Dog Bite Treatment : कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कुत्रा चावण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आपल्याला माहिती आहे की कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा आजार होतो. या आजाराचे अनेक लोक शिकार होताना दिसतात. हा आजार जीवघेणा असून यावर त्वरित उपचार करणे तितकेच गरजेचे आहे. कुत्रा चावल्यानंतर तातडीने काय करावं किंवा प्राथमिक उपचार कोणते करावेत, याविषयी अकोला येथील ‘पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स’चे सहअधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी सविस्तर माहिती दिली.

कुत्रा चावल्यानंतर तातडीने काय करावे?

डॉ. धनंजय दिघे सांगतात, “कुत्रा चावल्यानंतर सुरुवातीला तुमच्या घरी असलेल्या साबणाने जर जखम धुतली तर रेबीजचा व्हायरस लवकर नष्ट होतो. यासाठी लाइफबॉय साबण अधिक प्रभावशाली आहे. त्यानंतर ड्रेसिंग करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
कुत्रा चावल्यानंतर तातडीने देण्यात येणारी अँटी सीरमसुद्धा उपलब्ध आहे. रेबीजच्या व्हायरसपासून बनवण्यात आलेली अँटी सीरम तुम्हाला कोणत्याही केमिस्टच्या दुकानात मिळू शकते. हे सीरम डॉक्टर तुमच्या जखमेच्या आजूबाजूला टोचतात. हा उपचार तातडीने करणे गरजेचे आहे. एक किंवा दोन दिवसांनी करेन, असे म्हणून चालणार नाही. ज्या दिवशी कुत्रा चावला आहे त्या दिवशीच सीरम टोचणे आवश्यक आहे. कुत्रा चावल्यानंतर लगेच १५-२० मिनिटांमध्ये हे सीरम टोचले तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.”
डॉ. दिघे सांगतात, “कुत्रा चावल्यानंतर अँटी रेबीज कोर्स घेणेही आवश्यक आहे. पूर्वी पोटामध्ये इंजेक्शन घ्यावी लागायची, पण आता पोटामध्ये इंजेक्शन घ्यावी लागत नाही. आता हातामध्ये किंवा दंडामध्ये इंजेक्शन घेऊ शकतो. यासाठी सहा इंन्जेक्शनचा कोर्स आपल्याला पूर्ण करावा लागतो. हे सर्व उपचार केल्यामुळे कुत्र्याच्या व्हायरसपासून होणारा रेबीज रोग आपल्याला टाळता येतो.”

mauled dog in Chikhli bitten many causing fear among residents
चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Golden fox and stray dogs coexist in Kharghar Mumbai print news
खारघरमध्ये सोनेरी कोल्हा आणि भटक्या कुत्र्यांचा एकत्र वावर
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
career animal love
चौकट मोडताना : प्राणिप्रेमाची धास्ती
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
60 year old woman injured in stray dog attack near Titwala complex
टिटवाळ्यात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

हेही वाचा : तुम्हाला वडापाव खायला आवडतो? वडापाव खाल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात? जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात…

कुत्रा चावल्यानंतर रुग्णालयात नेण्यापर्यंत काय काळजी घ्यावी?

डॉ. दिघे पुढे सांगतात, “कुत्रा चावल्यानंतर अनेकदा रक्तस्त्राव होऊ शकतो. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रक्त वाहिनीला दुखापत झाली तर रक्तस्त्राव होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी रक्तस्त्राव थांबवण्यासाठी जखमेवर पट्टी किंवा बँडेज बांधणे गरजेचे आहे. अँटी सीरम ९० टक्के फायदेशीर ठरते. या सीरममुळे कुत्र्याच्या लाळेतून जो व्हायरस निर्माण होतो, तो व्हायरसच नष्ट होतो.”

उपचार करण्याचा कालावधी

डॉ. दिघे सांगतात, “कुत्रा चावल्यानंतर त्याच्या लाळेतून जो व्हायरस निर्माण होतो, त्या व्हायरसमुळे रेबीज हा आजार रक्तामध्ये पसरतो. त्यामुळे उपचाराचा कालावधी म्हणता येणार नाही. जितक्या लवकर उपचार घेता येईल तितके चांगले आहे. कुत्रा चावल्यानंतर दुर्लक्ष करू नये. लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शनचा कोर्स सुरू करणे आवश्यक आहे. व्हायरस पसरू नये म्हणून कुत्रा चावल्यानंतर एक ते दोन तासात उपचार घेणे गरजेचे आहे.”

