What Is The Perfect Way To Drink Turmeric Milk : सर्दी, खोकला आणि काही हंगामी आजारांपासून आराम मिळविण्यासाठी आई, आजी ‘हळदीचे दूध किंवा चिमूटभर मिरची पावडरसह हळदीचे दूध’ पिण्याला प्राधान्य देतात. अजून चांगल्या फायद्यांसाठी ते सहसा गरमागरम पिण्याचासुद्धा सल्ला दिला जातो. पण, पोषण तज्ज्ञ गुरबाज सिंग यांनी अलीकडेच असा दावा केला आहे की, हळदीचे दूध नेहमी गरम न पिता खोलीच्या तापमानानुसार पिण्यास सांगितले आहे आणि असे न केल्यास आतड्यांवर परिणाम होतो, असा दावा केला आहे.

या दाव्यात काही तथ्य आहे का?

हळदीचे दूध कसे प्यावे (Perfect Way To drink turmeric milk) हे समजून घेण्यापूर्वी पहिल्यांदा फायदे जाणून घेऊ…

फिसिको डाएट अँड अॅस्थेटिक क्लिनिकच्या संस्थापक आहारतज्ज्ञ विधी चावला म्हणाल्या की, हळदीतील कर्क्युमिन (curcumin) हा मध्यवर्ती घटक (central element) असतो. त्यामध्ये एक शक्तिशाली दाहकविरोधी गुणधर्म असतो, जो जळजळ कमी करण्यास मदत करतो आणि संधिवात, पचन समस्यांसह आजारांवर उपचार करण्यास मदत करू शकतो. त्याव्यतिरिक्त त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि अनेक जुनाट आजार होण्याची शक्यता कमी करू शकतात.

खोलीच्या तापमानानुसार (room-temperature) हळदीचे दूध घ्यावे का?

दूध जास्त गरम केल्याने त्यातील काही नैसर्गिक घटक, जसे की प्रथिने, जीवनसत्त्वे खराब होऊ शकतात. त्याशिवाय अत्यंत उच्च तापमानात कर्क्युमिनचा प्रभाव कमी होऊ शकतो. हळदीच्या गरम दुधात उष्णता स्थिर असली, तरी दूध जास्त वेळ गरम केल्याने दुधात थोडासा बिघाड होऊ शकतो, ज्यामुळे त्याचा उपचारात्मक प्रभाव कमी होतो. पोषक घटकांचा त्याग न करता, खोलीच्या तापमानात हळदीचे दूध कर्क्युमिनचे दाहकविरोधी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे फायदे प्रदान करते, असे विधी चावला म्हणाल्या.

याव्यतिरिक्त हळदीचे गरम दूध प्यायल्याने तुमची जीभ किंवा घसा जळण्याचा धोका असतो, जे अस्वस्थ, त्रासदायक ठरू शकते. विशेषतः संवेदनशील पोट असलेल्या लोकांसाठी, असे विधी चावला म्हणाल्या आहेत. साधारणपणे खोलीच्या तापमानात हळदीच्या दुधाची उबदारता चांगली असते. कारण- यामुळे घशातील खवखव कमी करते आणि जास्त गरम होण्याचा किंवा पोषक घटक गमावण्याचा धोका न घेता, घशाला आराम देते.

हळदीचे दूध हे एक आरोग्यदायी पेय असू शकते. पण, खोलीच्या तापमानावर ठेवल्यास किंवा हळूहळू किंवा कमी गरम केल्यास त्याचे अधिक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. या पद्धतीमुळे तुम्ही दुधातील खनिजे टिकवून ठेवत हळदीच्या फायद्यांचा पूर्ण फायदा घेऊ शकता. निरोगी, अधिक फायदेशीर हळदीच्या दुधासाठी पुढच्या वेळी ते बनविताना जास्त उष्णता वगळण्याचा विचार करा, असे विधी चावला म्हणाल्या.