Silent Heart Attack : मध्यप्रदेशातील उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात पुजाऱ्याच्या १७ वर्षीय मुलाचा रविवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रंगपंचमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत तो सहभागी झाला होता. यावेळी त्याला आपला जीव गमवावा लागला. या मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तो मंदिराच्या आवारात तलवारबाजी करताना दिसतोय. मात्र तलवारबाजी करताना अचानक त्याला अस्वच्छ वाटू लागले आणि त्याची प्रकृती खालावली. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांकडून तपासणी सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. यावेळी डॉक्टरांनी सायलेंट हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली आहे. तेव्हापासून सायलेंट अटॅक आजाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे काय आहेत जाणून घेऊ….

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?

सायलेंट हार्ट अटॅक नावावरून ओळखता येतो. कोणत्याही लक्षणांशिवाय शांतपणे जेव्हा अटॅक तेव्हा त्याला सायलेंट अटॅक म्हणतात. याची लक्षणं फार किरकोळ आणि सौम्य असतात त्यामुळे कोणतीही मोठा धोका जाणवत नाही. मात्र यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. हार्वर्डच्या अहवालानुसार, “सायलेंट मायोकार्डियल इन्फेक्शन (SMI) म्हणून ओळखला जाणारा सायलेंट हार्ट अटॅक हा ४५ टक्के भाग असतो आणि स्त्रियांपेक्षा पुरुषांना याचा धोका अधिक असतो.

सायलेंट हार्ट अटॅक गंभीर का आहे?

नावाप्रमाणेच, सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे फार सौम्य असतात त्यामुळे बहुकेत रुग्ण याच्या लक्षणांकडे फारसं लक्ष देत नाही. यामुळे वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब होतो. हार्वर्डमधील संवहनी रोग प्रतिबंधक कार्यक्रमाचे संचालक डॉ. जॉर्ज प्लुत्स्की यांनी म्हटले की, या ह्रदयविकाराच्या झटक्याची लक्षणे खूप सौम्य वाटू शकतात. यामुळे केवळ काहीवेळ अस्वस्थता जाणवते. मात्र पुरुष त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.

सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे काय आणि कशी काळजी घ्याल?

छातीत जडपणा जाणवले, छातीत दुखणे, छातीत दाब येणे, हात, मान, जबडा अचानक दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही हृदयविकाराची सामान्य लक्षणे आहेत. मात्र सायलेंट हार्ट अटॅकमध्ये अशी कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. पण अशा प्रकारची कोणतीही लक्षणे दिसत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.

अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या २०१५ च्या अभ्यासात ४५ ते ८४ वयोगटातील २००० लोकांचे निरीक्षण केले गेले. ज्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कोणताही आजार नव्हता. मात्र १० वर्षांनंतर, संशोधकांना आढळले की, त्यांच्यापैकी सुमारे ८० टक्के लोकांना मायोकार्डियल इन्फेक्शन होते, जे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा पुरावा आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यापैकी ८० टक्के लोकांना त्यांच्या आरोग्य स्थितीबद्दल माहिती नव्हती. एकूणच स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मायोकार्डियल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण पाचपट जास्त होते, असेही यातून उघड झाले.

सायलेंट हार्ट अटॅकमागची कारणं काय?

धूम्रपान, जास्त वजन किंवा लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल आणि मधुमेहासारख्या लोकांना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये सहसा कोणतीही लक्षणे दिसत नसली तर त्याचा शरीरावर दीर्घकाळापर्यंत हानिकारक प्रभाव पडतो.

Story img Loader