Sleep Position: झोपेच्या वेळी आपण स्वतःची स्थिती कशी ठेवतो यावर आपल्या आरोग्यावर काय लक्षणीय परिणाम होणार ते अवलंबून असते. बरेच लोक त्यांचे डोके थोडे वर करून झोपणे पसंत करतात. परंतु, या स्थितीमागील विज्ञान समजून घेतल्यास फायदे आणि संभाव्य तोटे दिसून येतात.

ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट व डॉ. गुड डीड क्लिनिकचे संचालक डॉ. चंद्रिल चुघ हे सांगतात, “जेव्हा झोपेत तुम्ही घराच्या छताकडे डोके करून झोपता तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे डोके आणि मानेच्या भागातील रक्तवाहिन्यांमधील दाब कमी होण्यास मदत होते.” परंतु, “उशी खूप उंच असल्यास, रक्तप्रवाह मर्यादित होऊ शकतो आणि त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते.”

ही समस्या श्वसनाच्या समस्यांशी लढा देणाऱ्यांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. कोशीस हॉस्पिटलचे सल्लागार फिजिशियन डॉ. पॅलेटी शिवा कार्तिक रेड्डी यांनी नमूद केले, “गुरुत्वाकर्षण येथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कारण- डोके उंचावल्याने पोटातील अॅसिड अन्ननलिकेत परत येण्यापासून रोखले जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी छातीत जळजळ होणे आणि अस्वस्थता जाणवण्याचा धोका कमी होतो.” अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेले संशोधन याला समर्थन देते. ते म्हणतात की, डोके उंचावल्याने झोपेदरम्यान अॅसिड रिफ्लक्सच्या त्रासामध्ये लक्षणीय घट दिसून येते.

डॉ चुघ म्हणतात, “जेव्हा डोके जमिनीपासून योग्य उंचीवर म्हणजे सामान्यत: १५-३० अंशांदरम्यान असते, तेव्हा ते मणक्याला तटस्थ राखण्यास मदत करू शकते,” तथापि, दोन्ही तज्ज्ञ सांगतात की, चुकीच्या उंचीमुळे समस्या उद्भवू शकतात. डॉ. रेड्डी सल्ला देतात, “डोके खूप उंच ठेवून किंवा अस्ताव्यस्त अवस्थेत झोपल्याने मानेच्या मणक्याला त्रास होऊ शकतो. एकंदरीत अशा अवस्थेत झोपल्याने मानेचे स्नायू आणि पाठीच्या वरच्या भागावर ताण येतो.”

झोपेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम विविध व्यक्तींच्या बाबतीत वेगवेगळा असतो. ही स्थिती विशेषत: ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो अशा व्यक्तींसाठी त्रासदायक असू शकते. डॉ रेड्डी सांगतात, “हवेचा प्रवाह सुधारून, ही स्थिती वारंवार जागृत होण्यापासून रोखली जाऊ शकते आणि व्यक्तीला गाढ झोप येण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.” तसेच डॉ. चुघ सांगतात, “जर तुम्ही वापरत असलेल्या उशीची उंची योग्यरीत्या ठेवली नाही, तर त्यामुळे तणाव किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या गाढ झोपेवर परिणाम होऊ शकतो.”

झोपेच्या या स्थितीचा विचार कोणी करावा?

तज्ज्ञांच्या मते, झोपताना डोक्याखाली उशी घेणे विशेषतः फायदेशीर आहे:

अॅसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडी असलेल्यांसाठी उपयुक्त ठरेल.

ज्यांना स्लीप अॅप्निया किंवा ज्यांना खूप घोरण्याची सवय आहे अशांसाठी साह्यकारी आहे.

तसेच सायनसची समस्या असलेल्या व्यक्तींसाठीही ती मदत करणारी आहे.

हेही वाचा: रेफ्रिजरेटरमध्ये जास्त दिवस ठेवलेली कणीक आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ काय सांगतात…

हे कोणी टाळावे?

डॉ. चुघ यांच्या सल्ल्यानुसार, “मानेच्या किंवा पाठीच्या काही समस्या असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगायला हवी.

डॉ. रेड्डी पुढे म्हणतात, “हायपोटेन्शन असलेल्या व्यक्तींमध्ये मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे लक्षणे बिघडू शकतात.”

आरोग्याच्या अनेक पैलूंप्रमाणे एक व्यक्तीसाठी जे कार्य करते, ते कार्य दुसरी व्यक्ती करू शकत नाही. त्यामुळे झोपताना डोक्याखाली योग्य उशीचा आधार शोधणे ही मुख्य गोष्ट आहे, जी आरामदायी, शांत झोपेचा अनुभव देते.

Story img Loader