वय वर्ष १६ असणारी मायरा मला म्हणाली की ती ओवो व्हेजिटेरिअन आहे आणि तिला त्या प्रकारचंच डाएट हवंय. कारण त्या डाएटमध्ये प्रोटिन्स आणि न्यूट्रिशन बॅलन्स आहे असं तिला वाटतंय. यावर तिच्या आईने – मिताने मला डोळ्यांनीच “असे नखरे आहेत मॅडमचे “ असं खुणावलं आणि मला मायराच्या या माहितीबद्दल कमाल वाटली. वय वर्ष सोळा असताना आहाराबाबत ही माहिती असणं मला चांगलं लक्षण वाटलं.

अलीकडे शाकाहार आणि त्याचे विविध प्रकार जगभरात प्रसिद्ध आहेत.
१. लॅक्टो ओवो व्हेजिटेरिअन – वनस्पतीजन्य आहार तसेच , दूध आणि दुग्धजन्य पदार्थ , मध,अंडी यांचा आहारात समावेश करणारे

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
nashik land purchase fraud
नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
Vegetarian diet for dogs
आता तुमचे पाळीव प्राणीही घेऊ शकतात शाकाहारी आणि वीगन आहार? तज्ज्ञ काय सांगतात…

२. लॅक्टो व्हेजिटेरिअन – वनस्पतीजन्य आहार, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ , मध यांचा आहारात समावेश. मात्र अंडं वर्ज्य करणारे

३. ओवो व्हेजिटेरिअन -वनस्पतीजन्य आहार, मध ,अंड खाणारे मात्र दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करणारे

४. विगन – केवळ वनस्पतीजन्य आहार करणारे

आणखी वाचा: Health Special: ‘हा’ आहे हॅपी डाएटिंगचा फंडा

अलीकडे सोयीस्कर पद्धतीने शाकाहार बाळगणारे अनेकजण आपण आजूबाजूला पाहतो. “पण आय एम व्हेजिटेरियन आणि मला माझ्या डायटमध्ये व्हेजिटेबल्सच हवेत असं म्हटल्यानंतर शाकाहार आणि त्यानुसार तयार केले जाणारे पदार्थ किंवा त्यानुसार खाल्ले जाणारे पदार्थ हे डायटेशनसाठी किंवा आहार तज्ज्ञांसाठी नवीन गोष्ट नाही “ एक ऑक्टोबर हा जागतिक शाकाहारी दिन असा साजरा केला जातो त्यानिमित्ताने प्राधान्याने अधोरेखित करावसं वाटलं म्हणून हा लेख!

शाकाहार म्हटलं की अनेकदा वनस्पतीजन्य पदार्थ आणि प्राणीजन्य उत्पादन यांचा आहारात समावेश केला जातो शाकाहारामध्ये अनेक भाज्या, फळ ,धान्य, कडधान्य, तृणधान्य वेगवेगळ्या प्रकारचे मसाले यांचा देखील वापर केला जातो. मानवी आरोग्यासाठी सहज पचणारा, आरोग्य वाढविणारा आणि शरीराला तंदुरुस्त ठेवणारा आहार म्हणून आयुर्वेदात देखील शाकाहाराकडे पाहिले जाते. मूळ म्हणजेच तुमच्या मानसिकतेचा जवळचा संबंध आहे. शाकाहारी माणसाच्या आहाराचा विचार करताना आपण कोणत्याही प्रकारच्या पोषण तत्त्वांचा विचार करतो त्याला कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ यांचा उत्तम मेळ साधला जातो. मात्र विचार करून योग्य प्रमाणात योग्य प्रकारे पदार्थ आपल्या आरोग्य आपल्या आहारात समाविष्ट करावे लागतात.

शाकाहारी आहारामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देखील समाविष्ट होतात ज्यावेळेस दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आपण विचार करतो त्यावेळी त्यामध्ये दूध ताक पनीर दही, लस्सी यांसारखे अनेक पदार्थ समाविष्ट असतात मात्र अनेक शाकाहारी माणसांमध्ये जीवनसत्व ‘ब’ ची कमतरता आढळते कारण ब जीवनसत्वाचे प्रमाण अनेक भाज्यांमध्ये अल्पशा प्रमाणात असते आणि भाजी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये या जीवनसत्व ब चा ऱ्हास होऊ शकतो त्यामुळे प्राणीजन्य पदार्थांपासून मिळणारे जीवनसत्व ब आहारात देखील असावे यासाठी सजगतेने आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. वेळ पडल्यास जीवन सत्त्व ब साठी गोळ्यावर अवलंबून राहायला हरकत नाही.

आणखी वाचा: मशरुम किती पौष्टिक असतात? ते खाणे किती फायदेशीर?

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शाकाहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण हा प्रश्न हमखास विचारला जातो की जर मी शाकाहारी असेल तर माझ्या शरीरासाठी पूरक प्रथिने मिळतील का किंवा प्रथिनांची कमतरता भरून निघेल की नाही? शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची कमतरता भासणार नाही जर तुम्ही नियमित कडधान्य उसळी दूध आणि दुधाचे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट केले तर!

त्याच प्रमाणामध्ये शाकाहारी पदार्थ कशाप्रकारे खावेत याचा देखील विचार होणे आवश्यक आहे अनेकदा शाकाहारी पदार्थ कच्चा स्वरूपात आहारात समाविष्ट केले जातात वारंवार अतिशय अतिरेकी प्रमाणात कच्चे पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास आपल्याला त्याचे फायदे मिळत नाहीत अनेक शाकाहारी पदार्थांमध्ये फायटेट्स नावाचा एक पदार्थ असतात जे ते पदार्थ पचण्यासाठी अडथळा निर्माण करू शकतो त्यामुळे शाकाहार करताना पदार्थ योग्य प्रकारे शिजवून , भिजवून किंवा योग्य प्रकारे त्यावर प्रक्रिया करून खाणे अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितके अन्न घटकांचे प्रकार आहेत त्याप्रमाणे ते तितक्या प्रमाणात नियमितपणे आहारात समाविष्ट करणे तितकेच आवश्यक आहे.

बाजारात शाकाहारी तयार पदार्थांमध्ये असणारे जास्तीचे मीठ आणि साखर त्यातील पोषक घटकांचा ऱ्हास करते. असे पदार्थ खरेदी करताना त्यातील ऍन घटक आणि पोषण मूल्यांचे सजग भान राखणे आवश्यक आहे. विगन म्हणून चॉकोलेट आणि केक खाताना त्यात यीस्टचे प्रमाण आणि अतिरिक्त स्निग्धांशाचे प्रमाण आपले नुकसान करतेय याचे भान असणे आवश्यक आहे.

विशेषतः विगन अंडं विकत घेताना शाकाहार करताना मानाने देखील शाकाहारी असणे आरोग्यासाठी पूरक आहे हा साधा सोपा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे शाकाहार निवडताना तो कशासाठी निवडला जातोय, त्याचं तो किती कालावधीसाठी फॉलो करायला लागणार आहे आणि त्याचं मुख्य म्हणजे तुमच्या शरीराला काय फायदे होणार आहेत याचा विचार करून शाकाहाराकडे वळायला हरकत नाही.

Story img Loader