गेल्या काही दशकात भारतीय व्यक्तींचे आयुष्यमान वाढले आहे व आपल्या देशातही वृद्धांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबरच सारकोपेनिया या आजाराचे प्रमाणही वाढले आहे. आज आपण सारकोपेनिया म्हणजे काय हे समजावून घेऊया.
सारकोपेनिया म्हणजे स्नायूंचे वस्तुमान, ताकद आणि कार्य हळूहळू कमी होणे. शरीरातील स्नायू (muscles) म्हणजेच मांसपेशींचा वयोपरत्वे हळू हळू क्षय होऊ लागतो याला सारकोपेर्निया म्हणतात. ही स्थिती सामान्यतः वृद्ध लोकसंख्येवर परिणाम करते आणि वृद्धत्वामुळे उद्भवते असे मानले जाते. याचा दुष्परिणाम म्हणून या वयात इतरही आजार डोके वर काढतात. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सारकोपेनिया मुळे तुमचे रोजचे व्यवहार, दैनंदिन कार्ये करण्याची तुमची क्षमता कमी होऊन तुमच्या राहणीमानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमचे एकटे फिरण्याचे स्वातंत्र्य गमावले जाऊ शकते आणि दीर्घकालीन काळजी घेण्याची गरज पडते. स्नायूंच्या कमजोरींमुळे तुम्ही पडू शकता व फ्रॅक्चर-अस्थिभंग देखील होऊ शकतो. या परिस्थितींमुळे रुग्णालयात भरती, शस्त्रक्रिया, गुंतागुंत व मृत्यूचा धोका वाढतो. सारकोपेनिया हा स्थूल व्यक्तींना देखील होऊ शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा