मधुमेहाची समस्या जगभरात महामारीसारखी पसरत आहे. गेल्या काही दशकांमध्ये हा आजार झपाट्याने पसरला असून, सर्व वयोगटांतील लोक त्याला बळी पडत आहेत. मधुमेह हा एक जुनाट चयापचयासंबंधीचा आजार आहे. त्यात रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते किंवा कमी होते. त्यामुळे कालांतराने हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड व नसा यांना गंभीर नुकसान होतं. मधुमेह ही जीवनशैलीशी संबंधित समस्या आहे. त्यामुळे आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक घरात मधुमेहाचा रुग्ण आढळून येतो. मधुमेहादरम्यान खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण- थोडासा निष्काळजीपणा आपल्या रक्तातील साखर वाढवू शकते.

जर रक्तातील साखर मर्यादेपलीकडे वाढली, तर ती घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मधुमेहाच्या उपचारात औषधांइतकाच आहार महत्त्वाचा आहे. आपण जे काही खातो-पितो, त्याचा मधुमेहावर खूप परिणाम होतो. प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, चरबी, खनिजे व जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर मधुमेही रुग्णांना देतात. मॅक्स हेल्थकेअरचे प्रमुख, एंडोक्रायनोलॉजी डॉ. अंबरीश मिथल यांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आपण आहारात कोणते ब्रेड खावे? याविषयी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
pizza advertisment banned
पिझ्झा, केक आणि शीतपेयाच्या जाहिरातींवर बंदी; ‘या’ देशाने केली कारवाई, कारण काय?

पांढरा ब्रेड

पांढरा ब्रेड मैद्यापासून बनविला जातो, जो परिष्कृत स्टार्चने भरलेला असतो. या गोष्टी साखरेप्रमाणे काम करतात आणि लवकर पचतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. पांढऱ्या ब्रेडमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यात फायबरचीही कमतरता असते.

(हे ही वाचा:केसांच्या वाढीसाठी आल्याचा चहा खरंच फायदेशीर? उपाय करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञाचा सल्ला)

ब्राऊन ब्रेड

बऱ्याचदा बार्ली माल्ट किंवा मोलॅसिसचा वापर केला जातो. हे घटक गोड आहेत आणि मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे योग्य नाहीत. भारतात उपलब्ध बहुतेक तपकिरी ब्रेड पांढऱ्या ब्रेडसारखेच असतात.

संपूर्ण गहू / आटा ब्रेड

हे संपूर्ण गव्हाच्या धान्यापासून अंशतः किंवा पूर्णतः दळलेले पीठ वापरून बनविले जातात. त्यामुळे पांढऱ्या ब्रेडपेक्षा त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते नियंत्रित प्रमाणात खाऊ शकतात. हे रिफाइंड पिठाच्या ब्रेडपेक्षा खूप जास्त प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबर प्रदान करते. जरी बहुतेक संपूर्ण धान्य ब्रेड तपकिरी असतात; परंतु सर्व तपकिरी ब्रेड संपूर्ण धान्याने बनवले जात नाहीत. संपूर्ण गव्हापासून बनवलेले किंवा मल्टीग्रेन, असा दावा करणाऱ्या लेबलांमध्ये १०० टक्के संपूर्ण धान्य वापरून बनवलेले ब्रेड असणे आवश्यक नाही. त्यामध्ये काही संपूर्ण गहू आणि अनेक धान्ये असू शकतात; परंतु तरीही त्यात प्रामुख्याने प्रक्रिया केलेले धान्य असू शकते. लेबल वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मल्टीग्रेन ब्रेड्स

मल्टीग्रेन ब्रेडमध्ये गव्हाचा कोंडा, ओट्स व बार्लीसोबत भोपळ्याच्या बिया किंवा सूर्यफुलाच्या बिया असतात. या दोन्ही बिया रक्तातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात आणि वरीलपेक्षा ते चांगले आहेत.

ग्लुटेनमुक्त ब्रेड्स

अनेकदा या ब्रेडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. तुम्हाला मधुमेहासह सेलियाक रोग असल्यास, तुम्ही पोषण तज्ज्ञ / डॉक्टर यांच्याशी या ब्रेडच्या सेवनाबद्दल चर्चा करणे आवश्यक आहे.

(हे ही वाचा: मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका ‘या’ ७ पदार्थांनी होऊ शकते कमी; कसे कराल सेवन?)

ब्रेड्स कसे असावेत?

ब्रेडचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यासाठी उच्च प्रथिने, निरोगी चरबी व भरपूर भाज्यांसह सेवन करणे चांगले. ब्रेड स्लाइसमध्ये १०० पेक्षा कमी कॅलरीज असल्याची खात्री करा. सर्व ब्रेडमध्ये समान कॅलरी सामग्री (२५०-३०० कॅलरी १०० ग्रॅम) असते. परंतु, फायबर, प्रथिने व सूक्ष्म पोषक घटकांचे प्रमाण खूप वेगळे असते. म्हणून लेबल काळजीपूर्वक वाचा. जास्त फायबर असलेली ब्रेड शोधा. नेहमी पोषण तज्ज्ञ आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रक्तातील साखर नियंत्रणात नसेल, तर विविध अवयवांवर त्याचा परिणाम होतो आणि शरीरिक गुंतागुंत वाढत जाते. म्हणूनच साखर नियंत्रणात ठेवणे हे एक मोठे आव्हान असते. त्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे, औषधोपचार करणे, नियमित व्यायाम करणे या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे.

Story img Loader