आजच्या लेखात आपण पुन्हा एकदा वेदनेकडे वळलो आहोत, गेली पाच वर्ष अनेक स्नायू आणि हाडांच्या वेदनांच्या रुग्णांशी संवाद साधताना आणि उपचार करताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली की रुग्ण त्यांच्या वेदना व्यक्त करताना एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात ती म्हणजे त्या वेदनेची तीव्रता! साहजिकच त्यांच्यासाठी वेदनेची तीव्रता हा सगळ्यात त्रास देणारा भाग असतो. पण या वेदनेला इतर अनेक कंगोरे असतात ज्याबद्दल असायला हवी तितकी जागरूकता रुग्णांमध्ये आजही नाही. बहुतेकवेळा औषध घेऊन वेदना तात्पुरती बंद करणे या संकल्पनेभोवती फिरणार्या बायोमेडिकल मॉडेलचा हा परिणाम असावा. आपल्या शरीरात असणारी वेदना सजगपणे अनुभवणे, आणि वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि दैनंदिन घटकांमुळे ती कशी प्रभावित होते ही प्रक्रिया समजून घेणं हे रूग्णांच्या दृष्टीने अतिशय फायद्याचं ठरू शकतं. हे घटक आपल्या वेदनेला प्रभावित करू शकतात हे रुग्णांना कळलं की ते वेदनेकडे अधिक सजग रीतीने बघू शकतात, आपल्या वेदनेची तीव्रता कमी करण्याचा सर्वोत्तम उपाय आपल्यालाच माहिती आहे ही भावना त्यांना सशक्त करते आणि त्यांचं परावलंबित्व कमी करते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा