डोळ्यावर वेल वाढणे यालाच वैद्यकीय परिभाषेमध्ये टेरीजियम असे म्हटले जाते यामध्ये पांढऱ्या भोपळा वरचा कमी पारदर्शक पापुद्रा हा वेगवेगळ्या कारणांमुळे काळ्या बुबूळावरच्या पारदर्शक पापुदऱ्यावर वाढू लागतो .याची प्रामुख्याने तीन कारणे आपल्यास दिसून येतात.
१. त्यामध्ये ‘वंशपरंपरागत’ हे एक सर्वात जास्त आणि महत्त्वाचे कारण आहे यामध्ये दोन्ही डोळ्यांमध्ये एकाच वेळी हा पापुद्रा काळ्या बुब्बुळावर वाढताना दिसतो.
२. यामध्ये काही कारणांमुळे काळ्या बुब्बुळावरच्या पारदर्शक पापुद्र्यावर काही धुलीकण अथवा कचरा अडकून बसलेला असेल आणि बरेच दिवस तो दुर्लक्षित जर राहिला तर त्या भोवती नैसर्गिक रित्या रक्तवाहिन्यांचे जाळे तयार होते आणि या स्वरूपाचा पापुद्रा वाढण्यास सुरुवात होते.
३. काही कारणाने डोळ्याच्या काळ्या बुब्बुळावरच्या पारदर्शक पापुद्रावर जखम झाली असेल आणि ती जखम दुर्लक्षित असेल तर त्यामध्ये उपद्रव तयार होऊन बाजूंनी रक्तवाहिन्या वाढू लागतात आणि या स्वरूपाचा पापुद्रा वाढत राहतो. हा पापुद्रा वाढल्यानंतर काही वेळेला तो काही अंतरावर स्थिर होतो.
आणखी वाचा: Health special: डोळा आळशी का होतो?
परंतु काही पेशंटमध्ये हा पापुद्रा सततच्या प्किंरवासामुळे वा सतत धुळीच्या संपर्कामध्ये राहिल्यास, उष्णतेच्या संपर्कामध्ये राहिल्यास तो वारंवार त्याला सूज येऊन ,लाली येऊन तो काळ्या बुब्बुळावर वाढण्यास मदत होते. आणि हा पापुद्रा ज्यावेळी बाहुलीच्या समोर येतो त्यावेळेला मात्र नजरेवर परिणाम झालेला दिसून येतो. या पापुद्र्याच्या वाढीमुळे पारदर्शक बुब्बुळाचा आकार सातत्याने बदलत राहतो आणि त्यामुळे चष्म्याचा नंबर देखील बदलत राहतो आणि अशा पेशंटमध्ये सिलेंड्रिकल नंबर येऊ लागतो.
आणखी वाचा: ‘Eye Flu’ची तीव्रता कशी समजून घ्यावी आणि त्यानुसार कोणते
त्यामुळे त्या पेशंटची दृष्टीही कमजोर होते आणि चष्मा लावून देखील काही दिवसांनी नीट दिसत नाही असे होते.
या पापुद्र्यावर उपचार म्हणजे नेत्र तज्ञांकडे तपासून त्याची योग्य शहानिशा करून योग्य त्या काळामध्ये त्याचे शस्त्र कर्म करून घेणे.
काही रुग्णांमध्ये शस्त्र कर्म केल्यानंतर देखील सूर्यप्रकाशाच्या अतिनील किरणांमुळे आणि पुन्हा धुळीच्या संपर्कात आल्यास हा पापुद्रा पुन्हा पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे योग्य त्या वेळी त्याचे शस्त्र कर्म करून घेणे हे अतिशय उपयुक्त होऊ शकते. नजरेवर परिणाम व्हायच्या आधीच त्याची दखल घेतल्यास नजर देखील स्वच्छ राहू शकते.