R Madhavan’s 21 Day Weight Loss Diet Plan : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या निर्माता, लेखक, दिग्दर्शक या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्याच पण त्यातील मुख्य भूमिकासुद्धा आर. माधवन यांनी केली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आर. माधवन यांनी वजन कमी केले हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. तर ‘कर्ली टेल्स’ला सांगताना अभिनेत्याने चित्रपटादरम्यान २१ दिवसांत वजन कसे कमी केले यामागील खास रहस्ये सांगितली आहेत.
‘कर्ली टेल्स’ला सांगताना अभिनेता आर. माधवन म्हणाले, “मी फक्त तेच अन्न खाल्ले, जे माझ्या शरीरासाठी चांगले होते. व्यायाम केला नाही किंवा धावलोसुद्धा नाही, शस्त्रक्रिया केली नाही किंवा कोणताही औषधोपचार घेतले नाहीत.”
नंतर त्याने एक्स (ट्विटर) @aadaavaan अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने फक्त २१ दिवसांत वजन कमी करण्यास कशी मदत झाली याबद्दल सांगितले आहे. अधूनमधून उपवास, ४५ ते ६० वेळा अन्न चावणे, शेवटचे जेवण संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी करायचे आणि फक्त शिजवलेले अन्न खायचे. दुपारी ३ नंतर काहीही कच्चे खायचे नाही. सकाळी लांब फिरायला जाणे, रात्री लवकर झोपणे, झोपण्यापूर्वी दीड तास अगोदर मोबाईल बघणे (स्क्रीन टाइम) टाळायचे, भरपूर द्रवपदार्थ, भरपूर हिरव्या भाज्या आणि तुमच्या शरीराद्वारे सहजपणे चयापचय होणारे व निरोगी अन्न खायचे आणि काहीही प्रक्रिया केलेले अन्न खायचे नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
चला तर त्यांच्या आहाराबद्दल तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून समजून घेऊ…
इंटरमिटंट फास्टिंगची माधवनना वजन कमी करण्यास कशी झाली मदत? (How Did Intermittent Fasting Help Madhavan Lose Weight)
तर याबद्दल जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरूच्या सीजी रोडवरील फोर्टिस हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ रिंकी कुमारी यांच्याशी चर्चा केली. आहारतज्ज्ञ रिंकी कुमारी म्हणाल्या की, अधूनमधून उपवास केल्याने अनेक संभाव्य आरोग्यदायी फायदे मिळतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की, यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता, वजन व्यवस्थापन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारू शकते. या प्रकारच्या खाण्याच्या पद्धतीमुळे ऑटोफॅजी (autophagy)देखील सुधारू शकते, चयापचय वाढू शकते व चरबी जाळणे वाढू शकते, ज्यामुळे एकूण कॅलरीजचे सेवन कमी होते आणि मानसिक स्पष्टता सुधारते.
वेळेचा चयापचय आणि हार्मोनल प्रतिक्रियांवर परिणाम होत असला तरी आहारतज्ज्ञ रिंकी कुमारी म्हणाल्या की, पोषक घटकांची गुणवत्ता महत्त्वाची असते. संतुलित जेवण आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व ऊर्जा प्रदान करते. संपूर्ण अन्न (whole foods), फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, लीन प्रोटीन, हेल्दी फॅट्स यांवर लक्ष केंद्रित करा, असे आहारतज्ज्ञ रिंकी कुमारी म्हणाल्या आहेत.
या प्रक्रियेत चघळणे का आवश्यक? (Why Is Chewing Essential In This Process)
पीतमपुरा येथील क्राउन हब डेंटल क्लिनिकमधील बीडीएस, एमडीएस (प्रोस्थोडोंटिस्ट) डॉक्टर नियती अरोरा यांनी स्पष्ट केले की, चघळणे ही पचनक्रियेतील पहिली पायरी आहे. जर ही पायरी तुम्ही योग्यरीत्या केली नाही, तर संपूर्ण पचनप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. अयोग्यरीत्या चघळण्यामुळे म्हणजे अन्न व्यवस्थित चावले जात नाही. जेव्हा चांगले चघळलेले अन्न पोटात पोहोचते तेव्हा पाचक रस आणि आम्लांना ते आणखी बारीक करण्यासाठी अधिक काम करावे लागते. त्यामुळे पोषक घटकांचे शोषण कमी होऊ शकते, पोटदुखी आणि पोटफुगी होऊ शकते ; असे डॉक्टर अरोरा पुढे म्हणाले.
आणि जर तुम्ही दुपारी ३ नंतर फक्त शिजवलेले अन्न खाल्ले, तर शरीराचे काय होते (What Happens To The Body If You Eat Only Cooked Food After 3 Pm)
चेन्नईतील प्रॅग्मॅटिक न्यूट्रिशन येथील मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी म्हणाल्या की, कच्चे अन्न आहारातून पूर्णपणे वगळल्याने पौष्टिकतेची कमतरता निर्माण होऊ शकते. फळे सामान्यतः कच्ची खाल्ली जातात आणि त्यात फायबर व इतर फायटोन्यूट्रिएंट्स असतात, ज्यामुळे आपले रोगांपासूनही संरक्षण होते. सॅलडच्या स्वरूपात काही कच्चे अन्न खाल्ल्याने फायबरचे सेवनदेखील वाढते, जे आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.