आपण सगळ्यांनी रीहॅबिलिटेशन हा शब्द नेहमीच ऐकला आहे. रीहॅबिलिटेशन म्हणजे एखाद्या आजारानंतर, इजेनंतर किंवा आजार पणा नंतर रुग्णाचं आयुष्य पूर्ववत करण्यासाठी केले जाणारे उपचार. या शब्दाचा विरुद्धार्थी आणि सध्या विशेष महत्व प्राप्त झालेला शब्द म्हणजे प्री-हॅबिलिटेशन. अतिशय सोप्या भाषेत सांगायचं तर प्री-हॅबिलिटेशन म्हणजे शस्त्रक्रियेला सामोरं जाण्यासाठी केली जाणारी शारीरिक आणि मानसिक तयारी.

आपली आरोग्य व्यवस्था जास्तीत जास्त रुग्ण-केंद्रित होतेय आणि प्री-हॅबिलिटेशन ही शस्त्रक्रियेला सामोरं जाणार्‍या रुग्णांसाठी असलेली एक अतिशय उपयुक्त संकल्पना आहे. प्री-हॅबिलिटेशन म्हणजे एखाद्या शस्त्रक्रियेपूर्वी दिली जाणारी उपचारपद्धती. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया जसं की हृदय, यकृत, मेंदूच्या शस्त्रक्रिया आणि सगळ्यात महत्वाचं हाडांवर केल्या जाणार्‍या शस्त्रक्रिया यामध्ये उत्तम प्री-हॅबिलिटेशनची गरज असते. आजच्या लेखात आपण हाडांच्या शस्त्रक्रियेआधी दिल्या जाणार्‍या उपचारांबद्दल समजून घेऊया.

Priyanka Chopra immunity boosting drink jugaad
Immunity boosting drink : गरम पाण्यात फक्त ‘या’ तीन गोष्टी करा मिक्स; रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रियांका चोप्राचा जुगाड; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
Healthy Foods for Your Liver
लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ आठ पदार्थ? सेवनाची पद्धत घ्या समजून…
Bollywood actress Kriti Sanon like do you also feel not wanting people around if your mood is off
क्रिती सेनॉनप्रमाणे तुम्हालाही मूड ऑफ असेल तेव्हा लोक जवळ नको असतात? जाणून घ्या, भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी कशी घ्यावी?
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
What happens to the body when you take protein supplements every day?
Proteins supplements: तुम्हीही दररोज प्रोटीन सप्लिमेंट्स घेता का? जाणून घ्या आरोग्यासाठी किती चांगलं, किती वाईट?
Skin Care Tips Urad Dal For Skin:
Skin Care: चेहरा चमकवण्यासाठी घरच्या घरी तयार करा उडदाच्या डाळीचा फेसपॅक; प्रत्येक समस्येपासून मिळेल आराम

हेही वाचा : प्रेमसंबंधाचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

प्री-हॅबिलिटेशनची उद्दिष्टे

रुग्णाच्या मनातील शस्त्रक्रियेची भीती कमी करणे.
ज्या सांध्याची शस्त्रक्रिया करायची आहे तिथल्या आजूबाजूच्या संबंधित स्नायूंची ताकद राखून ठेवणं.
रुग्णाच्या इतर निरोगी सांधे आणि स्नायूंचे ताकद राखून ठेवणं आणि योग्य प्रमाणात हालचाल सुरू ठेवणं.
रुग्णाच्या फुप्फुसांची क्षमता राखून ठेवणं.
शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत आटोक्यात ठेवणं.
रूग्णाला शस्त्रक्रियेचा जास्तीत जास्त लाभ होईल यासाठी उपाययोजना करणे.
शस्त्रक्रियेनंतर घ्यायची काळजी, पाळावी लागणारी पथ्यं याबद्दल माहिती देणं.

रुग्णाच्या मनातील शस्त्रक्रियेची भीती कमी करणं

प्रत्येक रुग्णाच्या मनात शस्त्रक्रिया, भूल याबद्दलची भीती कमी अधिक प्रमाणात असते. शिवाय शस्त्रक्रियेदरम्यान होणार्‍या आणि त्यानंतर होणार्‍या वेदनांची भीती देखील असते. रुग्णांशी त्यांना समजेल अशा भाषेतून संवाद साधून त्यांना शस्त्रक्रिया नेमकी कशी होणार आहे हे समजावून सांगितलं जातं. शस्त्रक्रिये नंतर किती तीव्रतेची वेदना होऊ शकते, का होऊ शकते आणि किती दिवस राहू शकते याची कल्पना दिली जाते. शिवाय वेदना अधिक तीव्रतेने जाणवली तर कुठल्या प्रकारची औषधं देण्यात येऊ शकतात याची ही सविस्तर माहिती दिली जाते.

हेही वाचा : आठवड्याला ७० तास काम का करू नये? मन व शरीराची काळजी घेण्यासाठी काय करावं, तज्ज्ञ सांगतात..

ज्या सांध्याची शस्त्रक्रिया करायची आहे तिथल्या आजूबाजूच्या संबंधित स्नायूंची ताकद राखून ठेवणं. उदाहरणार्थ गुडघे बदलण्याच्या शस्त्रक्रियेयाधी मांडीच्या, खुब्याच्या स्नायूंची शक्ती वाढवणारे व्यायाम करवून घेतले जातात ज्यामुळे स्नायूंची आहे ती शक्ती टिकून राहते शिवाय शस्त्रक्रियेनंतर व्यायाम पटकन आणि वेदना रहित होतात. रुग्ण लवकरात लवकर पायावर वजन घेऊ शकतो आणि चालू शकतो.

रुग्णाच्या इतर निरोगी सांधे आणि स्नायूंचे ताकद राखून ठेवणं आणि योग्य प्रमाणात हालचाल सुरू ठेवणं. निरोगी बाजूचे सांधे आणि स्नायू यांची हालचाल सहेतुक वाढवली जाते, उदाहरणार्था उजव्या कोपराच्या शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला काही दिवस तरी उजवा हात वापरता येणार नसतो मग अशावेळी डाव्या हाताची ताकद वाढवणे आवश्यक असतं कारण रुग्ण पुढचे काही दिवस डाव्या हाताने दैनंदिन आयुष्यातील काम करणार असतो. काहीवेळा शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला वॉकर किंवा क्रचेस वापरावी लागतात. त्याच्या योग्य वापर करण्यासाठी हातात शक्ती असणं आणि ते धरण्याची योग्य पद्धत माहिती असणे आवश्यक असतं. रूग्णाला याचं शिस्तशीर प्रशिक्षण दिलं जातं.

हेही वाचा : Health Special: थंड खावंसं वाटणं हे पित्तप्रकोपाचं लक्षण आहे का?

रुग्णाच्या फुप्फुसांची क्षमता राखून ठेवणं

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची शारीरिक हालचाल काही दिवसांसाठी कमी होते अशावेळी त्याच्या फुप्फुसांची क्षमता योग्य असेल तर श्वसनाचे आजार होण्याचं प्रमाण कमी होते, रूग्णाला विविध श्वासाचे व्यायाम शिकवले जातात ज्यात फुप्फुसांचं पूर्ण आकुंचन आणि प्रसरण होतं. हे व्यायाम आधी शिकवले जातात ज्यामुळे रुग्ण शस्त्रक्रियेनंतर सहज हे व्यायाम करू शकतात. त्यामुळे शारीरिक हालचाली अभावी होणार्‍या श्वसनाच्या आजारांना अटकाव होतो.

क्रमशः