Making Paneer: आपल्याकडे विविध कार्यक्रमांमध्ये शाकाहारी व्यक्तींसाठी पर्याय म्हणून नेहमीच पनीरपासून बनवलेले पदार्थ तयार केले जातात. अशावेळी अनेकदा काही जण घरीच पनीर बनवण्याचा प्रयत्न करतात. घरच्या घरी पनीर बनवणे खूप सोप्पे आहे, परंतु विविध पर्यायांमुळे तुम्ही गोंधळून जाऊ शकता. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने पनीर बनवण्यासाठी दही, लिंबू आणि व्हिनेगर वापरण्याचे फायदे आणि तोटे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे.
ॲस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटल, बंगळुरू येथील आहारतज्ज्ञ वीणा व्ही यांनी सांगितले की, “पनीर बनवण्यासाठी दही, लिंबू किंवा व्हिनेगर वापरण्याचे अनेक फायदे आणि तोटे आहेत. दही सौम्य चव आणि मऊ पोत देते, परंतु दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी असलेल्या लोकांसाठी ते योग्य मानले जात नाही.”
स्पर्श हॉस्पिटल, बंगळुरू येथील सल्लागार पोषणतज्ज्ञ रेश्मा एएम यांनी सांगितले की, “लिंबू किंवा व्हिनेगरच्या मदतीने पनीर बनवायचे असल्यास त्यात दह्याचे प्रमाण अधिक लागते.
“पनीर बनवण्यासाठी लिंबू खूप प्रभावी आहे. हा काही क्षणात काम करतो, शिवाय यामध्ये थोडी तिखट चवही असते, ज्यामुळे पनीरची चव वाढते. पण, जर नीट धुवून न घेतल्यास पनीरची चव जास्त तिखट होऊ शकते. त्यामुळे यात लिंबू काळजीपूर्वक वापरायला हवा.”
तज्ज्ञांच्या मते, “व्हिनेगर हा देखील एक उत्तम पर्याय आहे, जो स्वतःच्या तटस्थ चवीमुळे पनीरच्या चवीवर कोणताही परिणाम करत नाही. व्हिनेगरमुळे चांगले पनीर तयार होते. परंतु, यात जास्त आंबटपणा टाळण्यासाठी अचूक माप टाकणे गरजेचे आहे.”
पनीर बनवण्यासाठी हे घटक वापरणं योग्य आहे का?
वीणा यांनी, दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी असलेल्या लोकांना पनीर बनवण्यासाठी दही न वापरण्याचा सल्ला दिला आहे, कारण यामुळे पचनास त्रास होऊ शकतो.
लिंबूमुळे ॲलर्जी, पोटात जळजळ किंवा ॲसिड रिफ्लक्स अशा समस्या उद्भवू शकतात. ज्या व्यक्तींना आंबट फळांची ॲलर्जी आहे त्यांनी काळजी घ्यायला हवी, कारण यामुळे त्यांना अधिक त्रास होऊ शकतो.
त्यांनी सांगितले आहे की, “जर व्हिनेगर व्यवस्थित धुतले गेले नाही तर छातीत जळजळ आणि पोटाची समस्या उद्भवू शकते. ॲसिटिक ॲसिडची ॲलर्जी असलेल्या लोकांनी ते टाळावे.”
हेही वाचा: डाळ शिजवण्यासाठी ‘ही’ पद्धत आहे सर्वोत्तम; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
पनीर बनवण्यासाठी उत्तम पर्याय कोणता?
वीणा यांनी सांगितले की, “आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर पनीर बनवण्यासाठी दही हा तिघांपैकी सर्वोत्तम पर्याय आहे, कारण त्यात प्रोबायोटिक्स असतात जे आरोग्यास कोणतेही गंभीर हानी पोहोचवत नाहीत.”
रेश्माने सांगितले की, “घरी पनीर बनवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दूध उकळणे आणि त्यात दही टाकणे. दूध उकळले की ते दोन्ही पदार्थांत वेगळे होते. याचे पूर्ण दही झाल्यावर ते मलमलच्या कापडाने गाळून घ्या.