Leidenfrost Effect Helps Avoid Food Sticking To The Pan : जेवण बनवणे ही एक कला आहे. पण, त्यात विज्ञानाच्या अनेक आकर्षक घटकांचाही समावेश आहे. स्वयंपाकाचा असाच एक वैज्ञानिक पैलू अलीकडेच ट्रिग फेरानो या स्वयंपाक करणाऱ्या कन्टेन्ट क्रिएटरने शेअर केला होता; ज्याने इन्स्टाग्रामवर लीडेनफ्रॉस्ट इफेक्टबद्दल (Leidenfrost effect) सांगितले आहे. पण, जर तुम्हाला स्टेनलेस स्टील वापरण्यात भीती वाटत असेल, तर तुम्हाला काही गोष्टी शिकण्यासाठी वेळ लागू शकतो. एकदा तुम्ही या गोष्टी शिकलात की, प्रत्येक पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.तर याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेडेनफ्रॉस्ट इफेक्ट म्हणजे काय (What is the Leidenfrost effect) :

लेडेनफ्रॉस्ट इफेक्टमध्ये (Leidenfrost Effect) अन्न पॅनवर चिकटणे टाळण्यास मदत होते. जेव्हा स्टेनलेस स्टीलचे पॅन हाय टेम्परेचरवर गरम करण्यात येतात तेव्हा पाण्याच्या थेंबाचे लगेच बाष्पीभवन होत नाही. त्याऐवजी ते पाणी लगेच वाफ बनून तरंगत राहते. त्यामुळे पाण्याचे थेंब पॅनच्या पृष्ठभागाला स्पर्श करत नाहीत. यामुळे पाण्याचे थेंब उडत राहतात आणि त्यांचे तापमान कमी होते, असे एलबी नगर, ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ, डॉक्टर बिराली स्वेथा म्हणाल्या.

हा इफेक्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण- ही प्रक्रिया असे दर्शवते की, स्टेनलेस स्टील पॅनचे तापमान अन्न शिजविणे, तळणे किंवा भाजणे यासाठी योग्य झाले आहे. म्हणजेच जर तुम्हाला पॅनमध्ये पाण्याचा थेंब टाकल्यावर तो त्वरित वाफ बनत असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की, अन्न बनवायला सुरुवात करण्यासाठी पॅन आता तयार आहे.

हेही वाचा…Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत

याउलट जर पॅन खूप थंड असेल, तर अन्न पृष्ठभागावर चिकटून राहील. म्हणजेच जेव्हा लीडेनफ्रॉस्ट इफेक्ट (Leidenfrost Effect) आढळतो, तेव्हा अन्न चिकटत नाही. एकंदरीत पॅन पुरेसा गरम असल्याचे संकेत देतो तेव्हा तो अन्न चिकटण्यास प्रतिबंध करतो. परिणामत: स्वयंपाकदेखील व्यवस्थित बनतो, असे डॉक्टर बिराली म्हणाले.

डॉक्टर बिराली स्वेथा म्हणाल्या की, आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास योग्य तापमानात स्वयंपाक केला, तर अन्न जळण्याचा धोकादेखील कमी होतो आणि त्यामुळे हानिकारक संयुगे तयार होणे टळते. तसेच अन्न योग्य रीतीने आणि पटकन शिजते. यातून तुमच्या जेवणाची पौष्टिक गुणवत्ता कायम राहण्यासही मदत मिळते. त्यामुळे लीडेनफ्रॉस्ट इफेक्ट समजून घेतल्यास आरोग्यदायी, स्वयंपाक करण्यास हातभार लागू शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the leidenfrost effect if you cook food in stainless steel pans the effect can contribute to healthier more efficient cooking read doctor advice asp