Drinking Warm Water After Eating Food: आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिण्यास सांगितले जाते. पण, जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते का? याबाबत इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने तज्ज्ञांचे मत जाणून घेतले.
जेवणानंतर गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते, परंतु त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते याचा कोणताही थेट वैज्ञानिक पुरावा नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. “कोमट पाणी पोषक तत्वांचे शोषण आणि रक्ताभिसरण कार्य करण्यास मदत करते, परंतु आहार, व्यायाम आणि औषधोपचार यांसारख्या इतर प्रभावांच्या तुलनेत रक्तातील साखर नियंत्रणावर होणारा परिणाम कदाचित कमी असेल,” असे ग्रेटर नोएडातील शारदा हॉस्पिटलमधील अंतर्गत औषधांचे वरिष्ठ सल्लागार डॉ. श्रेय श्रीवास्तव म्हणाले. दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. नरंदर सिंघला म्हणाले की, “या प्रक्रियेत कोमट पाण्याच्या मदतीने पचनक्रिया वाढवणे आणि अन्नातून ग्लुकोज शोषण कमी करणे. याव्यतिरिक्त, ते पचनसंस्थेला उत्तेजित करू शकते, ज्यामुळे पोषक तत्वांचे चांगले विघटन होऊ शकते,” असे डॉ. सिंघला म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

तसेच त्यांनी सांगितले की, फक्त कोमट पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता नाही. “जेवणानंतर कोमट पाणी पिणे पचनासाठी आणि हायड्रेटेड राहण्यास चांगले असू शकते, परंतु रक्तातील साखर कमी करण्याचा हा मार्ग नाही. रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करणे,” असे गुरुग्राम येथील सीके बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. तुषार तायल म्हणाले.

काही संशोधनातून असे दिसून आले आहे की, कोमट पाणी प्यायल्याने “तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण किंचित वाढू शकते,” परंतु डॉ. तायल यांनी असा युक्तिवाद केला की, याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर खरोखर परिणाम होतो की नाही हे स्पष्ट नाही.

रक्तातील साखरेचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी उच्च फायबर आणि कमी साखरेचा संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाली आवश्यक आहेत.

“कोमट पाणी पचनास मदत करू शकते, परंतु जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यावर त्याचा लक्षणीय परिणाम होत नाही. जेवणानंतर ग्लुकोजचे व्यवस्थापन करण्यासाठी समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे, ज्यामध्ये फायबरयुक्त आहार, डोस नियंत्रण आणि नियमित शारीरिक हालचालींचा समावेश आहे,” असे ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथील अंतर्गत औषध संचालक डॉ. अमित सराफ म्हणाले.

डॉ. सिंघला म्हणाले की, रक्तातील साखरेचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि इतर जीवनशैलीतील बदल आवश्यक आहेत. “कोमट पाणी ही एक साधी आणि सहाय्यक सवय असू शकते, परंतु जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्राथमिक पद्धत म्हणून त्यावर अवलंबून राहू नये. वैयक्तिक सल्ल्यासाठी नेहमीच आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या,” असे मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट हॉस्पिटलचे एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. प्रणव घोडी म्हणाले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the effect of drinking warm water after eating food what experts say sap