लहान मुलांनी कोणती काळजी घ्यावी?

डॉ. दिघे म्हणतात, “लहान मुलांना या गोष्टीचे महत्त्व कळत नाही. खेळता खेळता एखादा कुत्रा चावून जातो. मुलांसह पालकांनाही याबाबत कल्पना नसते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केलं जातं. अनेकदा गरीब लोकं डॉक्टरांकडे जाणे टाळतात. पाण्याने जखम धुवून ठेवतात, हळद लावतात किंवा घरगुती उपचार केले जातात. पालक, शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत ही जनजागृती करणे गरजेचे आहे. कुत्रा चावणे ही साधी गोष्ट नाही. पाळीव असो किंवा रस्त्यावरचा असो, कुत्रा रेबीजचा वाहक आहे.
पाळीव कुत्रासुद्धा पिसाळू शकतो, याची आपल्याला कल्पना नसते. जेव्हा पाळीव कुत्रा चावतो, तेव्हा कुत्र्याच्या मालकाला सुरुवातीला विश्वास बसत नाही. पण, मालकाला अनेकदा कल्पना नसते की, पाळीव कुत्र्यालासुद्धा दुसरा रस्त्यावरचा कुत्रा चावलेला असतो. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. पाळीव कुत्रा अचानक चावायला लागतो, हे त्यामागील कारण असू शकते. कोणताही कुत्रा चावला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले पाहिजे.”

हेही वाचा : कमी वयात होणाऱ्या मधुमेहामुळे तुमचे आयुर्मान घटणार? संशोधनात समोर आली ‘ही’ माहिती

उपचार घेताना कोणती काळजी घ्यावी?

डॉ. दिघे सांगतात, “पूर्वी कुत्रा चावल्यानंतर पोटामध्ये १४ इंजेक्शन घ्यावी लागायची. इंजेक्शन घेतल्यानंतर खूप दुखायचं, खूप त्रास व्हायचा, त्याचा डोस खूप मोठा असतो. आता हे इंजेक्शन एक मिलिमीटर इतके असते. शेड्युलनुसार सहा इंजेक्शन घ्यावे लागतात. शक्यतो या शेड्युलमध्ये काहीही बदल होऊ देऊ नये. लवकरात लवकर उपचाराचा फायदा हवा असेल तर शेड्यूल पाळणे अत्यंत आवश्यक आहे. काही लोकांना इंजेक्शन घेणे परवडत नाही, पण हे इंजेक्शन सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध असतात.”

कुत्र्यापासून कसं सावध राहावं?

कुत्र्यापासून कसं सावध राहावं याविषयी डॉ. दिघे सांगतात, “कुत्रा हा अतिशय प्रिय प्राणी आहे. घरोघरी अनेक लोकं कुत्रा पाळतात. कुत्रा पाळताना काळजी घेणे गरजेचे आहे; कारण कधी कधी श्वानप्रेम हे घातक ठरू शकते. श्वानप्रेमी रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालतात, त्यांच्यावर उपचार करतात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु काळजी घेणेही आवश्यक आहे. श्वानप्रेमी लोकांनी किंवा कुत्र्यामध्ये वावरणारे लोक आहेत त्यांनी लसीकरण करणे गरजेचे आहे.
श्वानप्रेमींनी सरकारला मदत केली पाहिजे. कोणत्याही जागरुक नागरिकाने आजूबाजूला कुत्रे आहेत त्यांची नसबंदी केली आहे की नाही, हे तपासले पाहिजे आणि नसबंदी केली पाहिजे. शक्य झाले तर त्यांना लसीकरण केले पाहिजे. अशाप्रकारे आपण रेबीज आजार नियंत्रणात आणू शकतो. रेबीज आजाराचे गांभीर्य समजून घेणे गरजेचे आहे. या आजारावर उपचार केले नाही तर माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो.”

Story img Loader