सुमारे 12-13 वर्षांपूर्वीची गोष्ट. दरवाजा उघडून ती आत आली. संपूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेला. तेव्हा चेहरा झाकण्याचे आत्ता एवढे सर्वसाधारण झाले नव्हते. नाव गाव विचारल्यावर मी तिला चेहऱ्यावरचा स्कार्फ काढायला सुचवले. तिने माझ्या सहकारी डॉक्टरांकडे दृष्टिक्षेप टाकला. अप्रत्यक्षरीत्या त्यांना बाहेर जाण्याची ती सूचना होती.. मी थोडी अचंबित झाले. डॉक्टर बाहेर गेले आणि – तिने चेहऱ्याचा  स्कार्फ काढला. क्षणभर मी सुद्धा हादरले. कारण तिचे हात तिचे गोरेपण स्पष्ट करीत होते. पण चेहरा! तो तर काळा ठिक्कर!! स्वतःला सावरीत मी तिला पुढील प्रश्न विचारून तपासू लागले. आणि तिने रडायला सुरुवात केली. साहजिकच होते.

तर हे होते पिगमेंटेशन. तिथून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. हो, प्रवासच. कारण पिगमेंटेशन म्हणजे रुग्ण आणि डॉक्टरांच्या संयमाचा कस पाहणारा प्रश्न. परंतु  रीटाने  नेटाने  उपचार घेतले आणि तिचा मूळ रंग परत आला.

avadhoot gupte marathi singer buy new apartment in khar mumbai area
अवधूत गुप्तेने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत तब्बल ‘इतके’ कोटी, १६ व्या मजल्यावर आहे फ्लॅट
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Passengers inside metro over seat issues shocking video goes viral on social media
हद्दच झाली! मेट्रोमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Bigg Boss 18 Chahat Pandey, Sarah Khan, Arfeen Khan, Tanjindar bagga nominated
Bigg Boss 18: विवियन डिसेनामुळे ‘या’ चार सदस्यांवर घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलवार, नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये नेमकं काय झालं? वाचा…
My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी
सौंदर्यभान : केमिकल पीलिंग

आणखी वाचा: Health Special: मुरुमांवरील उपचार

आज हा पिगमेंटेशनचा प्रश्न मोठाच गहन होऊन बसला आहे. आहे तरी काय हे पिगमेंटेशन? सोप्या शब्दात सांगायचे तर त्वचेचा रंग अधिक काळा पडणे म्हणजेच पिगमेंटेशन. तर वाचक हो, पिगमेंटेशन हा रोग नव्हे, तर अनेक रोगांचा किंवा  कारणांचा  अंतिम परिणाम आहे. आता आपण पिगमेंटेशनची कारणे आणि त्यावरील उपचार यांची माहिती घेऊ या.

सुरुवातीला आपण चेहऱ्यावरच लक्ष केंद्रित करू या. चेहऱ्यावरील काळ्या डागांची प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत.
मुरुमे किंवा पिंपल्सचे डाग :  मोठमोठी मुरुमे , किंवा खोल आणि कोचलेली मुरुमे यांचे डाग पडतात. 
मेलॅज्मा : गरोदरपणात वाढलेल्या संप्रेरकांच्या परिणामाने स्त्रियांना गाल, कपाळ, नाक व ओठाच्यावर तपकिरी काळसर डाग पडतात. हे डाग नऊ महिन्यांपर्यंत वाढत जातात. परंतु डिलिव्हरी नंतर ते हळूहळू कमी होऊ लागतात. असे डाग  मेनापॉजच्या वेळेला देखील दिसू लागतात. कधी कधी पुरुषांमध्ये देखील असे डाग येतात. या डागांना खाज किंवा जळजळ होत नसते.
सूर्याच्या अतिनील किरणांमुळे  येणारी ॲलर्जी : ही त्वचेच्या उघड्या भागावर म्हणजे गाल, कपाळ, नाक व कान तसेच मान व गळ्याचा उघडा भाग आणि हात यावर दिसते. सुरुवातीला खाज येऊन लाल चट्टे पडतात. उन्हात गेल्यावर जळजळ होते. क्वचित पाणी येते. कालांतराने हे डाग सुकून काळे पडतात.
कॉन्टॅक्ट ॲलर्जीक डरमॅटायटीस : केमिकल्सच्या वापराने होणारी ॲलर्जी. प्रामुख्याने  हेअर डाय, सौंदर्यप्रसाधने, औषधी तेले आणि परफ्युम्स ही मुख्य कारणे असतात. चेहरा हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे ती नवनव्या गोष्टींची प्रयोगशाळा सुद्धा आहे.  त्यामुळे विविध सौंदर्यप्रसाधने, कोलगेट पेस्ट, लसूण इत्यादी घरगुती गोष्टी सहज वापरल्या जातात आणि त्याची ॲलर्जी होऊ शकते.

आणखी वाचा: Health Special: मुरुमांचे डाग आणि व्रण पूर्णपणे जातात का?


काही औषधे : पोटात घेतल्यावर ॲलर्जी किंवा पिगमेंटेशन होऊ शकते. मलेरियासाठी वापरले जाणारे क्लोरोक्वीन हे औषध त्यापैकीच. म्हणून उपचार करताना तुमच्या डॉक्टरांना सर्व गोष्टींची नीट माहिती द्या.
काही त्वचारोग : लायकेन प्लेनस आणि लायकेन प्लेनस पिगमेंटोजस या रोगांमध्ये सुरुवातीला लालसर खाजणारे चट्टे येऊन ते हळूहळू काळे पडू लागतात. केसांचे कलप किंवा हेअर डाय, व काही औषधी तेले यामुळे लायकेन प्लेनस पिगमेंटोजस हा रोग होऊ शकतो. यामध्ये चेहरा हळूहळू काळवंडत जातो.

पुढील लेखात पाहूया पिगमेंटेशन वरील उपचार. पिगमेंटेशन कमी करणारी असंख्य औषधे व सौंदर्यप्रसाधने बाजारात दररोज येत असतात व त्यावर उपचार करणारी सेंटर्स देखील. जोपर्यंत आपण पिगमेंटेशनचे मूळचे कारण शोधून काढत नाही आणि त्यावर उपचार करत नाही, तोपर्यंत ही औषधे किंवा उपचार हे वरवरचे ठरतात.