबस करताना वेदना अधिक तीव्र होते.
- कारटीलेजमध्ये होणारे बदल जास्त प्रमाणात आणि वेगाने होतात, कारटीलेज खाली असणारा हाडाचा पृष्ठभाग काही ठिकाणी उघडा पडतो.
- हाडावर उंचवटे (बोन स्पर्स) तयार होऊ लागतात, काही विशिष्ट भागात त्यांची संख्या वाढते.
- याच टप्प्यात सांध्यामधील वंगण देखील कमी होऊ लागतं.
- या टप्प्यात व्यायाम, जीवनशैलीतील बदल, ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून दिले जाणारे वेदांनाशामक औषधी याचा उपयोग होतो.
तीव्र ऑस्टिओआर्थरायटिस
- कारटीलेजचा ऱ्हास झाल्यामुळे सांध्याची हालचाल ही कारटीलेज टु कारटीलेज न होता बोन टू बोन होते.
- दोन हाड एकमेकांवर घासली जातात.
- बोन स्पर्स मोठ्या होतात आणि जास्त प्रमाणात दिसू लागतात.
- वेदनांची तीव्रता वाढते, रुग्णाच्या चालण्याची पद्धत बदलते, काही रुग्णांमध्ये गुडघ्याला आतल्या बाजूने बाक येतो.
- रुग्णाच्या दैनंदिन आयुष्यातील हालचाली आणि क्रिया मर्यादित होतात.
- रात्री झोपताना वेदना अधिक तीव्रतेने जाणवतात.
- या टप्प्यात टोटल नी रेप्लेसीमेंट म्हणजेच गुडघ्याचा सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया करावी लागते अर्थातच शस्त्रक्रियेचा निर्णय हा रुग्णाचा वय, इतर आजार आणि इतर महत्वाचे घटक बघून ऑर्थोपेडिक डॉक्टरद्वारे घेतला जातो.
- या टप्प्यात शस्त्रिक्रियेआधीचे ज्याला प्रीहबिलिटेशन आणि नंतरचे व्यायाम ज्याला रीहॅबिलिटेशन असं म्हणतात. या दोन्ही गोष्टींना यात अनन्यसाधारण महत्व असतं.
ऑस्टिओआर्थरायटिसचे फिजिओथेरपी उपचार पुढच्या भागात!